भीषण आगीत इलेक्ट्रिकल दुकान जळून खाक, 15 ते 20 लाखाचे नुकसान, 6 तास आग सुरूच
मूल प्रतिनिधी
मूल शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या प्रमोद चतारे यांच्या मालकीचे इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागल्याने 15 ते 20 लाखांपर्यंतचे मोठे नुकसान झाले आहे.
काल रात्रौ 12 वाजताचे दरम्यान अचानक शार्ट सर्किट ने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीची माहिती होताच नगर परिषदेच्या अग्निशामकला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने आग विझविण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या विझविण्याकरिता लागल्या.
रात्रौ आग लागली असल्याचे कळताच श्रीसाई मित्र परिवाराचे सदस्य रोहित आडगुरवार, देवा गुरनुले यांनी धाडस दाखवित आग विझविण्याकरिता सहकार्य केले.
आग एवढी भयानह होती की काल रात्रौ 12 वाजता लागलेली आग सकाळपर्यंत सुरूच होती.ही आग 6 तास सुरूच होती.
आगीने रौद्र रूप धारण केल्याने भिंतीला भेगा पडून प्लास्टर पडले. इलेकट्रीकलचे दुकानातले वायर, फॅन, मोटार, कुलर, हिटर, सब मारशीबल पम्प आदी इलेक्टरणीक, इलेक्ट्रिकलच्या संपूर्ण वस्तू जळून खाक झाले. त्यामुळे प्रमोद चतारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती होताच मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, नगरसेवक प्रशांत समर्थ, प्रभाकर भोयर,चंदू चतारे, विवेक मुत्यलवार, किशोर कापगते, बंडू साखलवार आदी युवकांनी भेट देऊन आग विझविण्याकरिता सहकार्य केले.