Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून २९, २०२३

काय ते फोटो अन काय ती चर्चा! नेमकं फोटोमागील रहस्य काय? #AIphotography #TechLens #AIcaptures #DigitalEyes

महाराष्ट्र्रातील सत्तांतराला आता वर्ष झालाय. मात्र, राजकीय आरोपांच्या फैरी काही थांबल्या नाहीत. सर्वांना २०२४ च्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्यादिशेनं मोर्चेबांधणी करू लागली आहेत. अशातच मागील दोन दिवसापासून काही फोटोची चर्चा महाराष्ट्रभर सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांनी शेअर करीत मिश्किल टिप्पणीदेखील केली आहे. हे फोटो कुणी आणि कशे तयार केलेत, असा प्रश्न आपल्याला पडला असेल? चला तर समजून घेऊया.



हे फोटो आहेत आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून साकारलेली. आर्टिफिशल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करत. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखे बोलू शकते, वाचू शकते अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहजतेने करू शकते.
----------------



सध्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल आता सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून विविध कामे सहज करता येत आहेत. ‘एआय’ वापरून भविष्यातील प्रत्येक क्षेत्र विकसित केले जाऊ शकते. त्याचा फायदाही होताना दिसत आहे.




सध्या महाराष्ट्रात ज्या फोटोची चर्चा सूरु आहे, त्यावर एक नजर टाकूया. स्क्रीनवर आपण जे फोटो बघत आहात, त्यात महाराष्ट्रातील काही दिवंगत नेत्यांसह काही राजकारणी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर आर पाटील, राजीव सातव, गिरीष बापट, विनायक मेटे या दिवंगत नेत्यांचे डिस्नी कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे.




इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबल, दिलीप वळसे पाटील यांच्याही कार्टून फोटोंचा समावेश आहे.

हे फोटो बघून जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं. पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल. कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे असे जयंत पाटील यांनी ट्वीट करुन म्हटलं.
दिलीप वळसे पाटील यांनीही ट्वीट करुन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने अर्कचित्र साकारल्याबद्दल मनापासून आभार मानले.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने अर्कचित्र साकारणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? हा व्यक्ती कोणी चित्रकार किंवा इंजिनिअर नाही, तर माजी मंत्री व विद्यमान आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत. अमित वानखेडे असे त्यांचे नाव आहे. या चित्रामुळेच ते प्रसिद्धीझोतात आले.



त्यावर अमित वानखेडे सांगितले की, मीड जर्नी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची डिस्ने कार्टून शैली साकारली आहे. यामध्ये तुम्हाला फोटो कसा हवा आहे याची माहिती सॉफ्टवेअरला देणे आवश्यक आहे. हे इनपुट शब्द फक्त देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्हाला हवे ते फोटो मिळतात, असे नवखेडे यांनी सांगितले. मला राजकारणात रस होता म्हणून पहिल्यांदा राजकीय नेत्यांची डिस्ने व्यंगचित्रे काढली. राजकीय नेत्यांची व्यंगचित्र मालिका पूर्ण करणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि अपक्ष नेत्यांची व्यंगचित्रे काढण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.









#AmitWankhedeVlogs
#AIphotography
#TechLens
#AIcaptures
#DigitalEyes
#AIshutter
#TechFrame
#SmartShots
#AIvisuals
#TechClicks
#PixelIntelligence


-

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.