Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ३०, २०२०

आटपाडी जवळच्या खवासपूरात औरंगजेबाचा पाय मोडुनतो लंगडा झाला होता.

 आटपाडी जवळच्या  खवासपूरात औरंगजेबाचा पाय मोडुनतो लंगडा झाला  होता.  

.        दि. ३० आॅगष्ट २०१९
फेसबुक लिंक https://bit.ly/32wRy1m
        त्या वेळी औरंगजेब मराठा स्वराज्य काबीज करण्याच्या ध्येयाने पिसाळला होता. स्वराज्याचा एक एक मावळा अखेरची खिंड लढत होता. याच काळात औरंगजेब सातारा सांगली परिसरात होता. नेमका या वेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्यांना महापूर आला आणि औरंगजेबाचे न भरून येणारे नुकसान झाले.
औरंगजेबाची छावणी खवासपूर(सांगोला) येथे माण नदीच्या दोन्ही तीरावर सप्टेंबर १७०० रोजी पडली होती. मराठी मुलकात पावसाळा संपत येण्याची ही वेळ. त्यात सांगोला तालुक्यातून वाहणारी ही माण नदी फार मोठी नदी नाही. पावसाळ्यात चार दोन दिवस पूराचे पाणी आले तरी बस्स !
इस १७०० मध्ये औरंगजेबाने सातारा जिंकला. त्यानंतर तो मिरजेकडे येण्यासाठी निघाला भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे तो १२ सप्टेंबर रोदी खवासपूर येथे पोहचला. या भागात त्याचा मुक्काम होता. सैनिक, हत्ती, घोडे, उंट, मोठ्या प्रमाणात शाही सामान असा औरंगजेबाचा लवाजमा त्याच्या सोबत होता.
माण नदीच्या दोन्ही तीरांवर बादशाही सरदार, मनसबदार यांच्या छावण्या, तंबू, राहुट्या पडल्या होत्या. खुद्द माण नदीच्या पात्रात देखील काही सरदारांच्या राहुट्या पडल्या होत्या. यावेळी माण नदीचे पात्र कोरडे होते.
माण नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकड्यात ता.१ ऑक्टोबर १७०० चे रात्री मुसळधार पाऊस पडला . खवासपूर छावणीतील मोगली सैन्य गाढ झोपेत असताना या पावसाने आलेल्या पूराची लाट नदीच्या पात्रात घुसली. लाटेच्या तडाख्याने नदी तुडुंब भरून वाहू लागली. तसेच नदीच्या पलीकडे असलेल्या मैदानातही पाणी घुसले. माण नदीच्या अचानक आलेल्या पूराने छावणीतील अनेक माणसे आणि जनावरे पाण्याच्या ओघात वाहून गेली. उरलेल्या अनेकांची चीज वस्तू नाहीशी होऊन ते नंगे फकीर बनले. या मंडळीत अमीर - उमरावांचा देखील समावेश होता. बादशाही छावणीतील सर्व तंबू आणि इतर मालमत्ता यांची अमाप हानी झाली.
    मध्यरात्र होण्याच्या थोड्या आधी जेव्हा छावणीत पूराचा लोट कोसळला तेव्हा साऱ्या छावणीत मोठमोठ्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. मराठे अचानक छावणीत घुसले असे औरंगजेबाला वाटले. त्यामुळे तोही दचकून जागा झाला. त्याचा पाय तंबूच्या कनाताचे दोराला अडखळून तो पडला. त्यामुळे त्याचा उजवा गुडघा निखळला.
तीनशे वर्षांपुर्वी आलेल्या या महापूराच्या नोंदी मुघल अखबार, प्रत्यक्ष महापूर अनुभवलेले लेखक मुस्तैदखान, खाफिखान यांनी लिहून ठेवल्या आहेत. प्रसिद्ध इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या अखबारांचे भाषांतर केले आहे.
माण नदी एक छोटीशी नदी !
कधीतरी पावसाळ्यात वाहणारी व इतर काळात ठणठणीत कोरडी राहणारी. या चिमुरड्या नदीने सुद्धा मराठ्यांच्या लढ्यात आपले योगदान दिले. काबुल कंदाहार पासून जिंजी वेलोरपर्यंत राज्य कारभार करणारा हा बादशहा तिने कायमचा लंगडा करून टाकला . त्यामुळे या नदीचेही हे ऐतिहासिक कार्य असेच म्हणावे लागेल .
आटपाडी जवळच्या  खवासपूरात औरंगजेबाचा पाय मोडुनतो लंगडा झाला  होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.