- आदित्य ठाकरेंना वनमंत्री करण्यासाठी पर्यावरणवादी आग्रही
- नितीन राऊत यांच्या जागी नाना येणार
मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक असे तीन मंत्री पद बदल्याची शक्यता आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंना वनमंत्री करण्यासाठी पर्यावरणवादी आग्रही आहेत. विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर नाना पटोले हे ऊर्जा खात्याची जबाबदारी घेऊ पाहत आहेत.
विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर नाना पटोले यांना कॉग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले. आता हे ऊर्जा खात्याची जबाबदारी घेऊ पाहत आहेत. त्यामुळे विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा बळी जाण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्याने संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. सध्या या खात्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. या खात्यातील पूर्णवेळ मंत्री देण्याची मागणी पर्यावरणवादी करू लागले आहेत. आदित्य ठाकरेंना वनमंत्री करण्यासाठी पर्यावरणवादी आग्रही आहेत. तशी खुली मागणी राज्यभरातून होत आहे. राज्य वन्यजीव बोर्डाचे सदस्य बंडू धोत्रे यांच्यासह किशोर रिठे यांनीही तशी मागणी रेटून धरली आहे.