Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १५, २०२१

@MetroRailNagpur ५० टक्के प्रवासी क्षमतेने मेट्रो ट्रेन सुरु

 

विशेष सतर्कतामेट्रो सेवा


 ५० टक्के प्रवासी क्षमतेने मेट्रो ट्रेन सुरु


नागपुर: सोमवार पासून एक आठवडा शहरात ताळेबंदी लागू असताना देखील गरजवंतांकरता नागपुर मेट्रो रेल सेवा सुलभ और उपयुक्त सिद्ध होते आहे. ताळेबंदी दरम्यान महा मेट्रो तर्फे ५० टक्के यात्रि क्षमता प्रमाणे ऑरेंज आणि ऍक्वा लाइन वर मेट्रो सेवा सुरु आहे. कोरोना वायरस च्या प्रादुर्भावा मुळे आरोग्य सुरक्षा संबंधी आवश्यक उपाय योजना प्रभावी पणे लागू आहेत. विषम परिस्थिती दरम्यान नौकरीपेशा प्रवाश्यांकरता मेट्रो परिवहन सेवा उपयुक्त ठरते आहे.

कोरोनाच्या वाढत्या दुष्प्रभावामुळे शहरात ताळेबंद लागू केली आहे. आज (सोमवारी) लोकमान्य नगर, बंसी नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर कडे येणाऱ्या आणि जाणारी यात्री संख्या इतर दिवसांच्या तुलनेत कमी असली तरीही त्यात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) चे कर्मी आणि त्या भागातील रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि त्यांचे पारिजन अधिक होते.

सीताबर्डी ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास करणाऱ्या दिल्ली निवासी अपर्णा सिंग पहिल्यांदाच नागपुर मेट्रो ने प्रवास करीत होत्या. नोकरी संदर्भात इंटरव्यू करीता दिल्ली येथून त्या आल्या होत्या. नागपुरात ताळेबंदी असल्याचे समजल्याने त्या निराश झाल्या, पण परिचितांनी मेट्रो प्रवासासंबंधी माहिती दिल्यावर त्यांना धिर आला आणि त्यांनी मेट्रोने प्रवास केला. अपर्णा सिंग यांनी सांगितले कि देशातील अन्य महानगरांच्या तुलनेत नागपुर मेट्रोचे स्टेशन आणि इतर व्यवस्था अतिशय उपयुक्त आहे. सुरक्षा प्रति इतकी सजगता आणि सतर्कता इतर ठिकाणी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. इंटरव्यू च्या निर्धारित वेळे आधी पोचल्या बद्दल त्यांनी मेट्रो चे आभार व्यक्त केले.

महा मेट्रो च्या सर्वच स्टेशन वर येणाऱ्या प्रवाश्यांचे तापमान तपासत त्यांना सेनेटाईजर दिले जात आहे. या शिवाय खापरी, सीताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर स्टेशन येथे पोचल्यावर गाडीला सेनेटाईज करण्याकरता कर्मचारी तैनात आहेत. गाडी रवाना होण्या आधी प्रत्येक कोच मधील सीट, खिडकी, हैंडल बार, दरवाजा सेनेटाईज केला जातात. या शिवाय, खापरी आणि लोकमान्य नगर डिपो येथे पहले स्वयंचलित मशीनच्या माध्यमाने गाडीची आंतरिक और बाहरी सफाई करत संपूर्ण गाडीला सेनेटाईज केले जाते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.