२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिन
फेसबुक लिंक http://bit.ly/2QJZOcr
२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी एका मोठ्या पर्यावरण- रक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली. निमित्त होतं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा इथल्या तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचं! २२ एप्रिल १९७० साली अमेरिकेत दोन कोटी नागरिकांच्या उपस्थितीत पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला.युनायटेड नेशन्सच्या हवामान बदलासंबंधीच्या (UNFCC) एका रिपोर्टनुसार, येत्या काही दशकांमध्ये, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधील लाखो लोक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे आणि आरोग्याच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडतील असा अंदाज आहे. ऊन, वारा, थंडी, पावसाची अनिश्चितता, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्यामुळे येणारे पूर, भूकंप हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत.
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे
______________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
______________________________