Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ३०, २०२३

आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.






शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिष्ठांन्नाची मेजवानी.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० जून.
गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन नवागत विद्यार्थ्यांचे शाळांमधून मुख्याध्यापक व शिक्षकांकडून आनंददायी स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण शाळेच्या आजच्या दिवशी पाहायला मिळाले.
आज ३० जूनला शाळेच्या नवीन शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झाली असून,मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी शाळांमधून उपस्थिती दर्शवली आहे. शाळेमध्ये झालेल्या जंगी स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
शाळा प्रवेशोत्सव व कुणीही विद्यार्थी गैरहजर राहू नये,यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती घडविण्यासाठी अनेक शाळांमधून गावातून शोभायात्रा काढण्यात आल्यात.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या,शाळा सजवण्यात आल्या.आनंददायी स्वागतानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, त्या-त्या इत्तेनुसार पुस्तके वाटप करण्यात आले.तसेच शालेय पोषण आहारात मिष्ठांन्न वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहातसाजरा करण्यात आला. मुख्याध्यापक शिक्षकांबरोबरच,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहत होता.शिक्षण विभागाचे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव त्यांचे जंगी स्वागत करून करण्यात आल्यामुळे, पालकांमध्येही उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे नवागत विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थित विद्यार्थ्यांचेही गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे व शिक्षकांनी जंगी स्वागत केले. विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख एस.व्ही. बडोले,जे.एस.हटवार,के.एम.भैसारे, एम यु घरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एच एस पात्रीकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.एम.साखरे, बी.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावरटोला येथे प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच
युवराज तरोणे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पद्माताई सुखदेवे, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सरीताताई मेश्राम, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, म. गांधी तंटामुक्त समिती सदस्य आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. मुख्याध्यापकआर.के.कापगते यांनी प्रास्ताविक मांडून अतिथींचे स्वागत केले. शिक्षक एच.बी.बहेकार,ए.के.वासनिक,डी.एम. कोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक मंडळीी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोट-
आज शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या मुलांचे शाळेत पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.त्यांना गणवेश व नवीन कोऱ्या पुस्तका मिळाल्या याचा आनंद आहे.आजचा पहिलाच दिवस आनंददायी ठरल्यामुळे,विद्यार्थ्यांमध्ये रोजच नियमित शाळेत जाण्याचा उत्साह कायम राहील.
-कुंजीलाल कुंभारे,
पालक,सावरटोला.

आज शाळेचा पहिला दिवस विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात विद्यार्थ्यांचे आम्ही जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तका दिल्यात. तसेच शालेय पोषण आहारात
मिष्ठांन्नही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
-एस.एस.टेंभुर्णे, मुख्याध्यापक
सम्राट अशोक विद्यालय,उमरी.

शाळेतील सर्व मुले व पालकांना शाळा सुरू झाली आहे याची माहिती व्हावी, शाळेच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के उपस्थिती राहावी, पहिलीच्या मुलांना शाळेत येताना ताण येऊ नये,यासाठी पालकांना खेळीमेळीच्या वातावरणात शाळेत आणण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये शाळेत येण्याविषयी घोषणा, नारे, देशभक्ती गीत गायन करण्यात आले.
- राजकुमार कापगते
मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा सावरटोला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.