विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले भव्य सत्कार सोहळा
राजुरा | नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयानंतर शिक्षक मतदारसंघात मिळाला विजय परिवर्तनाची नांदी आहे. बेरोजगारी, महागाई, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी सरकारने केले आहे. यामुळे जनता वैतागलेली आहे . आमदार श्री अडबाले यांच्या विजयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाविकास आघाडी यांच्यासोबत जुन्या पेन्शन धारकांचे योगदान मोलाचे आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक महाविकास आघाडी मध्ये आहे. सत्ता बदला पेन्शन देऊ . पुढील निवडणुकात सत्ताधाऱ्यांची नशा सुजान मतदार उतरवतील आणि परिवर्तन घडवतील असा आशावाद माजी मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी राजुरा येथे केला.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राजुरा विधानसभा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार माननीय सुधाकरराव गोविंदराव अडबाले (विधान परिषद सदस्य) यांचा जाहीर सत्कार समारंभ आज दिनांक 19 फेब्रुवारी ला राजुरा येथे पार पडला. स्वागताध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती सुधाकरराव अडबाले, आमदार (विधान परिषद सदस्य ), प्रमुख अतिथी म्हणून अभिजीत वंजारी, आमदार (विधान परिषद सदस्य), मान. बबनराव तायवाडे, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, स्वागताध्यक्ष आमदार सुभाष धोटे,
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्ष सविता टेकाम, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष श्रीधरराव गोडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे ,दादा पाटील लांडे , सुग्रीव गोतावळे, डॉ.प्रदीप घोरपडे, स्वामी येरोलवार, सचिन राजूरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, प्राचार्य दौलतराव भोंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राजुरा विधानसभा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित आमदार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बबनराव तायवाडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुभाष धोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार बाळू धानोरकर यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सत्कारमूर्तीं आमदार सुधाकर अडबाले व आमदार अभिजीत वंजारी यांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली.
सत्कारांला उत्तर देताना आमदार सुधाकर अडबाले यांनी हा एक जुटीचा विजय असून हा प्रत्येक कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षकांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी यापुढेही लढत राहू असा आश्वासन याप्रसंगी दिले. विविध संघटनांच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक, , शिक्षकेतर कर्मचारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष राजू डाहुले यांनी केले .संचालन आनंद चलाख यांनी केले .आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले.