सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..
फेसबुक लिंक http://bit.ly/3r0vibp
महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...
अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती.
पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
सावरकरांनी दिलेले मराठी शब्द पहा👇दिनांक (तारीख)क्रमांक (नंबर)बोलपट (टॉकी)नेपथ्यवेशभूषा (कॉश्च्युम)दिग्दर्शक (डायरेक्टर)चित्रपट (सिनेमा)मध्यंतर (इन्टर्व्हल)उपस्थित (हजर)प्रतिवृत्त (रिपोर्ट)नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)महापालिका (कॉर्पोरेशन)महापौर (मेयर)पर्यवेक्षक ( सुपरवायझर)विश्वस्त (ट्रस्टी)त्वर्य/त्वरित (अर्जंट)गणसंख्या (कोरम)स्तंभ ( कॉलम)मूल्य (किंमत)शुल्क (फी)हुतात्मा (शहीद)निर्बंध (कायदा)शिरगणती ( खानेसुमारी)विशेषांक (खास अंक)सार्वमत (प्लेबिसाइट)झरणी (फाऊन्टनपेन)नभोवाणी (रेडिओ)दूरदर्शन (टेलिव्हिजन)दूरध्वनी (टेलिफोन)ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)विधिमंडळ ( असेम्ब्ली)अर्थसंकल्प (बजेट)क्रीडांगण (ग्राउंड)प्राचार्य (प्रिन्सिपॉल)मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)प्राध्यापक (प्रोफेसर)परीक्षक (एक्झामिनर)शस्त्रसंधी (सिसफायर)टपाल (पोस्ट)तारण (मॉर्गेज)संचलन (परेड)गतिमाननेतृत्व (लिडरशीप)सेवानिवृत्त (रिटायर)वेतन (पगार)--------
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे!