Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १९, २०२१

ऊर्जामंत्री राऊत यांच्याविरुद्धच्या तक्रारीची केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडून दखल

 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदा पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी दिल्लीनागपूरऔरंगाबाद हैदराबाद मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून मागविली आहे. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली.  राऊत यांच्या विमान प्रवासावरील खर्चाची राज्य वीज नियामक आयोगानेही चौकशी करावीअशी मागणीही श्री. पाठक यांनी यावेळी केली.

 

श्री. पाठक यांनी सांगितले कीलॉकडाऊन काळात राऊत यांनी वीज कंपन्यांच्या खर्चाने दिल्ली


हैदराबादऔरंगाबादनागपूरमुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाबाबत केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या संदर्भात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने चारही वीज कंपन्यांकडून राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागविला आहे. या मुळे राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वीज कंपन्यांचा महसूल आणि त्यांचा खर्च याबाबतीत निर्देश देण्याचा अधिकार असलेल्या राज्य वीज नियामक आयोगानेही राऊत यांच्या बेकायदा खर्चाची चौकशी करावीअशी मागणीही श्री. पाठक यांनी केली.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.