Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २८, २०२३

वसंतराव नाईक सामाईक पुरस्कारासाठी विदर्भ नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची निवड Vidarbha Nature Conservation Society

वसंतराव नाईक सामाईक पुरस्कारासाठी विदर्भ नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीची निवड


नागपूर :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री के. वसंतराव नाईक यांचा ११० वा जन्मदिन व कृषिदिनानिमित्त दिनांक १ जुलै रोजी कृषी, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि प्रक्रिया उद्योग, जलसंधारण, कृषि साहित्य, कृषि पत्रकारिता, कृषि उत्पन्न निर्यात, फुलशेती इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना व प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यातील वसंतराव नाईक सामाईक पुरस्कारासाठी विदर्भ नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष मा. अध्यक्ष डॉ. चारुदत्त माई यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

शाल, श्रीफळ, स्मतिचिन्ह व रु.१,००,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.