येवला प्रतिनिधी , विजय खैरनार
येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात हरीण काळवीट यांची संख्या हि मोठ्याप्रमाणावर आहे पावसाळा म्हणजे एक जणू जिकडे-तिकडे हिरवेगार असे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. हे सध्या निसर्गाने एक किमया केली न्यारी असे म्हणणे वावगे ठरणार नाही राजापूर ममदापुर राखीव वन क्षेत्रांमध्ये हिरवळ एक मनाला भुरळ घातली आहे असे चित्र सध्या राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धनामध्ये आहे. हरीण काळवीट यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असून हरीण काळवीट हे निसर्गरम्य परिसरात हिरवळीने नटलेल्या जंगलात फिरताना दिसत आहे. मुक्त संचार करीत असून हिरवे हिरवे गार गवत व जिकडे तिकडे पाण्याने तुंबलेले डूबके अशी चित्र राजापूर ममदापुर राखीव वन संवर्धनामध्ये पाहायला मिळत आहे .मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरीण काळवीट यांना खाण्यासाठी चांगल्या प्रकारे गवत असून हरीण मोठ्या आनंदात गवत खातात व तेथे मनमुराद असा आनंद घेताना दिसत आहे यावर्षी चांगल्या प्रकारे वरुणराजाने हजेरी लावली असल्याने हरणांना आणि काळवीटाना अन्न व पाण्याचा प्रश्न हा मिटला आहे राखीव वन संवर्धन झाल्यामुळे हरणांना चांगल्याप्रकारे गवत खाण्यासाठी उपलब्ध झाले असून पिण्यासाठी डोंगरात चांगले पाणी उपलब्ध आहे राजापूर ममदापुर राखीव वनसंवर्धनला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभलेले आहे .परिसरात राजापूर ,ममदापूर ,सोमठाण जोश ,खरवंडी, देवदरी, कोळगाव, आधी गावांचा समावेश होतो परिसरातील गावातील मिळून साडेसात हजार हेक्टर क्षेत्र जमीन आहे यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापूर राखीव हा प्रकल्प तयार केलेला आहे प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी पथके असून राजापूर ममदापुर राखीव वनसंवर्धनात मनोरे उभारले आहे. पर्यावरण व मनमोहक असे लांब जंगल आहे. हरिण काळवीट त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याने वन विभागाने विविध ठिकाणी पाणवठे तयार केलेले असून यावर्षी पाऊस चांगला असल्याने प्रत्येक पाणवठयामध्ये चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध आहे व राजापूर ममदापुर वन संवर्धनामध्ये हिरवे हिरवेगार गवत खाण्यासाठी उपलब्ध असून वनविभागाचे कर्मचारी योग्यप्रकारे विभागात वेळोवेळी लक्ष देत आहेत व जंगलात हरणांना पोटाची खळगी भरण्यासाठी हिरवे हिरवे गार गवत खाताना व जंगलात आनंद लुटताना दिसत आहेत हरीण काळवीट हे निसर्गरम्य परिसर स्वच्छ मनमोहक दिसणारी सुंदर अशी हिरवेगार रानात त्यांची झुंजीचा आनंद लुटताना दिसत आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असे गोजिरवाण्ये जंगल राजापूर ममदापूर वन संवर्धन मध्ये पाहण्यासाठी मिळते आहे.