नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील बायपास रस्ता महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. सौंदड पिपरी ५ किमी. रस्ता सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत तयार करण्यात आला. आजघडीला या मार्गाने अवैध मुरुमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. अवैध मुरुम,रेतीचे ओव्हरलोड ट्रक,ट्रॅक्टर रात्रंदिवस रेतीची वाहतूक करीत असतात.. तस्करांनी अक्षरश: या मार्गाची वाट लावली आहे.सद्यस्थितीत या रस्त्यावर १-१,२-२ मीटरचे खड्डे पडले आहेत.त्याकारणाने अनेकदा दुर्घटना होत असतात.मात्र याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांनी ढुकूंनही पाहिले नाही.वास्तविक रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे ५ वर्षापर्यंत कंत्राटदाराकडे असते.तेसुद्धा केले गेले नाही.या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रेती तस्करांनी रस्त्यावर मुरुम टाकून भर पावसाळ्यात माती भरलेल्या खड्ड्यामध्ये पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.याकारणाने गांधी वार्डातील नागरिकांचे घरासमोर चिखल व पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्यावर परिणाम पडत असून डेंगू,मलेरिया पसरविणा-या रोगांना कारणीभूत ठरत असल्याची नागरिक बोलत आहेत.