Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०२, २०२१

शिवशाहीतील अज्ञाताचा शोध -जिंतीकर भोसले

.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले  

सोलापूर करमाळा तालुक्यातील मौजे जिंतीगावची छत्रपतींची थोरली गादी

दि. २ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/336VCpT
जिंती,ता. करमाळा,जि सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या पेक्षा मोठे बंधू होते. त्यांचे नाव(थोरले) संभाजी असे होते. कनकगिरिच्या युध्दात शहाजीराजे सोबत लढताना त्यांचा मृत्यू झाला.यावेळी शहाजीराजे,संभाजी व अफजलखान हे सरदार विजापूर आदिलशहाच्या पदरी नोकरीत होते,कनकगिरिच्या युध्दात अफजलखानाने कपटाने थोरले संभाजी यांना ठार मारले व ते लढाईत धारातीर्थी पडले असा देखावा केला.पुढे याचा बदला छ शिवाजी महाराज यांनी घेतला हा भाग वेगळा.आपण जिंतीकर भोसले यांचेविषयी जाणुन घेत आहोत.छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या शाखेबरोबरंच तंजावरच्या भोसले घराण्याची देखील महाराष्ट्राला ओळख आहे. परंतु महाराष्ट्रातच असणारी छत्रपतींचे थोरले बंधू थोरले संभाजीराजे यांची शाखा महाराष्ट्राला पूर्णपणे अज्ञात आहे.याचे कारण म्हणजे हे थोरले संभाजीराजे अल्पवयातच मारले गेले असा एक समज इतिहासाकारांनी करून घेतला/दिला, त्यामुळे हे घराणे व त्यांचे कर्तुत्व कायम अज्ञातंच राहिले. मोठ-मोठया इतिहासाकारांनी देखीला या थोरले संभाजीराजे घराण्याचा परामर्ष घेतला नाही, बखरकारांनी अज्ञानातून जे चित्र रेखाटले त्यामुळे या घराण्याचा फारसा विचार झाला नसून, काही माहिती पुढे आली, तीदेखील चुकीची ठरली.            

हाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरले संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र,‘राधामाधवविलासचंपू’ कर्त्या जयरामने या थोरल्या संभाजीराजांचा उल्लेख ‘ युवराज संभाजीराजे’ असा केलेला आहे.मराठयांच्या इतिहासात प्रमाण मानल्या गेलेल्या सभासदाने आपल्या बखरीत या थोरल्या संभाजीराजांच्या जन्माचा उल्लेखदेखील केलेला नाही; फक्त अफजलखान प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तोंडी या थोरल्या संभाजीराजांच्या मृत्युचा उल्लेख सभासद करतो.चित्रगुप्त, एक्क्याण्णवकलमी बखर, मराठी साम्राज्याची छोटी बकर, शेदगावकर भोसले बखर, श्री शिवदिग्विजय, शिवाजीप्रताप यामध्ये थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख आलेला आहे.याबरोबर बृहदीश्वर शिलालेखात काही माहिती विस्ताराने सापडते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,परमानंदाने आपल्या शिवभारतात शहाजींना जिजाऊ पासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले.त्यापैकी थोरले शंभू व शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले असा उल्लेख केलेला आहे.फारसी साधनात बादशहानाम्यात थोरल्या संभाजी राजांचा उल्लेख दोन हजारी मनसबदार असा दिसतो. थोरल्या संभाजीराजांचा बहुतेक काळ कर्नाटकात गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा संबंध आला नाही. त्यामुळे नंतरच्या काळातदेखील मराठयांच्या इतिहासात त्यांचे उल्लेख आढळत नाहीत व अज्ञाताचे हे गूढ वाढतंच जाते.एक्क्याण्णव कलमी बखरीत थोरल्यासंभाजीचा पुत्रौमाजी याचा उल्लेख एकदा आलेला आहे.याशिवाय अन्य बखरकारांनी थोरल्यासंभाजीराजांच्या पुत्रांचा उल्लेख केलेला नाही.
परमानंदाने देखील शिवभारतात थोरलेसंभाजी व जयंतीबाई यांच्या विवाहा विषयी विस्ताराने लेखन केले असले तरी त्यांच्या मुलाविषयी मौन पाळलेले आहे.शेडगावकर भोसले बखरीत तर ‘त्यांच्या पोटी संतान नाही’ असा उल्लेख सापडतो. बृहदीश्वर शिलालेखात थोरल्या संभाजीराजांचा पुत्र उमाजीचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे. त्याचबरोबर उमाजींचा पुत्र परसोजी याचा जन्म झाल्याची नोंद या शिलालेखात सापडते.
याशिवाय अफजलखान-वधाच्या पोवाडयात उमाजींचा उल्लेख आलेला आहे. उमाजीचा या पोवाडयामधील उल्लेख थेट थोरल्या संभाजींचा पुत्र असा जरी नसला तरी ‘पुतण्या उमाजी राजाला’ (म्हणजे शिवाजी राजांना) असा आलेला आहे.
बृहदीश्वर शिलालेखानुसार थोरल्या संभाजींना जयंतीबाई खेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया असल्याची माहिती मिळते,उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे दत्तक पुत्र नव्हते हे जेधे शकावली मधल्या नोंदीवरून सिद्ध होते. जेधे शकावली मध्ये उमाजींचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ ला झाला अशी नोंद मिळते.
शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती.ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो.
उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता.त्यांचा देखील एक हुकूम उपलब्ध आहे.मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.
उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.मराठी साधनात मात्र यांचे उल्लेख नाहीत.
उमाजी या एकाच थोरल्या संभाजीपुत्राचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आला, त्यांची शाखा महाराष्ट्रार विस्तारली म्हणून त्याची काही माहिती मराठयांच्या इतिहासात मिळते.थोरल्या संभाजीराजांची पत्नी जयंतीबाई यांचेच दुसरे नाव मकाऊ होते असा *गैरसमज* काही इतिहासकारांच्या लेखनामुळे रुढ झालेला आहे.
ऐतिहासिक वंशावळी मध्ये देखील मकाऊ या थोरल्या संभाजीराजांची पत्नी असल्याचा उल्लेख येतो.
ही वंशावळ इनाम कनिशन पुढे ग्राह्य ठरलेली आहे. वास्तवात गोष्ट अशी की, जयंतीबाई या विवाहानंतर थोरल्या संभाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात कोलारप्रांती गेल्या त्या अखेरपर्यंत तिकडेच होत्या.
थोरल्या संभाजीराजांच्या मृत्यु नंतर देखील कोलार तालुक्यात जयंतीबाईंनी केलेल्या दान व बक्षिसाचे पुरावे ही बाब सिद्ध करतात.
जयंतीबाईंनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा इ.स.१६९३ चा आहे. म्हणजेच जयंतीबाई या १६९३ पर्यंत हयात होत्या व त्या कर्नाटकात वास्तव्य करून होत्या हे ठामपणाने सांगता येते.
दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ.स १७४० पर्यंत जिंतीचा कारभार करताना दिसतात.
त्यांची समाधी देखील जिंती या गावी आहे. यावरून जयंतीबाई व मकाऊ या दोघी एक नव्हेत हे सिद्ध होते
सासू आणि सून यांची बखरकारांनी गल्लत केलेली आहे. मकाऊ या थोरलेसंभाजीराजे यांचे पुत्र उमाजी भोसले याचीं पत्नी होत्या. यांस बहादूरजी नावाचा पुत्र होता,
परंतु त्याच्यानंतर मकाऊने भांबोरेकर भोसले घराण्यातील परसोजी हा दत्तक घेतला.
हे परसोजी म्हणजे शहाजीराजांचे चुलतभाऊ परसोजी यांचा पणतू, यांच्यापासून जिंतीकर बोसले घराण्याचा वंश पुढे वाढला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे यांच्या महाराष्ट्रात वाढलेल्या वंशाचा इतिहास असा आहे. भोसले घराण्याची जी पाटीलकीची गावे वंश परंपरागत आलेली होती त्यापैकी जिंती हे एक होते. बादशाही कागदपत्रात मकाऊचा उल्लेख मकुबाई पाटलीण जिंतीकर असा येतो. नात्याने मकुबाई शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या, त्यांचा स्नेह शाहू दप्तरातील कागद पत्रांतून वारंवार दृष्टीस पडतो.
शाहूनी वेळोवेळी आपल्या या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसते.मकाऊस काही अडचण आल्यास ती निवारण करण्याचे आदेश शाहूनीे आपल्या कमाविस दारास दिलेले दिसतात. शाहूछत्रपती मोगलांचे कैदेत असताना छत्रपती राजारामांनी मकाऊस धनाजी जाधवाकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते.
इ.स.१७३० च्या सुमारास मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकर याने जिंती गावास व मकाऊस काही उपद्रव केला.
त्या वेळी बादशहाने निंबाळकरास मकाऊस उपद्रव न करण्याची तंबी दिल्याचे पत्र जिंती दप्तरात पहावयास मिळते.

शिवशाहीतील  -जिंतीकर भोसले

इ.स.१७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आपल्याया आदर्श कारभाराने मकाऊ देवत्वास पोहोचल्या.
आज जिंती गावात त्यांचा उल्लेख मकाई असा केला हातो. ग्रामस्थ तिला देवी मानतात व दरवर्षी त्यांची जत्रा भरते.
थोरले संभाजीराजे सोलापूर, पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या जिंती गावात आजही मकाऊचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे,त्यात थोरल्या संभाजीराजांच्या या शाखेचे विद्यमान वंशज राहतात.
वाडयाच्या तटाची बरीच पडझड झालेली आहे, परंतु सतराव्या शतकातील वैशिष्टये दाखविणारे महाद्वार अजून चांगल्या अवस्थेत आहे.

चिरेबंदी असणार्याय या महाद्वारावर वरच्या बाजूल लाकडातंच सुबक अशी गणेशपट्टी कोरलेली आहे. या मधील गजानन हा ऋद्धीसिद्धी सहित असून उजव्या सोंडेचा आहे. बाजूला दोन्हीकडे सुबक अशी वेलबुट्टी कोरलेली आहे. गणेशपट्टीच्या वर असणारा भाग हा पातळ विटांत बांधलेला असून विटांमध्ये नक्षीकाम केलेले आहे.
वाडयाच्या अंतर्भागात मोठी पडझड झालेली असून आतील सर्व बांधकाम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. वाडयाच्या खालच्या भागात असणारे भुयार मात्र अगदी चांगल्या अवस्थेत आहे. याची उंची साधारणत: सात-साडेसात फूट एवढी आहे. याचे बांधकाम अगदी चिरेबंदी असे आहे. यात आत उतरण्यास दोन्ही बाजूंनी जिने आहेत. या भुयाराच्या भिंतीमध्ये कोनाडे काढलेले असून त्यामध्ये खजिन्यासाठी रांजण बसविलेले आहेत.
जिंती गावच्या शेजारी एका चौथार्याचवर या गावची पाटलीण मकूबाई भोसले जिंतीकर उपाख्य मकाईची एक छोटेखानी अशी समाधी आहे.
एवढीच आज या गावात मकाऊची स्मृती आहे.
गावातले आणि आसपासची काही बांधकामे सतराव्या शतकाची वैशिष्टये बाळगून आहेत.
मराठयांच्या इतिसात जिंती गाव आणि जिंतीकर भोसले घराणे यांची फारशी दखल घेतली गेलेली नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
श्रीशिवछत्रपतींचे थोरले बंधू थोरलेसंभाजीराजे हे आदिलशाही मनसबदार होते. कर्नाटकात शहाजीराजांचे व त्यांचे वास्तव्य हे एखाद्या स्वतंत्र राजासारखे होते,
परंतु काळओघात महाराष्ट्रात ही शाखा असूनदेखील ती आज अशी अज्ञातात आहे.
जिंती गावात आजदेखील मकाऊसाहेबांचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे. वाड्याच्या तटाची बरीच पडझड झाली आहे. परंतु १७व्या शतकातील वैशिष्ट्ये दाखवणारा महाद्वार अजून देखील चांगल्या अवस्थेत आहे. थोरल्या संभाजी महाराजांचे सध्याचे वंशज 'राजेभोसले' ह्या वाड्यात राहतात.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.