Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १७, २०२१

⚔गोदाजीराजे जगताप देशमुख⚔


                         

   गोदाजीराजे जगताप देशमुख                            

                                      

 

फेसबुक लिंक http://bit.ly/3bOn01G
सासवड परगण्याचे देशमुख ,
खळद बेलसर लढाईचे सरदार तसेच शेवटच्या काळात ३५००० मनसबदार सरनोबत गोदाजी राजे जगताप वतनदार तर्फ सासवड वीररुद्र पराक्रमी स्वामीनिष्टा श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द स्वराज्याची पहिली लढाई खळद बेलसर

गोदाजीराजे जगताप देशमुख

खानाची छावणी बेलसरनजीक आली. त्याची फौज म्हणजे नुसता पसाराच राजांचे सैन्य ते किती
महराजांचा एकूण जमाव तीन हजाराहून अधिक होता गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर, कारीचे बाजी कान्होजी जेध, हिरडस मावळचे बाजी बांदल देशमुख , कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव देशमुख,वेळवंड खोऱ्यातील बाबाजी डोहर देशमुख हे आपल्या जमावानिशी पुरंदरावर उपस्थित होते याशिवाय राजेंभोवती गोदाजीराजे जगताप देशमुख , भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, कावजी मल्हार यांसारखे तरुण रक्ताचे खंदे वीर गोळा झाले होते .
या लढाईत बाजी पासलकर यांना वीरमरण आले , बांदल देशमुखांचे २५० जन धारातीर्थी पडले
तसेच फतेह खानाचा सरदार मुसे खान याचा गोदाजी राजे जगताप यांनी सटकून पराभव केला .
जगतापांनी मुसे खानची गर्दन मारली
२)अफजलखान वध-
जावळीच्या लढाईत जेधे आणि बांदल यांच्या फौजांनी इतिहास लिहःला तर गोदाजी जगताप यांनी प्रतापगडावर रणकंदन माजवले ,
तसेच दक्षिण दिग्विजायामध्येत्यांनी अद्मुल च्या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवले .
३)संभाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने रायगडावर चढाई केली त्याचा सरदार शाहबुद्दीन याच्याशी गोदाजी जगताप यांनी दोन हात केले कावळ्या बावल्या च्या खिंडीत मोगालन विरुद्ध रान माजवले शाहबुद्दीन मागे हाताला आणि हि लढाई इतिहासत अमर झाली
१६७१ रोजी मोंगलांनी साल्हेर किल्ल्यावर आक्रमण केले. यावेळी साल्हेर वाचवण्यासाठी अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली. या लढाईत गोदाजी जगताप यांच्या सोबत त्यांचे बंधू संताजी व खंडोजी देखील होते. जगताप बंधूनी या लढाईत पराक्रमाची शर्थ केली.
औरंगजेब ने १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश ह्यांना औरंगजेबाने तुळापुर येथे हत्या केली. आता औरंगजेबाची पापी नजर फिरली ती रायगडाच्या दिशेने. त्याने रायगडा भोवतीचे फासे आवळण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले.
हीच संधी, सुवर्ण संधी ठरवण्याच्या हेतूने औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला जुल्फिकार खानच्या मदतीस धाडले. स्वराज्यावर धावून येणारे संकट पाहून माणकोजी पांढरे सारखे कर्मदरिद्री मराठे मोघलाना शामिल झाले. आई जगदंबा मदतीस धावून आली.
मोघलांचा व कपटी देशद्रोह्यांचा काळा डाव हेरखात्याने हेरला व तत्काळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावातील जिवाजी नाईक सर्कले व गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना सांगितला. स्वराज्यावर चालून येणारे संकट आणि त्याचे परीणाम लक्षात घेत हे दोन्ही वीर सोबत असलेले ९ मावळे घेऊन मोगलांना रोखण्यास सज्ज झाले.
वेगाने व सिंहाच्या छातीने सारे वीर खिंडीच्या दिशेने धावु लागले व बघता बघता खिंडीच्या तोंडाशी येऊन ठाकले. प्रत्येकाने आपल्या आपल्या हल्ल्याच्या जागा हेरल्या.
मराठमोळ्या गोफणी शत्रू सैन्यावर बरसण्यास तैयार झाल्या. आकाशातून जसा उल्कापात व्हावा तसा मराठ्यांचा गोफणी आता आग ओकत होत्या. भेटेल त्याला, भेटेल तेसे, कपात, तुडवत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर झालेल्या जखमा जमिनीवर रक्ताभिशेख करत होत्या. मणभर मोगली फौजे पुढे कणभर मराठे पुरून उरले.
काही मराठे वीर खिंडीत कमी आले. सेंदूर फासलेल्या हनुमंता सारखे सारे वीर दिसू लागले. ' रणचंडिका प्रसन्न झाली. ' मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळू लागले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या जुल्फिकार खानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्या नऊ योध्यांनी हाणून पडला आणि इतिहासात अजरामर झाले.
या लढाईत गोदाजी जगताप व जीवाजी नाईक यांनी खिंड रोखून धरली नसती तर इतिहास वेगळाच घडला असता. कदाचित महाराणी येसूबाई व संभाजी पुत्र शाहू राजेंबरोबरच छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे दोघेही मोंगलांच्या कैदेत गेले असते व मराठ्यांचे स्वराज्य १६८९ रोजीच नष्ट झाले असते. यावेळी स्वराज्य वाचवण्याचे महत्वाचे कार्य गोदाजी जगताप यांनी केले
नंतर मात्र गोदाजी जगताप यांचा इतिहासात उल्लेख सापडत नाही. त्यांचा मृत्यू कधी झाला याची देखील नोंद इतिहासात सापडत नाही. अशा या वीर सरदाराची समाधी सासवड येथे संगमेश्वर मंदिराजवळ आहे अशा शूरवीर गोदाजीराजे जगताप देशमुख यांच्या समाधीस नमन.                                       

गोदाजीराजे जगताप देशमुख
                                                                                                                                                     ⃣ ✍ 989o875498*            ⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.