रामदास स्वामी: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू: पुरावा
. 📯 दि. १९ जानेवारी २०२१ 📯
फेसबुक लिंक http://bit.ly/3oR7cPf
इतिहास मध्ये एक पुरावा आहे म्हणजे चाफळ सनद कि जे दर्शवतो की शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी आहे.पण ते एकटेच गुरू नव्हते हे पण तितकेच खरे.शिवाजी महाराजांना समर्थ रामदास याविषयी प्रचंड आदर होता, पण ते त्यांचे गुरू होते आणि एकटे गुरू नव्हते. तर पाटगावचे मौनी महाराज, , केळशीचे याकुतबाबा अशा अनेक संत लोकांचे शिवाजी महाराज सल्ला घ्यायचे.लहानपण पासून त्यांच्यावर संस्कार हे जिजाबाई नि केलं म्हणून खऱ्या गुरुस्थानी या जिजाबाईच आहेतच.
खूप लोक चाफळ सनद चा उल्लेख करतात पण इतिहासकार गजानन मेहंदळे आणि इंद्रजित सावंत यांनी ही सनद वर शंका उपस्थित केली होती पण .इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी आणि कौस्तुभ कस्तुरे यांनी 2018 मध्ये शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १६७८ मध्ये पाठवलेली एक सनद नुकतीच प्रकाशात आणली होती.,या सनदेत महाराजांनी 33 गावे इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. या सनदेच्या हस्तलिखिताच्या इतरांनी तयार केलेल्या नक्कल प्रती यापूर्वीही उपलब्ध होत्या. मात्र लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात या अस्सल दस्तावेजाची छायांकित प्रत सापडली आहे.
१५ सप्टेंबर १६७८ रोजी लिहिलेल्या या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना काही गावे इनाम म्हणून दिल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे दिले आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण ११ मोर्तबा असून एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर असून उरलेल्या १० मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील हस्ताक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते असल्याचेही बोलले जाते. ही सनद बदलापूरचे इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी उजेडात आणली आहे .
चाफळ सनदेच्या मायन्यात "श्री सद्गुरुवर्य" हा लिहले असले तर असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने आहे की आध्यात्मिक गुरुस्थानी हे पाहावे लागेल.
इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यांनी सुद्धा म्हणाले आहे की समर्थ संप्रदाय आणि शिवाजी महाराज यांचा परिचय 1658 ला आला आणि रामदास स्वामी यांची भेट 1672 नंतर झाली .नंतर अतिशय मधुर संबंध झाले.
आता पर्यंत जवळपास सर्व इतिहासकाराने ही गोष्ट मान्य केली आहे.शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट 1672 पूर्वी झाली याचा पुरावा नाही.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणताचे कार्य 1648 च्या आसपास चालू केले .आणि बहुतेक ते 1672 पर्यंत भेटलेच नाही.पण त्यांच्या(समर्थ संप्रदाय) शिष्यांचा संबंध 1658 ला आला होता.
सोबत दोन फोटो.