Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३

एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | Smile Foundation and Vani Bahuguni News Portal

वणी, चंद्रपूर, मारेगाव, मुकुटबन येथील नवोदित पत्रकारांना केले मार्गदर्शन


स्माईल फाऊंडेशन व वणी बहुगुणी न्युज पोर्टलतर्फे (Smile Foundation and Vani Bahuguni News Portal) येथील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराला नवोदित पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात वणी, मारेगाव, झरी तालुक्यासह पांढरकवडा व चंद्रपूर येथील सुमारे 60 शिबिरार्थी सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे होते.


कार्यक्रमाला प्रा. दिलिप अलोणे, वसंत जिनिंगचे संचालक प्रकाश म्याकलवार, घनश्याम निखाडे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर देवानंद साखरकर, डॉ. महेंद्र लोढा, पत्रकार संतोष कुंडकर, प्रेस वेलफेअर असोशियसनचे तुषार अतकरे, दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष जब्बार चिनी, जागृत पत्रकार संघटनाचे संदीप बेसरकर, न्यूज मीडिया असोशियसनचे दीपक छाजेड, पत्रकार सुनील पाटील, गजानन कासावार, परशुराम पोटे, गजानन कासावार, सुशील ओझा, सुरज चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन सत्रात आयोजित या कार्यशाळेत यवतमाळ येथील ज्येष्ठ पत्रकार अंकुश वाकडे, दिनेश गंधे, चंद्रपूर येथील डिजिटल मीडिया तज्ज्ञ देवनाथ गंडाटे यांच्यासह, श्रीवल्लभ सरमोकदम, जब्बार चीनी, जितेंद्र कोठारी, निकेश जिलठे यांनी उपस्थित शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop 



उद्घाटन प्रसंगी बोलताना वामनराव कासावार यांनी देशातील आजची पत्रकारिता यावर भाष्य करत आजच्या काळात पत्रकारांनी नि:पक्ष पत्रकारिता करून लोकशाही मजबूत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आशिष खुलसंगे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पत्रकारिता केली तर समाज सुधारणा आणि विकासाला बळकटी मिळेल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात निकेश जिलठे यांनी पत्रकारितेची ओळख व बातमी लेखन या विषयावर तर श्रीवल्लभ सरमोकदम यांनी बातमीतील भाषा, न्यूज ऍन्गल या विषयावर मार्गदर्शन केले. शोध पत्रकारिता या विषयावर जब्बार चीनी यांनी मार्गदर्शन केले.
Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop 

दुस-या सत्रात दिनेश गंधे यांनी गेल्या 30 वर्षांत पत्रकारितेत होणारे बदल, बातमी करताना येणारी विविध आव्हाने या विषयावर खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. तर अंकुश वाकडे यांनी जगभरातील पत्रकारितेचा थोडक्यात आढावा घेत बातमीचा सोर्स, व्यावसायिक पत्रकारिता यावर भाष्य केले. देवनाथ गंडाटे यांनी डिजिटल मीडियाचे आजचे स्वरूप व त्यासाठी उपयोगात येणारे विविध टुल्स याची माहिती शिबिरार्थ्यांना दिली.




पत्रकार प्रशिक्षण शिबिरासाठी आलेल्या पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सागर जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कोठारी यांनी केले. उपस्थितांचे आभार तन्मय कापसे यांनी मानले. (Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop)



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल डफ, अभिलाष राजूरकर यांच्यासह स्माईल फाउंडेशनचे पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, अनिकेत वासरिकर, रोहित ओझा, कुणाल आत्राम, प्रेम बावणे, रुद्राक्ष, कनाके, राज भरटकर, मनीष मिलमिले, आकाश राजूरकर, घनश्याम हेपट यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.