मुघल बादशहा स्त्रियाना बंदिस्त (हरम) व्ययस्थेत कसे ठेवत ?
. 📯 दि.१९ जानेवारी २०२१ 📯
फेसबुक लिंक http://bit.ly/38SKReG
मुस्लिम बायकांचा निर्जनपणा(खाजगीपणा) कुराण मध्ये सांगितला आहे. घरात राहणे, बाहेर न फिरणे, पती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाशी संबंध न ठेवणे हे एका प्रतिष्ठित मुस्लिम बाई साठी अनिवार्य होते. दैवी अधिनियमाची शक्ती लाभलेला हा कायदा योग्य रित्या बजावण्यासाठी मुस्लिम बाईकांकरिता वेगळी बंद अंगणे आणि खोल्या बनविल्या जात, ज्या बाहेरील जगापासून वगळलेल्या असत. या ज्या जागा असायच्या त्यांना 'हरम' म्हणायचे.याला 'हरम-सेरा', 'हरम-गाह', 'महल-सेरा', 'राणीवास' असेही शब्द आहेत. पुढच्या काळात याला राजपूत राज्यात 'झेनानी दयोधि' असेही म्हणायचे.
हरमचा जो मुख्य अधिकारी असायचा त्याला 'नाजिर', 'नाजिर-इ-महल', 'ख्वाजा-सेरा'(Eunuchs, हिजरा) म्हणायचे.
मुघलांच्या हरम मध्ये वेगवेगळ्या भागांतून आलेल्या, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या असंख्य स्त्रिया असत. त्यांना अतिशय सुरक्षिततेत आणि खाजगीपणे 'पडद्यात' ठेवलेले असे. या संदर्भात एक म्हणही आहे की, 'एखादी बाई हरम मध्ये लग्न करून यायची ती मेल्यावर बाहेर पडायची'. हे अक्षरशः खरं असायचं. हरमातील बायकांचा राजा(बादशाह) सोडल्यास कोणत्याही पुरुषाबरोबर संबंध यायचा नाही. परपुरुषच काय, त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांना सुद्धा हरमात जाण्यास परवानगी नसायची.या सगळ्या प्रथा, परंपरा तिसरा मुघल सम्राट अकबराने चालू केल्या आणि पुढे त्याच्या वंशजांनी पाळल्या. अबुल फझल ने 'आईन-ई-अकबरी' मध्ये लिहिले आहे की, हरमाची सेवा करण्यासाठी अकबराने त्याच्या अतिशय विश्वासू माणसांना ठेवले होते. विविध श्रेणीचे अधिकारी हरम मधील कामं पाहत होते. स्वतः बादशाह या कामांमध्ये लक्ष घालायचे.
🔹'स्थापत्य रचना'
मुघल हरम भिंतींनी बंदिस्त असायचा आणि आतमध्ये इमारती असायच्या. प्रत्येक खोल्यांना पडदे असायचे. सगळ्या इमारतींच्या मधोमध मोठं अंगण असायचं. बागा असायच्या. कारंजी असायची.प्रत्येक इमारतीत शौचालयांची व्यवस्था असायची. तसेच काही शौचालये राहायच्या मुख्य भागाच्या बाहेरच्या बाजूस सुद्धा असायची.
🔹 संस्थागत रचना
मुघल काळात हजारो स्त्रिया हरम मध्ये राहिलेल्या आहेत. अबुल फजल लिहितो की अकबराच्या काळात ५,००० स्त्रिया हरम मध्ये होत्या. आत्ताच्या काळात असे गैरसमज आहेत की हरम मधील प्रत्येक स्त्रीचे बादशाहशी लैंगिक संबंध असायचे. पण असे नाही आहे. अकबरकाळातल्या ५००० बायकांपैकी फक्त ५ टक्के बायकांचा अकबरशी संबंध होता बाकी राण्यांबरोबरच्या दास्या, कामं करणाऱ्या बायकाही असायच्या.मुघल काही मुस्लिम जनानखान्यात पुरूष नसायचे कारण हे बादशाह कैक लग्न करायचे अकबर ने तर 4000 लग्न केलेलं.यांच्या बायका सेक्स बाबतीत असंतुष्ठ राहायचे .मग जनानखाण्यात जर इतर पुरुष ठेवले तर आणखी लफडी होईल अशी भीती मुळे खोजे राहायचे हे खोजे ठेवण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जगभरात आहे..भारतात तर या संदर्भात अस्सल ऐतिहासिक पुरावे सल्तनत काळाकाळापासून मिळतात..मुघलाच्या काळात बळबळजबरीने खोजा बनवल जायचे.त्याप्रमाणे जनानखाना राखण्यासाठी तृतीयपंथी नंपुसक लोक कमी पडतात म्हणून सशक्त तरूणानाच नपुसंक केल जायचे.त्यात पुन्हा हकीमानी किंवा वैद्यांना शारीरिक चाचणी घेऊन पुर्णपणे खोजा झाल्याची खात्री पटल्यानंतर अश्या त्यांना जनानखान्यात प्रवेश दिला जाई..परतु या खोजाना देखील जनानखान्यात स्त्रियाच्या भागात प्रवेश नसायचा..
या मुघल स्त्रियांना पडद्यातच राहावे लागे.जेंव्हा तीर्थक्षेत्र, किंवा पर्यटन किंवा स्वारी साठी जावे लागायचे तेंव्हा त्यांना पालखी मधून जावे लागे त्यांच्या आसपास अन्य पुरुष ऐवजी हे खोजे असायचे.मुघल जनानखान्यात किंवा हरम मध्ये सर्व सुविधा असायचे.बागबगीचे , कारंजे, लहान लहान दुकाने.प्रत्येक स्त्रीला स्वतःची खोली असायची.जेवण हे मुघलांच्या सेंट्रल kitchen माखताब मधून यायचे.त्यामुळे या मुख्य खोजाला सगळं जनानखाना घाबरायचा..इतकच काय बेगमाही त्याला घाबरायची..कधी कधी जनानखान्यात आडोसा पकडुन दासी व खोजाचे चाळे चालायचे..यात जर रंगेहाथ सापडला तर व्याभिचाराचा गुन्हा म्हणून थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची
ऐकेका जनानखाजनानखा 20 नंपुसक सेवेत असायचे या प्रत्येकाची कामे ठरवुन दिलेली असायची त्यात मुख्य खोजाला (तिला दरोगा अस म्हणायचे) मोठा मान होता..जनानखान्यातील कुठला खोजा चुकला तर तो थेट राजा सरदाराकडे तक्रार करायचा.
अरब आक्रमणानंतर भारतात जनानखान्यातील स्त्रिया या रशिया जार्जिया कर्कैशिया रोम सिरिया या भागातुन मागवायचे , औरंगझेब ची एक बायको तिकडची होती हिजडे ही तिथलेच मागवले जात..त्या काळात हिजड्याचा व्यापार तेजीत होता गुलामा पेक्षा, हिजड्याची किमंत इतर गुलमापेक्षा तीन ते चार पट असे.एखाद्या राजाचा पराभव झाला तर हजारो सशक्त माणसांना बीजे फोडून हिजडे बनवायचे.आणि युद्धामध्ये ही संपत्ती वेगळीच.प्रत्येक भागासाठी पवित्र(Virgin) महिला वरिष्ठ अधिकारी म्हणून ठेवलेल्या असत. त्यांना 'दरोघा' म्हणत. एक घडामोडी लिहीण्यासाठी 'नवीस' ठेवलेला असे.
हरम व्यवस्थे मध्ये खोजे(हिजडे) असायचे. नैसर्गिक खोजे संख्या कमी पडायची म्हणून हे मुघली तुर्क बादशाह चांगल्या सशक्त तरुणाचे बीज फोडायचे आणि खोजे बनवायचे.मुघल स्त्रिया, राण्या, राजकन्या या च्या सेवेसाठी पुरुष लोक ठेवायच्या ऐवजी हे खोजे ठेवायचे.फारशी शब्द आहे हरम आणि संस्कृत शब्द अंतःपुर.
त्यामुळे जसं मुघल दरबाराचे 'दप्तर' (ऑफिस) असायचं तसंच हरम दप्तरही असायचं. या हरम मधील सगळ्या बायकांचे पगार ठरलेले असायचे. आपल्याकडे अकबराच्या काळातील या हरममधील महिला अधिकाऱ्यांचे पगार माहित आहेत. त्यांना दरमहा साधारण रुपये १०२८ ते १६१० पगार असायचा.(त्या काळी साधारण ५ रुपयात अक्खा घर चालायचं!)
संदर्भ - आईन-इ-अकबरी
आभार-- अोंकार ताम्हनकर
༺━━━━━━━━━━━━━━━༻
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🎈
༺━━━━━━━━━━━━━━━༻