Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २०, २०२१

ये गं ये गं चिऊताई

 ये गं ये गं चिऊताई 

२० मार्च २०२१
दिवसेंदिवस चिमणीची शहरात लक्षणीय घट होत असल्याचे समोर आले आहे. देशात चिमणीच्या पितकंठी चिमणी, घर चिमणी, जावा चिमणी, पहाडी चिमणी, वृक्ष चिमणी अशा पाच प्रजाती आहेत. यापैकी मराठवाड्यात दोन जातींच्या चिमण्या आढळतात. यामध्ये सामााजिक चिमणी (घरची चिमणी) ही मनुष्याजवळ राहते. भिंती, कौलारूंची घरे आदी ठिकाणी ती आपले घरटे (खोपा) बांधून वास्तव्य करीत असते, तर पितकंठ चिमणी (पिवळा गळा असलेली) ही जंगलात आढळते. ही चिमणी सहसा थव्याने वावरते. नराचे डोके राखाडी आणि गळा व छाती काळी असते. डोळ्यात काजळ घातल्याचा भास होतो. चिऊताई मात्र वरून तपकिरी, डोळ्यांवर फिकट भुवया व खालून शुभ्र असते. नर व मादी सहज वेगळे ओळखायला येतात. चिमण्यांचे खाद्य हे गवताच्या बिया, धान्य, अन्न, पिकांवरच्या अळ्या, झाडांवरचे कीटक आदी आहे. ज्या शहरात चिमण्यांची संख्या अधिक आहे, तेथील पर्यावरण उत्तम असते, असे जाणकारांचे मत आहे.शहरांमध्ये वाढत चाललेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. यामुळे कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी भुर्र उडाली. त्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठी काही पक्षी प्रेमींकडून जीवाचा आटापिटा सुरू आहे.
चिमणी दिन,
चिऊताई चिऊताई दार उघड’सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिमणी गेली कुठे असा प्रश्न पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून २० मार्च हा दिवस हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.
छोटा आकार, गब्दुल बांधा, आखूड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय; पण भक्कम कोनाकृती चोच ही चिमणीची ओळख आहे. देशात सर्वत्रच चिमणीचे वास्तव्य आहे. शहरात, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी प्रदेशात अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवलेले आहे; पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती म्हणजे चिमणी आहे.माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग (वेव्हज) हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, हे आता प्रयाेगानिशी सिद्ध झाले आहे. मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे. जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार २००० ते २०२० पर्यंत २० वर्षांत चिमणीच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट झाली आहे व यासाठी रेडिएशन हेही एक माेठे कारण आहे.- रेडिएशनमुळे चिमण्यांच्या घरटे बनविणे, प्रजनन आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून आले.शहरात मातीची भिंत किंवा कौलारू घरे पाहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला दिसत नाही. अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सिमेंटच्या जंगलात झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याने अपवादात्मक झाडे आपल्या नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे होणारी सकाळ आता केवळ आठवणींची स्थिती झाली आहे.वृक्षतोडीचा थेट घरट्यांवर विपरित परिणाम होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्याही घटत चालली आहे. संख्येत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या सूचित चिमण्यांना समाविष्ट करण्यात आले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.