आज १९ मार्च : World Sleep Day
🔹केव्हापासून साजरा केला जातो World Sleep Day
‘चांगली झोप, चांगलं आयुष्य, चांगलं जग’ हे निद्रा दिनाचं ब्रीदवाक्य आहे. World Sleep Society संस्थेच्या अंतर्गत २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो. निद्रा दिनाची तारीख दरवर्षी बदलत राहते, पण बहुतेककरून शुक्रवारचा दिवसच निवडण्यात येतो.गेल्यावर्षी हा दिवस १३ मार्चला साजरा करण्यात आला होता.तुम्ही म्हणाल की निद्रा दिन म्हणजे या दिवशी पूर्ण दिवस झोपा काढायच्या का? तर, तसं नाही. झोपेचं महत्त्व आणि त्याच्याशी निगडीत आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २००७ सालच्या पहिल्या निद्रा दिनाचं कारणच जगभरातील आरोग्य तज्ज्ञांना एकत्र आणून झोप या विषयावर चर्चा करण्याचं आणि त्याचं महत्त्व जगभर पोहोचवणं हे होतं. त्यानंतर पुढे हा प्रघातच पडला.
💥अशी आहे चांगल्या झोपेची नियमावली
- रोज ठरवलेल्या एकाच वेळेवर झोपावे आणि उठावे.
- दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त झोपू नये.
- झोपेच्या ४ तास आधी धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.
- झोपेच्या ६ तास आधी चहा, काॅफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नये.
- रोज ४ तास आधी खूप मसालेदार किंवा गोड जेवण करू नये. झोपेपूर्वी हलके जेवण चालेल.
- रोज व्यायाम करावा, पण अगदीच झोपेच्या आधी नको.
- बिछाना तसेच झोपेची खोली आरामदायी व हवेशीर असावी.
- आवाज किंवा उजेडामुळे झोप माेडणार नाही याची काळजी घ्यावी.
- झोपेची खोली फक्त झोपण्याकरिता व संबंधाकरिता वापरावी
उशीरात उशीरा साडे आठ वाजता जेवण संपले पाहिजे आणि अन्न पचनाची प्रक्रिया बरीचशी पूर्ण झालेली असली पाहिजे. अन्यथा नऊ साडेनऊ वाजता जेवण करून दहा वाजता झोपायला गेेलो तर पोटात गडबड सुरू राहते आणि झोप शांत लागत नाही. त्याचबरोबर रात्रीचे जेवण हलके असावे, हेही आवश्यक आहे. रात्रीचा चहा कधी घ्यावा? दिवसातला शेवटचा चहा नऊ वाजता घ्यावा. उशीरात उशीरा नऊ वाजता घ्यावा. खरे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर चहा, कॉङ्गी असे उत्तेजक पेय पिऊच नये. कारण उत्तेजक पेयाने तरतरी येत असते आणि झोप उडत असते. म्हणून नाईलाज झाला तरच ङ्गार तर नऊ वाजता चहा घ्यावा. त्यानंतर चहा घेतल्यास दहा वाजता झोपच लागत नाही. तेव्हा खाण्या-पिण्याची पथ्ये पाळूनच झोपेची उत्तम आराधना करावी लागते आणि तरच आरोग्य चांगले राहते.