Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

तालुका अध्यक्षपदी माधुरी कोरडे तर सचिवपदी लक्ष्मण जोशी यांची निवड 


जुन्नर /आनंद कांबळे(वार्ताहर) (junnar Khabarbat)  : नाशिक येथील ऐतिहासीक १ लाख लोकांचे महामुक्काम असेल, वाडा येथे आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला घातलेला ७० हजार आदिवासी जनतेचा महाघेराओ, शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठीचा ऐतिहासीक शेतकरी संप. नाशिक ते मुंबई असे झालेले दोन लाँगमार्च. आणि दिल्लीच्या चारही सीमांवर वर्षभर आंदोलन करुन मोदी सरकारला मागे घ्यायला लावलेले तीन काळे कायदे. दुध ऊस दराबाबतची आंदोलने अशी देशभर आणि राज्यभर शेतकरी, शेतमजुर आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी मांडून काम करणाऱ्या किसान सभेचे आज जुन्नर तालुक्याचे तिसरे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना आंनद वाटतो आहे, असे उद्गार शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी काढले.

अखिल भारतीय किसान सभा, जुन्नर तालुका समितीचे त्रेवार्षिक अधिवेशन आज (दि.७) रोजी प्रभाकर संझगिरी भवन, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी अधिवेशनास उद्घाटनापर ते बोलत होते. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

पुढे लांघी म्हणाले, सरकारी यंत्रणांच्या चौकशीला घाबरुन शांत बसलेले विरोधक आणि भांडवलदारांच्या बाजुने निर्णय घेणारे केंद्र सरकार. यामुळे महागाई, बेरोजगारीने कळस गाठलेला आहे. याला विरोध करण्यासाठी किसान सभेला बळ देण्याचे आवाहन ही त्यांनी केले. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी सत्रात 2016 - 2022 या वर्षातील कार्यात्मक, संघटनात्मक अहवाल अधिवेशनासमोर ठेवण्यात आला. यावेळी अहवालावर चर्चा आणि सूचना होऊन अहवाल पारीत करण्यात आला. तसेच या अधिवेशनादरम्यान विविध प्रश्नांना घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आला ‌‌.

या अधिवेशनाने शेतमालाला हमीभाव देणार कायदा करा, शिक्षण, आरोग्य आणि अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भातील लढा तीव्र करा, मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी करा, आदी ठरवा एकमताने पारीत करण्यात आले. तसेच या अधिवेशनाने पुढील तीन वर्षांसाठी 19 नवीन कार्यकारिणीची निवड केली.  Junnar Taluka All India Kisan Sabha

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

अध्यक्ष - माधुरी कोरडे
सचिव - लक्ष्मण जोशी
कार्याध्यक्ष - कोंडीभाऊ बांबळे
उपाध्यक्ष - मुकुंद घोडे
सहसचिव - शंकर माळी
खजिनदार - नारायण वायाळ
सदस्य - विश्वनाथ निगळे, संदीप शेळकंदे, मंगल रढे, मनीषा कोकणे, दीपक डामसे, अनिल ढेंगळे, मारूती महाराज सुपे, अशोक दिवटे, विनायक सरोगदे, गणेश मराडे, सचिन मोरे, किसन घोडे, सुनीता भोईर.

समारोप सत्रात बोलताना किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांवरील अन्याय, शोषणाविरुद्ध किसान सभा लढा देत आहे. आजही इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांनीही हाती घेता आला नाही, तो किसान सभेने तडीस नेला. आता पर्यावरण नियमावलींचे कारण देत पुन्हा आदिवासींनी जमिनीवरून हद्दपार करण्याचा डाव आहे. 

मनरेगा कायदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दबावामुळेच देशात अस्तित्वात आला, मनरेगा ची कायद्याची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे. हिरडा हे आपल्या तालुक्यातील पश्चिम आदिवासी जनतेचे उत्पादनाचे स्त्रोत आहे, हिरड्याला योग्य भाव आणि आदिवासी महामंडळाकडून हिरडा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या काळात लढा तीव्र करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुढारी हे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार व जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासकीत पातळीवर मांडण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी पाठविण्याचा निर्धार करूयात, असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.




(junnar Khabarbat)  


रविवार, एप्रिल ०३, २०२२

पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी घसरली; बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली |

पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी घसरली; बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली |

लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयनगर दरम्यान धावणारी पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी आज दुपारी ३.१५ च्या सुमाराला नाशिक जवळ लहवीत आणि देवळाली स्थानकांदरम्यान घसरली. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघात सहाय्य आणि बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली आहे.


नाशिकजवळ लहवीत - देवळाली दरम्यान 11061 एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेसचे ११ डबे घसरुन अपघात , काही जण जखमी

अधिक मदतीसाठी मध्य रेल्वेकडून हेल्पलाईन क्रमांक जारी नाशिक - ०२५३-२४ ६५ ८१६. भुसावळ - ०२५८-२२ २० १६७. आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी ५४१७३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेल्पलाईन क्रमांक रेल्वे -५५९९३ दूरध्वनी क्रमांक ०२२-६७ ४५ ५९ ९३ एमटीएनएलचा हेल्पलाईन क्रमांक : ०२२-२२ ६९ ४० ४०.


The Pawan Express train running between Lokmanya Tilak Terminus and Jayanagar derailed near Lahavit and Deolali stations near Nashik at around 3.15 pm today. As a result, railway traffic has been disrupted. Accident aid and rescue vehicle, medical van has reached the accident site.


मिरज सांगली पुणे मार्गावर #पॅसेंजररेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापुर पुणे पॅसेंजर 11 एप्रिल पासून तर मिरज कोल्हापूर सांगली कोल्हापूर पॅसेंजर गाड्या 15 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोल्हापुर पुणे मिरज दरम्यान काही थांबे रद्द करण्यात आलेआहेत.

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

 संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन | Book Publications

संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन | Book Publications

 संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन


जुन्नर /आनंद कांबळे 

 नाशिक येथील प्रसिद्ध डाँक्टर संजय दामू जाधव यांच्या मातोश्री तुळसाबाई दामू जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने  संघर्ष योध्दा पुरस्कार व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन येत्या १२डिसेंबर रोजी म्हसरुळ (नाशिक) येथे होत आहे.

     प्रा. धम्ममसंगिनी रमागोरख ( विभाग प्रमुख ,महिला विकास प्रमुख  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ) यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

     संघर्ष योध्दा पुरस्कार भगवानभाऊ  ठाकरे (परिवर्धा ता.शहादा जि.नंदूरबार ) यांना देण्यात येत आहे, ठाकरे गेली ५०वर्षे सालदार म्हणून काम करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापित लोकांच्या विरोधात पँनेल उभे करुन निवडून आणले.म्हणून विरोधकांनी त्याचा एक हात व एक पाय तोडला.

तरीसुद्धा न घाबरता ते आदिवाशी व आंबेडकर जनतेचे संघटन व कबीरांचे दोहे म्हणून समाजप्रबोधन करत आहेत असे डाँ.संजय जाधव यांनी सांगितले.

  या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१

अंगणवाडीताईंनी एकत्र येवून पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती

अंगणवाडीताईंनी एकत्र येवून पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती

पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी मेहनत घेणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका : अन्नपूर्णा  जगदीश अडसुळे  



नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ हा शहरी भागातील १०० अंगणवाडी केंद्रा़चा प्रकल्प त्यातही नाशिक महानगरपालिका, मनमाड, येवला व भगूर या नगरपालिका क्षेत्रात कार्यक्षेत्र असलेला हा प्रकल्प आहे...या प्रकल्पाने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियानात सातत्यपूर्ण कामकाज केलेले आहे..त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा सेविका, मुख्यसेविका या टिमचा आॕगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर महिला व बाल विकास मंत्री मा. स्मृती इराणी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

.आजही या प्रकल्पातील अंगणवाडीताई याच उत्साहाने कामकाज करत आहेत..याची प्रेरणा या ताईंना अन्नपूर्णा जगदिश अडसुळे  या अंगणवाडी केंद्र क्र.६७ मनमाडच्या अंगणवाडीताईने दिली...आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर जनजागृती कशी करावी हा प्रश्न असतांना या प्रकल्पातील ताईंनी एकजूटीने नियोजन करुन हा प्रश्नही मार्गी लावला आहे...काही अंगणवाडीताईंनी एकत्र येवून सोशल मिडियाचा वापर जनजागृती करण्यासाठी करायचे ठरविले व त्यांनी उपयुक्त असे छोटे- छोटे व्हिडीओ तयार केलेत..हे व्हिडीओ लाभार्थी पालकांपर्यंत पोहोचविले जात आहेत..आज ही हे काम सुरु आहे..यासाठी या सर्व ताई आपले अंगणवाडी केंद्राचे मुळ कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवसासह अतिरिक्त वेळ देवून हे व्हिडीओ तयार करत आहेत. यासाठी अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, सविता तायडे, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव, अलका लोखंडे या अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत. आतापर्यंत १२ व्हिडीओंचे काम पूर्ण झाले असून हे सर्व व्हिडीओ सोशल मिडियाद्वारे जनजागृतीसाठी वापरले जात आहेत..लाभार्थी व पालक, परिसरातील नागरिक यांचेकडून या कामाचे कौतुक केले जात आहे..हे सर्व व्हिडीओ बनविणेसाठी या अंगणवाडी सेविकांना पुष्पा वाघ व शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे..राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त अन्नपूर्णाताई अडसुळे यांचे संपूर्ण कुटुंबच नाशिक (नागरी) २ प्रकल्पाला याकामी स्वेच्छेने मदत करत आहे..

गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत





प्रतिनिधी/मालेगाव
चिपळूण महाड संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज होती, ही गरज ओळखून मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे तातडीने मदत गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जमा झालेल्या मदतीचे योग्य रीतीने किट्स तयार करून या मदत किट्स चे चिपळूण महाड येथील पूरग्रस्त बांधवाना योग्य रीतीने मदत पोहोच केली. २०१९ वर्षी कोल्हापूर सांगली येथील महापुरात देखील शहीद भगतसिंग सेनेतर्फे अश्याच प्रकारची मदत करण्यात आली होती. यावेळी शहिद भगतसिंह सेनेचे अध्यक्ष ललित बेडेकर, आंशुराज राजेंद्र पाटिल,सुरज कांबळे , यश रणधिरे, आकाश कांबळे , सुशिल कांबळे ,प्रविण बेडेकर ,रुषिकेश सोनवणे, आमोल खैरणार , विनोद पगार, पवन याळीज, पुस्कर शिंदे ,सागर याळीज , आदिसह उपस्थित होते

अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे पार पाडण्याचा शहीद भगतसिंग सेनेचा मानस आहे.