Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ३०, २०२१

इडली दिन

इडली दिन  


 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

दि. ३० मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/39qCmr2
    आज  आहे जागतिक इडली  दिवस.  ३० मार्च हा दिवस जगभरात इडली दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात इडली अतिशय लोकप्रिय आहे. इडली – सांबार हा प्रकार प्रत्येकालाच आवडतो. मुंबईत तर अगदी वडापाव प्रमाणेच इडलीवर जगणारे असंख्य लोक आहेत. सकाळी वेगवेगळ्या नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. याबरोबर डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो.

इडली दिन


इडल सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे.  इडलीचा जेव्‍हा विषय येतो तेव्‍हा  अप्रत्‍यक्षपणे साऊथचे म्‍हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. मात्र वास्‍तवात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते  ८०० ते १२०० इ.पूर्वमध्‍ये  भारतात इडली आली आहे. 'इडली' शब्‍दाची निर्मिती 'इडलीग' यापासून झाली होती. याचा उल्‍लेख 'कन्‍नड' साहित्‍यात आढळतो. 
जागतिक इडली दिवस मागच्‍या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 'एम एनियावन' यांनी केली. एम एनियावन हे 'मल्लीपू इडली'चे संस्‍थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्‍यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षीत खाद्य आहे. एनियावन यांच्‍या मते, फादर डे, मदर डे असे डेस आपण साजरे करतो त्‍याचप्रमाणे मला वाटले की, इडली दिवसपण साजरा करायला हवा. मात्र फेरीवाल्‍यापासून ते हॉटेलपर्यंत इडली विक्रेत्‍ये जागतिक इडली दिवस साजरा केला जातो याविषयी अजून म्‍हणावी तेवढी माहिती पोहचलेली नाही.,हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे.
 तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खातात. आंबवल्यामुळे इडलीची चव किंचित आंबट असते. दक्षिणी भारतात इडली भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. महाराष्ट्रामध्येसुद्धा ही इडली नाष्ट्यासाठी बनवली जाते. हल्‍ली रव्‍याची इडली देखील बनवली जाते.
कशी बनवायची इडली
३ वाट्या  तांदूळ किंवा  इडली रवा
१ वाटी उडीद डाळ
डाळ आणि तांदूळ किंवा  रवा  धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात तांदूळ किंवा  रवा  घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजाच्या पिठासरखे असावे.
हे बारीक केलेले पिठ एका मोठ्या पातेल्यात काडून  त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते.  इडली करत असताना यात चवीनुसार मीठ घालावे.  यानंतर इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे. वर दिलेल्या प्रमाणाअत साधारण ४०-४५ इडल्या होतात.

इडली म्‍हटले की सांबर आणि चटणी आलेच. यासाठी  लागणारे  साहित्‍य आणि कृती
साहित्‍य
१ जुडी कोथिंबीर
२-३ हिरव्या मिरच्या
१ मुठ शेंगदाणे
१/४ वाटी ओले खोबरे
अर्ध्या लिंबाचा रस
१/२ इंच आल्याचा तुकडा
मीठ, साखर चवीप्रमाणे
कृती  : वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे.  यानंतल चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.
सांबार  साहित्‍य आणि कृती
१ वाटी तुरडाळ
१ मोठा टोमॅटो
१ मध्यम कांदा
२ शेवग्‍याच्‍या शेंगा
लाल भोपळ्‍याचे १ काप 
२-३ टीस्पून सांबार मसाला
मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर – चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या
कृती  
डाळ, टोमॅटो, १/२ कांदा, शेवग्‍याच्‍या शेंगा, लाल भोपळ्‍याचे एक काप  कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.
आजच्‍या जागतिक इडली दिवसानिमित्त इडलीचा आस्‍वाद घ्‍यायला विसरु नका....
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.