शेक्सपिअर आणि तुकोबा
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
फेसबुक लिंक http://bit.ly/3gwPCyF
23 एप्रिल रोजीच जागतिक ग्रंथदिन का साजरा होतो याचे मूळ काही घटनांमध्ये दडलेले आहे. जगद्विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन 23 एप्रिल रोजी असतो,आज जागतिक ग्रंथ दिन 23 एप्रिल गेली चारशे वर्षे शेक्सपिअरच्या नामाचा गजर जगातील सर्व सारस्वत आणि वाचक करत आहेत. आपल्या परंपरेत ‘ तुज सगुण म्हणो की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे ’ ही भावना आणि विचार रुजलेला आहे . त्याचप्रमाणे शेक्सपिअरला ‘ तुज क्लासिकल ( अभिजात) म्हणू की , रोमॅंटिक ( सौंदर्यवादी ) रे। क्लासिकल रोमॅंटिक एक गोविंदु रे ’ असेच संबोधावे लागेल . समीक्षेच्या चौकटी अभ्यासाच्या सोयीसाठी असतात .शेक्सपिअर समीक्षेच्या चौकटी भेदून दाहीदिशांत झेपावतो . त्याने मुक्तछंदाला मार्लोप्रमाणे हिमालयाची उंची दिली . सुनीत हा काव्यप्रकाराचा नवा फॉर्म आणला . मुक्तछंदातील शब्दांच्या ताणातून विलक्षण स्पंदने निर्माण केली . त्यांच्या नादातून आशयाचे अनंत विभ्रम दाही दिशात पोचविले . मानवी भावभावना , आशा -आकांक्षा , राग, लोभ, स्वार्थ , मानवता , क्रूरता , क्षूद्रपणा , नियती आणि माणूस यांचे संबंध प्रेम , मित्रत्व , कृतज्ञता , कृतघ्नता , निष्ठा , कष्ट , जिद्द , जीवनातील भयाणता आणि मांगल्य , आनंद आणि दुःख, योगायोग , मानवी प्रज्ञा आणि वेडेपणा , मानवी प्रकृती, विकृती , प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा एकमेकांत गुंतलेल्या आणि प्रत्येक क्षणी नव्या प्रश्नांची निर्मिती करणाऱ्या मानवी विभ्रमांचे हे विराट दर्शन आहे . म्हणूनच प्रत्येक पिढी शेक्सपिअरच्या वाङ्मयात नवा आशय शोधते .
तुकोबांनी मराठी भाषेत जसे योगदान दिले , तसे शेक्सपिअरने इंग्रजीला योगदान दिले . दोघेही कवी . दोघांच्याही जीवनाच्या आकलनात विश्वात्मकता आहे . तुकारामांनी ‘ अभंग ’ अभंग केला ; शेक्सपिअरने ‘ मुक्तछंद ’ अभंग केला . जशी गाथा आजही जीवनाला लागू पडतेⓂ
प्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते व मनस्वी कवी विंदा करंदीकरांना तर तुकाराम व शेक्सपीयर हे जिवाभावाचे मैत्रच वाटतात व ते एका कवितेत त्यांची भेटही नाट्यमयतेने रंगवतात. ती अशी :
तुकोबांच्या भेटी , शेक्सपीयर आला ;
तो जाहला सोहळा , दुकानात.
जाहली दोघांची , उराउरी भेट ;
उरातले थेट , उरामध्ये .
तुका म्हणे "विल्या, तुझे कर्म थोर ,
अवघाची संसार , उभा केला" .
शेक्सपीयर म्हणे, "एक ते राहिले ,
तुवा जे पाहिले , विटेवरी ."
तुका म्हणे, "बाबा, ते त्वा बरे केले;
त्याने तडे गेले , संसाराला .
विठ्ठल अट्टल , त्याची रीत न्यारी ;
माझी पाटी कोरी , लिहोनिया ,"
शेक्सपीयर म्हणे , "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले , शब्दातीत ."
तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
गड्या, वृथा शब्दपीट ;
प्रत्येकाची वाट , वेगळाली .
वेगळीये वाटे , वेगळाले काटे ,
काट्यासंगे भेटे , पुन्हा तोच ".
तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
कजागीण घरी , वाट पाहे ."
विंदा करंदीकर ( १९१८-२०१० )
आकाशा एवढ्या दोन श्रेष्ठ कवींनी, आपापले वेगळेपण जपत, एकसारखेच वैश्विक विचार कवीतेतून द्यावेत ह्याचे कौतुक मात्र रसिकांना कायमच भारून टाकील !