१५ ऑगस्ट रोजी "दिव्यांगांचा मान;
महापौरांनी केला सन्मान" उपक्रमाचा शुभारंभ
महापौरांनी केला सन्मान" उपक्रमाचा शुभारंभ
चंद्रपूर, ता. १३ : शहर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांकरिता दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात दिव्यांगांकरिता निधीची तरतूद करण्यात आली होती. या सानुग्रह निधीबद्दल चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार (rakhi kancharlawar) स्वतः दिव्यांगांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत. "दिव्यांगांचा मान; महापौरांनी केला सन्मान" या उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी रामनगर प्रभागातून होणार आहे.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांना हाल सहन करावे लागले. यातच दिव्यांग नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असते, अशा चंद्रपूर महानगरपालिकाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या दिव्यांग नागरिकांना मनपातर्फे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सानुग्रह निधी देण्यात येत आहे. एकूण १२५७ लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये एकूण २ कोटी ८५ लाख ६८ हजार ६०८ रुपयाचा निधी आरटीजीएसद्वारे अदा केला आहे. यानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार (rakhi kancharlawar) स्वतः सर्व दिव्यांगांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.
"दिव्यांगांचा मान; महापौरांनी केला सन्मान" या उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी रामनगर प्रभागातून होणार आहे. १०० टक्के दिव्यांग असलेल्या रामनगर प्रभागातील मित्रनगर येथील संजय डवरे व मंजुषा डवरे या दोन भावंडांना सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर ४० ते १०० टक्के दिव्यांगाच्याही घरी जाऊन, सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्यासह संबंधित प्रभागातील नगरसेवकांची उपस्थिती राहणार आहे.