Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १८, २०२१

विजयी मिरवणूकीवर बंदी, गैरवर्तन झाल्यास उमेदवार व पॅनल प्रमुखावर होणार कारवाई

विजयी मिरवणूकीवर बंदी, गैरवर्तन झाल्यास उमेदवार व पॅनल प्रमुखावर होणार कारवाई




पोलीस स्टेशन नवेगावबांधची पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि. 18 जानेवारी:-
आज 18 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी असून, विजयी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही. सध्या जिल्ह्यात कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा अमल चालू आहे.आपले गावात DJ किंवा साउंड बॉक्स/बँड लावून मिरवणूक काढणे,उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/घरासमोर जाऊन फटाके वाजवणे,गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत.जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून दोन्ही गटात भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास.सर्वस्वी उमेदवार व पॅनल प्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी सुचना नवेगावबांध पोलिस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी दिली आहे.
त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना अगोदरच कलम 149 फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील मोठ्या मनाने पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकरपणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असते. त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. याची पॅनल प्रमुख/विजयी उमेदवार/पराभूत उमेदवार यांनी दक्षता घ्यावी.असे आवाहन जनार्दन हेगडकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक
नवेगावबांध पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.