Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १२, २०२०

पावनखिंड काय आहे

  पावनखिंड काय आहे

_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.
विशाळगड व पावनखिंड ही इतिहासातील महत्वाची घटना.पन्हाळयावरून सुटका करून महाराज विशाळगडाकडे रवाना झाले त्यावेळी रांजेचा पाठलाग सिध्दी मसुदच्या सैन्याने केला. या सिध्दीच्या सैन्याची वाट अडवुन महान पराक्रम बाजीप्रभु देशपांडेनी केला तीच पावनखिंड.
पावनखिंडीस अगोदर घोडखिंड म्हणत असत. बाजीप्रभुनी आपल्या निवडक ३०० मावळयासह हजारोच्या सैन्यास अडवुन ठेवले.
व आपल्या रक्ताने  न्हाऊन ती घोडखिंड पावन केली म्हणुन ती पावनखिंड. तो दिवस म्हणजे १२ जुलै १६६०.
बाजीप्रभुंच्या मुत्युअगोदर काही तास आणखी एका योध्दयाने आपले प्राण स्वराज्यासाठी दिले ते वीर शिवा काशिद यांनाी.
या वीर योध्दयाना शतश: नमन.!

(पावनखिंडीचे काही फोटो )



पावनखिंड काय आहे




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.