Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २२, २०२२

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी होणार : केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे खासदार बाळू धानोरकर यांना आश्वासन

खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंबंधी चर्चा



नवी दिल्ली येथे दिनांक १४/०३/२०२२ ला लोकसभेत शून्य प्रहरात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता आज दिनांक २१/०३/२०२२ ला खासदार श्री बाळू धानोरकर यांचेशी बँकेबद्दल खालील मुद्द्यांवर चर्चा केली.


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होऊन संचालक मंडळ कार्यकाळ २०१२-२०१७ त्यानंतर ५ वर्ष जादा कालावधी संपल्या नंतरही मा . सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक १८/०२/२०२१ ला कालावधी संपलेल्या बँकावर प्रशासक नेमून निवडणुका घ्याव्यात व तो पावेतो धोरणात्मक निर्णय घेऊ नये याप्रकारे आदेशात नमूद असुनही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मा . सर्वोच्च न्यायालयाचे १८/०२/२०२१ चे निर्णयानंतर

( १ ) कोविड काळात आभासी पद्धतीने दिनांक २७/०३/२०२१ व दिनांक ३० / ० ९ / २०२१ ला सर्वसाधारण सभा घेऊन विविध प्रकारचे अनेक निर्णय सहकारी संस्थांच्या अहीताचे निर्णय निवडणुका आपल्यालाच जिंकता याव्यात व भविष्यात विरोधक यांना निवडणुका जिंकता येऊ नये असे पोटनियम दुरुस्त्या करणे, ( २ ) बँकेच्या रेकॉर्ड मध्ये बदल करणे , खोडसाळपणा करणे बदलविणे , ( ३ ) मागील दोन नोकर भरतीत गैरव्यवहार होऊनही नव्याने नोकर भरतीची मागणी करणे , ( ४ ) नव्याने बँकेसाठी जागा व बांधकाम करणे , ( ५ ) रोजंदारीवर मुख्यालय , शाखा , बँक पदाधिकारी व संचालक यांचे कडे व महिला बचतगट यांचे संगोपन चे नावाखाली प्रत्येक शाखेत महिला अधिकारी नेमणे असे २०० रोजंदार नेमून बँकेतून पगार काढणे , ( ६ ) बँकेचे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना ₹ २५ हजारावर पदाधिकारी यांचे सल्लागार नेमने , ( ७ ) खाजगी बँकांमध्ये ₹ ५०० कोटीची गुंतवणूक करणे , ( C ) NPA कमी करण्यासाठी चालु पीक कर्जाची वसूली थकीत कर्जात वळती करणे , ( ९ ) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेणे , ( १० ) केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे , ( ११ ) शेतकरी कल्याण निधीचा केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळी विभागाच्या योजना असतानाही राजकीय हेतूने फक्त ५ तालुक्यात ₹ ५८ लाखापैकी ₹ ५० लाखांचे निधी वितरण करणे , ( १२ ) मुख्य कार्यकारी अधिकारी नेमताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी घेण्याचे नाकारून , जाहिरात देण्याचे नाटक करून मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांचेवर दोन गंभीर आर्थिक गुन्ह्यांत विविध कलमांखाली गुन्हे दाखल असताना नेमणूक दिनांक ३१/०३/२०२१ ला करून RBI , NABARD व सहकार खात्याची दिशाभुल करणे , ( १३ ) अश्या गैरकृत्यात सहभागी पदाधिकारी , संचालक मंडळ सदस्य , मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन विभागाचे अधिकारी यांची चौकशी करणे . भारत सरकारचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी खासदार श्री बाळू धानोरकर यांना सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.