चंद्रपूर :भल्याभल्यांना ताडोबाच्याTadoba Tiger Reserve वाघाने भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येत असतात. अशातच भारतरत्न सचिन तेंडुलकर रविवारी ताडोबात दाखल झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे पत्नी अंजली व काही मित्रांसह शनिवारी काल रात्री साडेआठच्या सुमारास ताडोबात आगमन झाले आहे.यापूर्वी, फेब्रुवारी 2020, ४ सप्टें, २०२१ रोजी, मार्च 2021 रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर परिवारासह आला होता. (Sachin Tendulkar at Tadoba)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Master Blaster Sachin Tendulkar) यांनी ताडोबात रविवारी पहिल्याच दिवशी ताडोबात सफारी केली. यावेळी (Tara, Maya, Bijli, Black Leopard ) तारा, माया, बिजली व काळा बिबटचे दर्शन झाले. झुनाबाईचा विशेष लडा असल्याने सचिन तेंडुलकर तीन दिवस ताडोबा मुक्कामी आहेत. त्यांच्या समवेत पत्नी अंजली तेंडूलकर (Anjali Tendulkar) व काही मित्र आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur Tadoba) ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध स्थळ आहे. त्यामुळे देश- विदेशी पर्यटक या ठिकाणी येऊन वाघांचे आणि अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन घेतात. एखदा आले की दरवर्षी त्यांना वन्य प्राणी या ठिकाणी खेचून आणतात. त्यामुळेच सेलीब्रेटींची या ठिकाणी दरवर्षी सफारी होते.
Maharashtra's Tadoba has 115 tigers, the highest concentration among India’s tiger reserves. The likelihood of seeing a tiger in Tadoba National Park is "almost 80%"