भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार विदर्भामध्ये पुढील पाच दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे. दीर्घ मुदतीच्या अंदाजानुसार विदर्भात 23 ते 29 एप्रिल दरम्यान हवामान स्थिती सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Weather
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात म्हणजेच 19 ते 23 एप्रिलदरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहून 20 ते 23 एप्रिल रोजी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 ते 22 एप्रिलदरम्यान एक दोन ठिकाणी वादळ वारा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळ वारा होत असताना हवेचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असेल. Indian Meteorological Department
भंडारा जिल्ह्यामध्ये 20 21 22 एप्रिल रोजी विधानसभा होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस अंशतः आकाश ढगाळ राहून 19 ते 22 एप्रिल दरम्यान तृणक आणि एक दोन ठिकाणी अति हलके आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवसात तुलक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार 19 ते 23 एप्रिल दरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये कमाल तापमान 40° ते 41° अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 22° ते 23° अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये विदर्भमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवसानंतर दोन ते चार अंशापर्यंत घट होईल. किमान तापमान पूर्व विभागामध्ये पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र पावसाचा अंदाज असल्याने गारपीट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. Indian Meteorological Department