ब्रम्हपुरी (Bramhapuri) : पाहुणे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले. यात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ घडली. Accident brahmapuri Chandrapur
प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीचा कार्यक्रम असल्याने रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे
मालवाहक टेम्पो वाहनाने कार्यक्रमाला जात असताना ब्रम्हपुरी येथे बारई तलावाजवळ चालकाने गाडी थांबवली तिथे महेश दिघोरे नामक दुसरा चालकाने गाडी हाती घेतली. ब्रम्हपुरी येथिल टिळक नगर दत्त मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्यामुळे गाडी उलटली.
वेळीच घटनास्थळा जवळील रहिवाशांनी पलटी वाहनाला उभे करून जखमींना वाहना बाहेर काढून उपचारारार्थ दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत केली.त्यात 31 जण जखमी झाले असून महिला व बालकांचा यात समावेश आहे.
सदर घटनेनंतर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमींवर ताबडतोब येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडाळे डॉ. पटले डॉ नागमोती डॉ कामडी व त्यांच्या चमुनी प्रथमोपचार करून यातील गंभीर जखमींना रुग्णवाहिकेने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले. Accident brahmapuri Chandrapur
यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश (मोंटू) पिलारे, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके आणि पत्रकारांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
गंभीर जखमींमध्ये प्रियंका दोनाडकर, प्रमिला भर्रे, रागिना बुराडे, जागृती दोनाडकर, योगिता दोनाडकर, अनुसया राऊत, ज्योत्सना बुराडे, आदेश बुराडे, आदीं असून गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तसेच बाकी उर्वरीत जखमींवर ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Lagnache warad, brahmapuri Maharashtra Vidarbha India chandrapur