Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै ०१, २०२१

डॉक्टर्स डे का साजरा करतात

डॉक्टर्स डे का साजरा करतात

 

 डॉक्टर्स डे का साजरा करतात 
---------------------------------
जगात वेगवेगळया दिवशी डाॅक्टर डे
________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. त्यांच्या कौशल्याने अनेकांना जीवदान मिळालेले आहे. भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1991पासुन भारतामध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्यात  येतो. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ विधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच 'भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे.
डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 साली बिहारमधील पटना येथे झाला.

डॉक्टर्स डे का साजरा करतात,Why celebrate Doctor's Day


वैद्यकीय व्यवसाय हा केवळ आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा धंदा नसून, तो रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी जीव तोडून करावयाची एक सेवा आहे. व्यवसाय आणि सेवा यात डॉक्टर सेवेच्या बाजूला थोडा जास्त झुकला पाहिजे. रुग्णाविषयी डॉक्टरला वाटणारी आस्था पाहूनच रुग्ण निम्मा बरा झाला पाहिजे. सहृदय माणसाचा स्पर्शदेखील रुग्णाला व्याधीमुक्त करून जातो. तो नुसता डॉक्टर न रहाता त्याच्यासाठी श्रध्दास्थान होवून जातो.
फिजिशियन डॉ विधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात.
रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.
🔹जगभरात वेगवेगळे सेलिब्रेशन
जगभरात डॉक्टर्स डेचं वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेशन केले जाते. अमेरिकेमध्ये 30 मार्च दिवशी डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो. यापूर्वी हे सेलिब्रेशन 9 मे रोजी केले जात असे. ईरान, क्युबा या देशात  वेगवेगळ्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 
रूग्णांच्या सेवेसाठी 24X7 कार्यरत असणार्‍या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जातात. याकरिता ग्रिटिंग्स,मेसेज पाठवले  जातात.
डॉक्टराना देवदूत मानले जाते.

__________________________________________

Why celebrate Doctor's Day

 ---------------------------------

 Doctor's Day on different days in the world

 ________________________

 Mahiti seva Group Pethwadgaon

 ________________________

 The doctor is considered to be the form of God.  For many patients, the doctor is an angel to their relatives.  Their skills have saved many lives.  In India, July 1 is celebrated as Doctor's Day.

 July 1 is celebrated as Doctor's Day as a tribute and honor to India's famous physician Dr. Vidhan Chandra Roy.  Doctor's Day has been celebrated in India since 1991.  On February 4, 1961, Dr. Vidhan Chandra Roy was awarded the Bharat Ratna, India's highest civilian honor.

 Dr.  Vidhan Chandra Roy was born on 1 July 1882 in Patna, Bihar.

 The medical profession is not just a business for financial gain, it is a service for the sick.  In business and service, doctors should lean a little more towards service.  The patient should be cured only after seeing the doctor's feelings about the patient.  Even the touch of a kind person cures the patient.  He becomes a place of worship for him, not just a doctor.

 Physician Dr. Vidhan Chandra Roy was the second Chief Minister of West Bengal.  Roy is also known as the architect of West Bengal for his visionary leadership.

 Roy was educated in Calcutta.  MRCP and FRCS degrees are taken from London.  From 1911, he started providing medical services in India.

 वेगवेग Different celebrations around the world

 Doctor's Day is celebrated on different days around the world.  Doctor's Day is celebrated on March 30 in the United States.  Earlier, the celebration was held on May 9.  Doctor's Day is celebrated on different days in Iran and Cuba.

 Thanks to the doctors who work 24X7 for the service of patients.  Respect and gratitude are expressed on this day for their service.  Greetings, messages are sent for this.

 Doctors are considered angels.

१ जुलै कृषी दिन

१ जुलै कृषी दिन

  जुलै कृषी दिन  

____________________________
💫 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  💫
____________________________
.         १ जुलै कृषी दिन.... हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत कृषि क्षेत्रात जी प्रगती झाली आहे, त्यामागे वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.

१ जुलै कृषी दिन  , July 1 Agriculture Day


दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे सुरु करण्यात आली. या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यां पर्यंत पोहोचले.        
शेतक-याने घाम गाळून पिकवलेल्या कृषी उत्पन्नांना उत्तम बाजारभाव व उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कित्येक आधुनिक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. तरुणांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला थेट मातीत हात घालायची गरज नाही; मात्र तुमच्या मदतीने या क्षेत्राचं पुनरुज्जीवन होऊ शकते हे निश्चित.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेती विषयात उच्चशिक्षण घेणे आवश्यक आहे. हे उच्चशिक्षण म्हणजे दोन अथवा तीन वर्षाची पदवीच असावी असे जरूरी नाही. काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मार्केटिंग म्हणजे विपणन आणि विक्री हा कुठल्याही उद्योगाचा पाया. तुम्ही जे बनवता ते विकू शकला नाहीत तर कितीही उत्तम उत्पादनाची किंमत शून्य ठरते. शेतीमध्ये सुद्धा हेच तत्त्व लागू पडते. त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेसोबतच, व्यवस्थापन, मार्केटिंग, आणि विक्री याचेही उत्तम मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहिल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. कृषी क्षेत्राचा हा मंत्र तरुणांनी एकमेकांना देणं आवश्यक आहे. या क्षेत्रात नवनवीन कल्पनांची गरज आणि वाव दोन्हीही आहेत. कृषी उत्पन्न विकण्यासाठी देखील माहीतगार कुशल व्यक्तींची गरज असते.
आपल्या पूर्वजांनी पारंपरिक पद्धतीने शेती केली आणि त्यातून वर्षानुवष्रे भारत सुजलाम सुफलाम राहिला आहे खरे, मात्र नवीन काळानुसार नवीन तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची मदत घेऊन शेती करणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. कृषी क्षेत्र ओढग्रस्त झालं तरी अखेर ती आपली गरज आहे व आपणच या क्षेत्रात नवनवीन सुधारणा घडवून आणून पुन्हा या क्षेत्राला नवी झळाळी देऊ शकतो. त्यासाठी थोडय़ा बुद्धीची गरज आहे.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 
!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!
    ണคн¡т¡ รεvค
.       :::::∴━━━✿━━━∴:::


 July 1 Agriculture Day


 ____________________________

 mahiti seva Group Pethwadgaon

 ____________________________

 .  July 1 Agriculture Day .... The birth anniversary of Vasantrao Naik, the pioneer of green revolution and former Chief Minister of Maharashtra, is celebrated in Maharashtra as Agriculture Day to commemorate his valuable contribution in the field of agriculture.

 It is safe to say that Vasantrao Naik's foresight was the reason behind the progress that has been made in the field of agriculture in Maharashtra at present.  He was a bone farmer.  ‘Agriculture and Farmers’ is their intimacy.  Remained the subject of study.  He made constant efforts to modernize agriculture.  Established ‘Agricultural Universities’ in the state.  Overcame food-grain drought by providing hybrid seeds to farmers.  He accepted the crisis of 1972 as a challenge and showed a sustainable way of overcoming the drought.

During the tenure of the late Vasantrao Naik, four agricultural universities were started in Maharashtra.  Through these agricultural universities, modern technology in agriculture reached the farmers.

 There are a number of modern courses available to help farmers get a better market for their hard-earned agricultural produce.  Young people need to pay attention to this.  Here you don’t have to put your hands directly into the soil;  However, with your help, it is certain that this sector can be revived. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon.  This higher education does not have to be a two or three year degree.  Some short-term courses are also available.  Marketing is the foundation of any business.  If you can't sell what you make, then the price of any good product is zero.  The same principle applies to agriculture.  Therefore, in addition to product and quality, it is also important to take good guidance in management, marketing, and sales.

 Agriculture can be made more profitable if it is seen as an industry.  It is important for the youth to share this mantra of agriculture with each other.  There is both need and scope for new ideas in this area.  Knowledgeable skilled people are also needed to sell agricultural produce.

 It is true that our forefathers used to cultivate in a traditional way and India has prospered over the years.  Even though the agricultural sector is suffering, it is our need in the end and only we can bring new reforms in this sector and give a new impetus to this sector.  It requires a little ingenuity.

 ____________________________

गुरुवार, जून ०३, २०२१

जागतिक सायकल दिन

जागतिक सायकल दिन

 

  जागतिक सायकल दिन  

               
❍ 🚲दिनांक - ०३.०६.२०२१. ❍

फेसबुक लिंक http://bit.ly/3pdzHaI
शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे.
याच सायकलची महत्त्व ओळखून युनायटेड नेशन्सने पुढाकार घेत ‘जागतिक बायसिकल दिन’ साजरा करण्याचे ठरवले, आणि 3 जून हा दिवस जागतिक बायसिकल दिन म्हणून साजरा करू लागले. हा दिवस साजरा करण्याचे २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सने नक्की केले, आणि ३ जून हा जागतिक बायसिकल दिन म्हणून ओळखला जातो.पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केली.  गरिबांचे वाहन अशी ओळख सायकलला आहे.
जागतिक सायकल दिन,World Cycle Day


सायकल हा शब्द जरी उच्चारला तरी अनेक जण त्यांच्या सुरेख भूतकाळात जातात आणि त्यांच्या त्या जुन्या सायकलवरून गावाची भ्रमंती करूनच परततात. आज पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या लोकांसाठी तर त्यांच्या तरुणपणी सायकल असणे ही गोष्टच मोठी आनंददायी असायची. काळाच्या ओघात प्रवास लांबला आणि सुबत्ता वाढू लागली तशी प्रत्येक घरची सायकल अडगळीत जाऊ लागली आणि दुचाकी, चारचाकी तिच्यापुढे मिरवू लागल्या.जगण्याचा वेग वाढला, वेळ कमी पडायला लागला, हातात पैसा आला, मोठ्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे रस्त्यावरची सुरक्षितता कमी झाली, सायकल चालवणारा जास्तीतजास्त काळ रस्त्यावर वावरत असल्यामुळे त्याच्या वाट्याला हवेतलं प्रदूषण जास्त येतं तर ते टाळणं अशा कारणांमुळे मधल्या काळात इतर दुचाकींचं प्रमाण वाढलं. पण आता पुन्हा एकदा सायकलला प्रतिष्ठा यायला लागली आहे. याचा अर्थ आपल्याकडे लगेच सगळेजण इतर दुचाकी वाहनं बाजूला ठेवून सायकली चालवायला घेतील असं नाही. ते शक्यही नाही, पण आवडीने सायकलं विकत घेणं, जवळची आणि सुरक्षित अंतरं सायकलवरून पार करणं, सायकल मोहिमा आखणं अशा गोष्टी लोक पुन्हा करायला लागले आहेत, हेही नसे थोडके.
सायकलवर उपजीविका असणाऱ्या लोकांचे प्रमाणही आज लक्षणीय आहे. फेरीवाले, भाजीवाले, वर्तमानपत्र विक्रेते, फुलविक्रते,फुगेवाले, इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करून देणारे हे सर्व लोक आजही उपजीविकेसाठी सायकलवरच शहराच्या विविध भागांत फिरतात. याशिवाय कामगार मंडळीही आज त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर करतात.
सायकल हे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोत्तम असणारे वाहन आहे. सायकलस्वाराचे आरोग्य तर सायकल सांभाळतेच; पण पर्यावरणाचे आरोग्यही उत्तमपणे सांभाळते. त्यामुळे प्रत्येक शहरात सायकलस्वारांचे प्रमाण वाढणे, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.तिला विकासाचे व आरोग्याचे प्रतिक बनवुया.   

               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
-------------------------------------------

 World Cycle Day


  Date - 03.06.2021. ❍
__________________________

Bicycles are two wheelers driven by physical strength. In many places it is the main and cheapest means of transportation, exercise and sports.
Recognizing the importance of this bicycle, the United Nations took the initiative to celebrate World Bicycle Day, and June 3 became World Bicycle Day. This day was decided by the United Nations in 2018, and June 3 is known as World Bicycle Day. The bicycle is known as the vehicle of the poor.

Even if the word bicycle is uttered, many people go back to their beautiful past and return after wandering around the village on their old bicycles. For people in their fifties today, having a bicycle in their youth was a great pleasure. In the course of time, as the journey became longer and better, the bicycle of every household became more and more difficult and two-wheelers and four-wheelers started moving in front of it. The number of other two-wheelers has increased in the mean time due to reduced safety, cyclists spending more time on the road and more air pollution. But now, once again, the bicycle is gaining prestige. This does not mean that everyone will immediately put aside other two-wheelers and start cycling. It's not even possible, but people are starting to do things like buying bicycles with pleasure, crossing the nearest and safest distances by bicycle, planning a bicycle expedition.
The number of people making a living on bicycles is also significant today. Street vendors, vegetable sellers, newspaper vendors, florists, balloonists, electrician repairmen, all of these people still cycle to different parts of the city for their livelihood. In addition, workers today use bicycles to get to work.
The bicycle is the best vehicle to prevent pollution. The health of the cyclist is taken care of by the bicycle; But it also manages the health of the environment very well. Therefore, increasing the number of cyclists in every city is also very important for the health of the city. Let's make it a symbol of development and health.
               𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498
                  ❍ MAhiti seva Group
Pethwadgaon, Dist. Kolhapur
-------------------------------------------

मंगळवार, मे ११, २०२१

मराठी शाळा वाचली पाहिजे

मराठी शाळा वाचली पाहिजे

 मराठी शाळा वाचली पाहिजे  


.            दि. ११ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3uC7VH5
मराठी भाषिकात आतापर्यंत जे डॉक्टर,इंजिनिअर,जिल्हाधिकारी,आयपीएस आधिकारी झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळेत झाले होते.हे आपण विसरून गेलो आहोत.मराठी भाषिकांमध्ये विविध कारणांनी मुलांना इंग्रजी भाषेत शिकवण्याची प्रथा रूढ झाली आहे.स्पर्धेचे युग, मराठी शाळेत शिकून पुढे काही भविष्य नाही, इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही; अशी वेगवेगळी कारणं सागून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतो. याचा परिणाम म्हणून मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर येऊ लागल्या आहेत. यावर कढी म्हणून आता बरेच जण असाही प्रश्न विचारू लागले आहेत की, ‘मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे, मुलांना तिथे चांगली संगत मिळत नाही, शिक्षक चांगले नसतात वगैरे वगैरे…’ क्षणीक मराठी शाळांवरील हे आरोप मान्य करू, पण जर मराठी शाळांची ही स्थिती आली असेल तर याला जबाबदार कोण? यावरही आपल्यापैकी बरेच जण सरकार व राजकारण्यांवर याची जबाबदारी टाकून मोकळे होतात.   

मराठी शाळा वाचली पाहिजे
         

मराठी भाषा दिनी एकमेकांना शुभेच्छा देऊन (त्याहीतोडक्या-मोडक्या मराठीत) मराठी भाषा टिकणार किंवा वाढणार नाही. मराठी भाषेला म्हणजेच पर्यायाने मराठी जनतेला चांगले दिवस यायचे असतील, तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यात वाढ झाली पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे आणि याध्येयाने संपूर्ण मराठी जनांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मराठी शाळा टिकवण्यसाठी व्यापक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या महाराष्ट्राने मराठीशाळा टिकण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा मोठी चळवळ उभी करण्याची आज नितांतआवश्यकता आहे.
▪.प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे, कारण प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी मातृभाषेतून शिक्षण हीच शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
▪.मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे अशी नुसती ओरड करून चालणार नाही, तर त्यामागील कारणांचाही मागोवा घ्यावा लागेल.गेल्यापंधरा वर्षांत शासकीय धोरणे ही मराठी शाळांची गळचेपी करून इंग्रजी शाळांचं चांगभलं करताना दिसत आहेत.

मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षण यांच्यापुढे शाळा चालवणं हेच मोठं आव्हान आहे. या सगळ्यामध्ये शाळांचा आर्थिकडोलारा सांभाळणे ही सहज साध्य गोष्ट नाही. या आव्हानासमोर माना झुकवून बर्याच हिंदी व गुजराती शाळाबंद पडल्या किंवा इंग्रजी झाल्या. तरीही बर्याच मराठी शाळा या आव्हानाला धाडसाने सामोर्या जात आहेत. विविध कल्पक उपक्रम राबवून शाळेचा आर्थिक गाडा हाकत आहेत. समाज म्हणून आपल्याला संस्थाचालकव शिक्षक वर्गासोबत उभं राहणं गरजेचं आहे.
मराठी शाळा या सरकारी अनुदानावर चालत असल्यामुळे त्यांना विविध सरकारी नियमांचं काटेकोर पालन करावं लागत.या उलट मोठमोठ्या इंग्रजी शाळा या वर्षाला कैक लाखांमध्ये मुलांकडून पैसे घेऊन शाळा चालवतात. शिक्षक भरती, शिक्षकांचे पगार ठरवणे, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरती व पगार आदी सर्व विषय हे त्या त्या शाळांच्या हातात असतात. या उलट मराठी शाळा स्वेच्छेने एका शिपायाचीसुद्धा भरती करू शकत नाहीत. सरकारी नियमांनुसार असल्यामुळे संस्थाचालक व वरीष्ठ शिक्षकांना दर्जेदार नवीन शिक्षकांची निवड करता येत नाही. अनेक नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर अनुकंपा तत्त्वावर शाळेत नोकरी म्हणून रूजू झालेले असतात.आपण माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट वाचत आहात, शिक्षक या पेशाकडे समाजाचे कमालीचे दुर्लक्ष झालेले आहे. उपहासाने असंही म्हटलं जातं की ज्याला काहीचकरता येत नाही तो शिक्षक होतो.
या स्थितीत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे.B.Ed.आणिDip. Ed.करणार्यांमध्ये सुद्धा इंग्रजीतून ते शिक्षण पूर्ण करणार्यांची संख्या जास्त आहे. हे चित्र बदलून उत्तमोत्तम मराठी शिक्षक घडण्याची गरज आहे.अन्य राज्यांमध्ये विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेला खूप महत्त्व आहे.त्यांच्याकडून हा गुण घेऊन आपणही शिक्षणाच्या बाबतीत मराठीसाठी आग्रही प्रसंगी दुराग्रही होण्याची आवश्यकता आहे.तरच मराठी वाचेल!
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞
💚 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  💜     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _ጦඹիiᎢi

शनिवार, मे ०१, २०२१

१ मे महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन  


𖣘 दि.१ मे २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3vyutbH
    'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत आज बुधवारी म्हणजेच १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. अशा याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो.


१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्चयाची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदगोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

१ मे महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.म्हणुन आपण १ मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो.
" महाराष्ट्रा"बाबत माहिती
______________________

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा - मराठी
👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498 ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________

शुक्रवार, एप्रिल २३, २०२१

जागतिक ग्रंथ दिन,शेक्सपिअर आणि तुकोबा

जागतिक ग्रंथ दिन,शेक्सपिअर आणि तुकोबा

शेक्सपिअर आणि तुकोबा


माहिती सेवा गृप पेठवड़गाव

फेसबुक लिंक http://bit.ly/3gwPCyF
23 एप्रिल रोजीच जागतिक ग्रंथदिन का साजरा होतो याचे मूळ काही घटनांमध्ये दडलेले आहे. जगद्विख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन 23 एप्रिल रोजी असतो,आज जागतिक ग्रंथ दिन 23 एप्रिल गेली चारशे वर्षे शेक्सपिअरच्या नामाचा गजर जगातील सर्व सारस्वत आणि वाचक करत आहेत. आपल्या परंपरेत ‘ तुज सगुण म्हणो की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे ’ ही भावना आणि विचार रुजलेला आहे . त्याचप्रमाणे शेक्सपिअरला ‘ तुज क्लासिकल ( अभिजात) म्हणू की , रोमॅंटिक ( सौंदर्यवादी ) रे। क्लासिकल रोमॅंटिक एक गोविंदु रे ’ असेच संबोधावे लागेल . समीक्षेच्या चौकटी अभ्यासाच्या सोयीसाठी असतात .

 शेक्सपिअर समीक्षेच्या चौकटी भेदून दाहीदिशांत झेपावतो . त्याने मुक्तछंदाला मार्लोप्रमाणे हिमालयाची उंची दिली . सुनीत हा काव्यप्रकाराचा नवा फॉर्म आणला . मुक्तछंदातील शब्दांच्या ताणातून विलक्षण स्पंदने निर्माण केली . त्यांच्या नादातून आशयाचे अनंत विभ्रम दाही दिशात पोचविले . मानवी भावभावना , आशा -आकांक्षा , राग, लोभ, स्वार्थ , मानवता , क्रूरता , क्षूद्रपणा , नियती आणि माणूस यांचे संबंध प्रेम , मित्रत्व , कृतज्ञता , कृतघ्नता , निष्ठा , कष्ट , जिद्द , जीवनातील भयाणता आणि मांगल्य , आनंद आणि दुःख, योगायोग , मानवी प्रज्ञा आणि वेडेपणा , मानवी प्रकृती, विकृती , प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा एकमेकांत गुंतलेल्या आणि प्रत्येक क्षणी नव्या प्रश्नांची निर्मिती करणाऱ्या मानवी विभ्रमांचे हे विराट दर्शन आहे . म्हणूनच प्रत्येक पिढी शेक्सपिअरच्या वाङ्मयात नवा आशय शोधते .

शेक्सपिअर आणि तुकोबा

तुकोबांनी मराठी भाषेत जसे योगदान दिले , तसे शेक्सपिअरने इंग्रजीला योगदान दिले . दोघेही कवी . दोघांच्याही जीवनाच्या आकलनात विश्वात्मकता आहे . तुकारामांनी ‘ अभंग ’ अभंग केला ; शेक्सपिअरने ‘ मुक्तछंद ’ अभंग केला . जशी गाथा आजही जीवनाला लागू पडतेⓂ
प्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते व मनस्वी कवी विंदा करंदीकरांना तर तुकाराम व शेक्सपीयर हे जिवाभावाचे मैत्रच वाटतात व ते एका कवितेत त्यांची भेटही नाट्यमयतेने रंगवतात. ती अशी :
तुकोबांच्या भेटी , शेक्सपीयर आला ;
तो जाहला सोहळा , दुकानात.
        जाहली दोघांची , उराउरी भेट ;
        उरातले थेट , उरामध्ये .

        तुका म्हणे "विल्या,  तुझे कर्म थोर ,
        अवघाची संसार , उभा केला" .

        शेक्सपीयर म्हणे, "एक ते राहिले ,
        तुवा जे पाहिले , विटेवरी ."

        तुका म्हणे, "बाबा, ते त्वा बरे केले;
        त्याने तडे गेले , संसाराला .
        विठ्ठल अट्टल , त्याची रीत न्यारी ;
        माझी पाटी कोरी , लिहोनिया ,"

        शेक्सपीयर म्हणे , "तुझ्या शब्दांमुळे
        मातीत खेळले , शब्दातीत ."

        तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
        गड्या, वृथा शब्दपीट ;
        प्रत्येकाची वाट , वेगळाली .
        वेगळीये वाटे , वेगळाले काटे ,
        काट्यासंगे भेटे , पुन्हा तोच ".

        तुका म्हणे, "ऐक , घंटा ही मंदिरी !
        कजागीण घरी , वाट पाहे ."

विंदा करंदीकर ( १९१८-२०१० )

    आकाशा एवढ्या दोन श्रेष्ठ कवींनी, आपापले वेगळेपण जपत, एकसारखेच वैश्विक विचार कवीतेतून द्यावेत ह्याचे कौतुक मात्र रसिकांना कायमच भारून टाकील !

गुरुवार, एप्रिल २२, २०२१

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिन

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिन

 २२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिन 

फेसबुक लिंक http://bit.ly/2QJZOcr
२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी एका मोठ्या पर्यावरण- रक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली. निमित्त होतं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा इथल्या तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचं! २२ एप्रिल १९७० साली अमेरिकेत दोन कोटी नागरिकांच्या उपस्थितीत पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला.

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिन

युनायटेड नेशन्सच्या हवामान बदलासंबंधीच्या (UNFCC) एका रिपोर्टनुसार, येत्या काही दशकांमध्ये, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधील लाखो लोक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे आणि आरोग्याच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडतील असा अंदाज आहे. ऊन, वारा, थंडी, पावसाची अनिश्चितता, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्यामुळे येणारे पूर, भूकंप हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत.
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे

______________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
______________________________

मंगळवार, मार्च ३०, २०२१

 इडली दिन

इडली दिन

इडली दिन  


 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

दि. ३० मार्च २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/39qCmr2
    आज  आहे जागतिक इडली  दिवस.  ३० मार्च हा दिवस जगभरात इडली दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात इडली अतिशय लोकप्रिय आहे. इडली – सांबार हा प्रकार प्रत्येकालाच आवडतो. मुंबईत तर अगदी वडापाव प्रमाणेच इडलीवर जगणारे असंख्य लोक आहेत. सकाळी वेगवेगळ्या नाक्यावर हे इडलीवाले इडली विकत उभे असतात. या इडलीवाल्यांकडील चटणी, सांबारची एक वेगळीच चव असते. याबरोबर डाळवडा, मेदू वडा यांच्याकडे चवीने खाल्ला जातो.

इडली दिन


इडल सांबार, इडली चटणी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे.  इडलीचा जेव्‍हा विषय येतो तेव्‍हा  अप्रत्‍यक्षपणे साऊथचे म्‍हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. मात्र वास्‍तवात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्‍यास करणार्‍यांच्‍या मते  ८०० ते १२०० इ.पूर्वमध्‍ये  भारतात इडली आली आहे. 'इडली' शब्‍दाची निर्मिती 'इडलीग' यापासून झाली होती. याचा उल्‍लेख 'कन्‍नड' साहित्‍यात आढळतो. 
जागतिक इडली दिवस मागच्‍या ३ वर्षापासून साजरा केला जात आहे. या दिवसाची सुरुवात 'एम एनियावन' यांनी केली. एम एनियावन हे 'मल्लीपू इडली'चे संस्‍थापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्‍यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षीत खाद्य आहे. एनियावन यांच्‍या मते, फादर डे, मदर डे असे डेस आपण साजरे करतो त्‍याचप्रमाणे मला वाटले की, इडली दिवसपण साजरा करायला हवा. मात्र फेरीवाल्‍यापासून ते हॉटेलपर्यंत इडली विक्रेत्‍ये जागतिक इडली दिवस साजरा केला जातो याविषयी अजून म्‍हणावी तेवढी माहिती पोहचलेली नाही.,हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे.
 तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खातात. आंबवल्यामुळे इडलीची चव किंचित आंबट असते. दक्षिणी भारतात इडली भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. महाराष्ट्रामध्येसुद्धा ही इडली नाष्ट्यासाठी बनवली जाते. हल्‍ली रव्‍याची इडली देखील बनवली जाते.
कशी बनवायची इडली
३ वाट्या  तांदूळ किंवा  इडली रवा
१ वाटी उडीद डाळ
डाळ आणि तांदूळ किंवा  रवा  धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात तांदूळ किंवा  रवा  घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजाच्या पिठासरखे असावे.
हे बारीक केलेले पिठ एका मोठ्या पातेल्यात काडून  त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते.  इडली करत असताना यात चवीनुसार मीठ घालावे.  यानंतर इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे. वर दिलेल्या प्रमाणाअत साधारण ४०-४५ इडल्या होतात.

इडली म्‍हटले की सांबर आणि चटणी आलेच. यासाठी  लागणारे  साहित्‍य आणि कृती
साहित्‍य
१ जुडी कोथिंबीर
२-३ हिरव्या मिरच्या
१ मुठ शेंगदाणे
१/४ वाटी ओले खोबरे
अर्ध्या लिंबाचा रस
१/२ इंच आल्याचा तुकडा
मीठ, साखर चवीप्रमाणे
कृती  : वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे.  यानंतल चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.
सांबार  साहित्‍य आणि कृती
१ वाटी तुरडाळ
१ मोठा टोमॅटो
१ मध्यम कांदा
२ शेवग्‍याच्‍या शेंगा
लाल भोपळ्‍याचे १ काप 
२-३ टीस्पून सांबार मसाला
मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर – चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या
कृती  
डाळ, टोमॅटो, १/२ कांदा, शेवग्‍याच्‍या शेंगा, लाल भोपळ्‍याचे एक काप  कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.
आजच्‍या जागतिक इडली दिवसानिमित्त इडलीचा आस्‍वाद घ्‍यायला विसरु नका....
____________________________
wꀡ▲㈦ㄅ▲℗℗ 9890875498* ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________

शनिवार, मार्च २०, २०२१

ये गं ये गं चिऊताई

ये गं ये गं चिऊताई

 ये गं ये गं चिऊताई 

२० मार्च २०२१
दिवसेंदिवस चिमणीची शहरात लक्षणीय घट होत असल्याचे समोर आले आहे. देशात चिमणीच्या पितकंठी चिमणी, घर चिमणी, जावा चिमणी, पहाडी चिमणी, वृक्ष चिमणी अशा पाच प्रजाती आहेत. यापैकी मराठवाड्यात दोन जातींच्या चिमण्या आढळतात. यामध्ये सामााजिक चिमणी (घरची चिमणी) ही मनुष्याजवळ राहते. भिंती, कौलारूंची घरे आदी ठिकाणी ती आपले घरटे (खोपा) बांधून वास्तव्य करीत असते, तर पितकंठ चिमणी (पिवळा गळा असलेली) ही जंगलात आढळते. ही चिमणी सहसा थव्याने वावरते. नराचे डोके राखाडी आणि गळा व छाती काळी असते. डोळ्यात काजळ घातल्याचा भास होतो. चिऊताई मात्र वरून तपकिरी, डोळ्यांवर फिकट भुवया व खालून शुभ्र असते. नर व मादी सहज वेगळे ओळखायला येतात. चिमण्यांचे खाद्य हे गवताच्या बिया, धान्य, अन्न, पिकांवरच्या अळ्या, झाडांवरचे कीटक आदी आहे. ज्या शहरात चिमण्यांची संख्या अधिक आहे, तेथील पर्यावरण उत्तम असते, असे जाणकारांचे मत आहे.शहरांमध्ये वाढत चाललेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. यामुळे कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी भुर्र उडाली. त्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठी काही पक्षी प्रेमींकडून जीवाचा आटापिटा सुरू आहे.
चिमणी दिन,
चिऊताई चिऊताई दार उघड’सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिमणी गेली कुठे असा प्रश्न पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून २० मार्च हा दिवस हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.
छोटा आकार, गब्दुल बांधा, आखूड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय; पण भक्कम कोनाकृती चोच ही चिमणीची ओळख आहे. देशात सर्वत्रच चिमणीचे वास्तव्य आहे. शहरात, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी प्रदेशात अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवलेले आहे; पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती म्हणजे चिमणी आहे.माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग (वेव्हज) हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, हे आता प्रयाेगानिशी सिद्ध झाले आहे. मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे. जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार २००० ते २०२० पर्यंत २० वर्षांत चिमणीच्या संख्येत ३० ते ५० टक्के घट झाली आहे व यासाठी रेडिएशन हेही एक माेठे कारण आहे.- रेडिएशनमुळे चिमण्यांच्या घरटे बनविणे, प्रजनन आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून आले.शहरात मातीची भिंत किंवा कौलारू घरे पाहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला दिसत नाही. अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सिमेंटच्या जंगलात झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याने अपवादात्मक झाडे आपल्या नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे होणारी सकाळ आता केवळ आठवणींची स्थिती झाली आहे.वृक्षतोडीचा थेट घरट्यांवर विपरित परिणाम होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्याही घटत चालली आहे. संख्येत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या सूचित चिमण्यांना समाविष्ट करण्यात आले आहे

शुक्रवार, मार्च १९, २०२१

आज  १९ मार्च : World Sleep Day

आज १९ मार्च : World Sleep Day

 आज  १९ मार्च : World Sleep Day 


उत्तम आरोग्यासाठी उत्तम झोप आवश्यक आहे. म्हणजे उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की, उत्तम आरोग्य कशावरून ओळखावे? ज्याला उत्तम झोप लागते त्याचे आरोग्य उत्तम, असे खुशाल समजावे. म्हणजे झोप हे उत्तम आरोग्याचे साधनही आहे आणि उत्तम आरोग्याचे लक्षण सुद्धा आहे.या गोष्टीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून मार्च महिन्यातला एक दिवस हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो.

१९ मार्च : World Sleep Day

🔹केव्हापासून साजरा केला जातो World Sleep Day
‘चांगली झोप, चांगलं आयुष्य, चांगलं जग’ हे निद्रा दिनाचं ब्रीदवाक्य आहे. World Sleep Society संस्थेच्या अंतर्गत २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो. निद्रा दिनाची तारीख दरवर्षी बदलत राहते, पण बहुतेककरून शुक्रवारचा दिवसच निवडण्यात येतो.गेल्यावर्षी हा दिवस १३ मार्चला साजरा करण्यात आला होता.तुम्ही म्हणाल की निद्रा दिन म्हणजे या दिवशी पूर्ण दिवस झोपा काढायच्या का? तर, तसं नाही. झोपेचं महत्त्व आणि त्याच्याशी निगडीत आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २००७ सालच्या पहिल्या निद्रा दिनाचं कारणच जगभरातील आरोग्य तज्ज्ञांना एकत्र आणून झोप या विषयावर चर्चा करण्याचं आणि त्याचं महत्त्व जगभर पोहोचवणं हे होतं. त्यानंतर पुढे हा प्रघातच पडला.
💥अशी आहे चांगल्या झोपेची नियमावली
- रोज ठरवलेल्या एकाच वेळेवर झोपावे आणि उठावे.  
- दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त झोपू नये.  
- झोपेच्या ४ तास आधी धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.  
- झोपेच्या ६ तास आधी चहा, काॅफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नये.  
- रोज ४ तास आधी खूप मसालेदार किंवा गोड जेवण करू नये.  झोपेपूर्वी हलके जेवण चालेल.  
- रोज व्यायाम करावा, पण अगदीच झोपेच्या आधी नको.  
- बिछाना तसेच झोपेची खोली आरामदायी व हवेशीर असावी.  
- आवाज किंवा उजेडामुळे झोप माेडणार नाही याची काळजी घ्यावी.  
- झोपेची खोली फक्त झोपण्याकरिता व संबंधाकरिता वापरावी
उशीरात उशीरा साडे आठ वाजता जेवण संपले पाहिजे आणि अन्न पचनाची प्रक्रिया बरीचशी पूर्ण झालेली असली पाहिजे. अन्यथा नऊ साडेनऊ वाजता जेवण करून दहा वाजता झोपायला गेेलो तर पोटात गडबड सुरू राहते आणि झोप शांत लागत नाही. त्याचबरोबर रात्रीचे जेवण हलके असावे, हेही आवश्यक आहे. रात्रीचा चहा कधी घ्यावा? दिवसातला शेवटचा चहा नऊ वाजता घ्यावा. उशीरात उशीरा नऊ वाजता घ्यावा. खरे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर चहा, कॉङ्गी असे उत्तेजक पेय पिऊच नये. कारण उत्तेजक पेयाने तरतरी येत असते आणि झोप उडत असते. म्हणून नाईलाज झाला तरच ङ्गार तर नऊ वाजता चहा घ्यावा. त्यानंतर चहा घेतल्यास दहा वाजता झोपच लागत नाही. तेव्हा खाण्या-पिण्याची पथ्ये पाळूनच झोपेची उत्तम आराधना करावी लागते आणि तरच आरोग्य चांगले राहते.

शनिवार, फेब्रुवारी २७, २०२१

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..

 सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द.. 

फेसबुक लिंक http://bit.ly/3r0vibp
महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...
अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती.

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द..

पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
सावरकरांनी दिलेले मराठी शब्द पहा👇
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
--------
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे!

मराठी भाषा दिन विशेष : अमृतातातेही पैजा जिंक

मराठी भाषा दिन विशेष : अमृतातातेही पैजा जिंक

 मराठी भाषा दिन विशेष : अमृतातातेही पैजा जिंके 

       _दि. २७ फेब्रू. २०२१
•═════• ⭕ •═════•   

फेसबुक लिंक  http://bit.ly/3pWmP7H        

❏ विचार, सौंदर्य, शब्दसामर्थ्य, गोडी हे जर भाषेच्या उत्तुंगाचे गुण असतील, तर संतवाणीने रंगलेल्या भाषेच्या सामर्थ्याला उत्तुंगाचे मानबिंदू प्राप्त झाले आहेत. हीच उत्तुंगता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल, यात शंका नाही. आज मराठीमध्ये मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, वर्हाडी आदी भाषा आहेत. त्या सगळ्या बोलीभाषेतून आलेल्या आहेत. माझ्या मते, आपण बोलीभाषा अधिकपक्क्या केल्या, तर तो मराठी भाषेचा भक्कमपणाचा पाया होऊ शकेल. ज गामध्ये सध्या 6,000 भाषा बोलल्या जातात. त्यात मराठी भाषेचे स्थान 17 व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये 14.5कोटी लोक मराठीतून बोलतात. त्यामुळे मराठी भाषा बाजूला पडेल, लुप्त होईल, असे समजण्याचे कारण नाही. कारण, जोपर्यंत मराठी संस्कृती जिवंत आहे, तोपर्यंत ही अबाधित राहणार.

अमृतातातेही पैजा जिंके


अर्थात, ती टिकवणे आपल्याच हातात आहे. मराठी ही तिच्या बोलीभाषांमुळे अधिकाधिक समृद्ध झाली आहे. इतरभाषांनाही तिने सामावून घेतले आहे. गुजराती, प्राकृत, संस्कृत, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्वच भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत.अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य परिषदा, महामंडळे, विविध साहित्य संस्था यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समिती स्थापन झाली. विविध चर्चासत्रे, परिषदा, साहित्य संमेलनांतील ठराव हे सर्व अंतिम टप्प्यात आहेत. या प्रयत्नांना यथावकाश यश येऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास मराठी माणसासाठी त्याहून अन्य कुठलीही अभिमानाची गोष्ट असणार नाही. मात्र, यानिमित्तानं एक गोष्ट मांडाविशी वाटते, ती म्हणजे अभिजात दर्जा मिळण्याविषयी चर्चा करणारी मंडळी मराठीची धुरा आपल्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात बोलत असली, तरीही मराठी टिकवण्याचे श्रेय जाते ते गावगाड्यात राहणार्या मराठी बोलणार्या लोकांना.ही मंडळी मराठी लोकसंस्कृती जपतात, ती टिकवतात. लोकाचार, लोकव्यवहार, श्रद्धा, निष्ठा आणि भावना इतकंच काय ते भांडणही मराठीत करतात. मराठीच्या सर्व प्रांगणांमध्ये, दालनांमध्येती स्वाभाविकपणे वावरत मराठी संस्कृतीची, भाषेची पताका अभिमानाने वागवत, फडकवत वाटचाल करीत असतात. असं असूनहीमराठीसाठी आम्ही काही करत आहोत, असा यत्किंचित अहंकार त्यांच्याठायी नसतो. आज मराठी भाषेविषयी बोलणार्यांपैकी मराठीशी किती एकनिष्ठ आहेत, हाएक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणतीही भाषा ही शब्दांच्या अंगाने वसते आणि संस्कृतीच्या अंगाने ठसत असते. मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी नेहमीच पोटतिडकीने बोलले जाते. यामध्ये मराठीची काहीशी उपेक्षा होत आहे, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, नव्या युगाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मराठीमध्ये आहे. 1990मध्ये जागतिक मराठी परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्याचे अध्यक्ष होते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडलेले मुद्दे पाहिल्यानंतर याची उकल अधिक चांगल्याप्रकारे होईल. ते म्हणाले होते, इंग्रज गेले आणि जाताना इंग्रजी ठेवून गेले. सर्व वरिष्ठ पातळीवर अधिकार्यांच्या मनातही इंग्रजी राहिली आहे.कुसुमाग्रजांनी मराठीविषयीची खंतही व्यक्त केली होती. ‘देहाला बांधलेल्यादृश्य साखळदंडापेक्षा मनाला बांधणारे साखळदंड हे फार भक्कम असतात. नव्या युगाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मराठीच्या ठायी आहे, आशाही समर्थ आहे. असे असूनही तिच्याविषयी साशंकता असणारी तिची अपत्ये मात्र दुबळी आहेत.’ मराठी राजभाषादिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या या आत्मचिंतनाचे चिंतन करणे फार महत्त्वाचे ठरेल. याच भाषणात कुसुमाग्रजांनी म्हटले होते की, आमचे कुणाशीही वैर नाही. मावशीच्या मायेने आमचे पालन करणार्या इंग्रजीशी तर मुळीच नाही. फक्त मावशीने आता आईच्याघराचा कब्जा आईच्या ताब्यात द्यावा, एवढीच मागणी आहे.त्यामुळे इंग्रजीच्या बहिष्काराचा प्रश्न नाही, तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा आहे. इतका सुरेख विचार कुसुमाग्रजांनी दिला आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने सर्वच जी.आर. मराठीत काढावेत, मराठी बोलावे, असे आदेश दिलेलेआहेत; पण जनमानसातील मराठी भाषेची स्थिती वर्णायची झाल्यास डोक्यावर मुकुट, अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात उभी आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि विशाल परंपरा आहे. मराठी भाषेच्या अस्मितेचा पहिला धडा फडकावला तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी. ‘तीरे संस्कृताची गहने। तोडोनि महाठिया शब्दसोपाने॥ रचिली धर्मनिधाने। श्रीनिवृत्तीदेव’ असे अभिमानाने सांगत ज्ञानगंगेच्या आणि सारस्वताच्या प्रवाहाचे तीर तोडून त्यांनी शब्दसोपान उभे केले आणि मराठीचे खाट बांधले. संत एकनाथांनी ‘संस्कृत भाषा देवाची तर प्राकृत काय चोरापासूनी झाली काय,’ असे ठणकावून विचारत मराठीचा अभिमान जागृत ठेवला. संस्कृत ही काही परकी भाषा नव्हती, तरी तिचा पगडा मोडून काढत ज्ञानदेवांना मराठीची शब्दसृष्टी उभी करावी लागली. भाषा हे समाज व्यवहाराचे सर्वश्रेष्ठ साधन असून, ते प्रतीकात्मक आहे. या प्रतीकात्मक तत्त्वाला सोडूनजे संकेत करण्यासाठी वापरण्यात येतात ते ध्वनिरूप असतात. ज्या ध्वनिरूप चिन्हांद्वारे माणूस विचार करतो, त्या ध्वनिरूप चिन्हांच्या समस्त रूपाला भाषा असे म्हणतात. वास्तवविश्व आणि व्यक्तिजीवनयाला ध्वनिरूप संकेतांनी पुन्हा साकार करणारी भाषा ही एक शक्ती आहे. मानवी जीवन, जीवनाचे विशिष्ट रंग आणि प्रकृती यांना व्यक्त स्वरूप देण्याचे काम भाषा करत असते. त्यादृष्टीने भाषा संस्कृतीची वाहक असते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे भाषेचे दोन प्रकार आहेत. जी लिहितो ती भाषा आणि जी बोलायचीती बोलीभाषा, असे स्थूलमानाने समजले जाते.वास्तविक, मौखिक साहित्य परंपरा आणि बोलीभाषा यांचे जवळचे नाते आहे. कारण, मराठी भाषेच्या समर्थनार्थ किंवा तिच्या लोकाभिमुखतेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रवाह आहे तो साहित्याचा. त्यामध्ये ग्रांथिक आणि मौखिक असे दोन साहित्य प्रवाह आहेत. त्यापैकी ग्रांथिक प्रवाहालासाहित्यिकांनी महत्त्व दिले; पण मौखिक साहित्य परंपरा उपेक्षित राहिली. भाषा संशोधक गणेश देवी यांनी केलेल्या संशोधनानुसार, 1961 मध्ये भारतात 1,100 भाषा बोलल्या जात होत्या. गेल्या 50 वर्षांत त्यातील 300 बोलीभाषा संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात 56 बोलीभाषा बोलल्या जात होत्या.त्यातील 53 भाषा आजही अस्तित्वात आहेत. गणेश देवींच्या संशोधनाला पुष्टी देणारे एक सुंदर प्रमाण संतसाहित्यामध्ये आहे. नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांची महती सांगताना एक अभंग उद्धृत केला आहे. ‘ज्ञानराज माझी योग्यांचीमाउली। जेणें निगमवल्ली प्रगट केली॥1॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्र्वारी। ब्रह्मानंद लहरी प्रगट केली॥2॥ अध्यात्मविद्येचें दाविलेसे रुप। चैतन्याचा दीप उजळिला॥3॥ छप्पन्न भाषेचा केलासे गौरव। भवार्णवीं नाव उभारीली॥’ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारख्या ग्रांथिक प्रबंध रचनेत प्रमाणभाषेबरोबर 56 बोलीभाषांना स्थान दिले. या सर्व बोलीभाषा मराठीच्या होत्या.सांगण्याचा मुद्दा इतकाच की, बोलीभाषा शिकायला, तिचा पाया पक्का करायला ज्ञानदेवांचे विचार किंवा वाङ्मयकार्य पायाभूत ठरते. आज मराठीमध्ये मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, वर्हाडी आदी भाषा आहेत. त्या सगळ्या बोलीभाषेतून आलेल्या आहेत. माझ्या मते, आपण बोलीभाषा अधिकपक्क्या केल्या, तर तो मराठी भाषेचा भक्कमपणाचा पाया होऊ शकेल. बोलीभाषेचे संवर्धन करणे हा प्रमाण मराठी भाषेच्या संवर्धनाचा पाया होऊ शकतो. आज आपण इंग्रजी साहित्याविषयी बोलतो, तेव्हा ती व्यवहारी इंग्रजी आहे. वाङ्मयीन इंग्रजी नाही. त्यामुळे आपल्याला अभिव्यक्तहोण्यासाठी आपलीच भाषा असावी लागते. मुलांचे शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातील असले, तरी अभिव्यक्ती ही मराठीतीलच असते. मराठी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे आणि इंग्रजी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे यात फरक आहे. इंग्रजी माध्यमातून मराठी बोलणारे उत्तम वक्ते तयार होऊ शकतील; पण इंग्रजीमधून ते सक्षमपणे अभिव्यक्त होतील, असे नाही. अभिव्यक्ती दडपणे हे एकप्रकारचे मुकेपण आहे. आपण विनाकारण इतर भाषा लादून त्यांना मुके करणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. मध्यंतरी, कुणी तरी मराठी भाषेत टागोर निर्माण व्हायला हवेत, असे म्हटले होते; पण टागोरांची महानता मान्य करून मला प्रश्न विचारावासा वाटतो तो इतर भाषांना ज्ञानेश्वर, तुकाराम हे लाभले का? आज मराठीभाषा समर्थपणे वाटचाल करते आहे ती वैश्विक विचार देणार्या संतवाणीच्या प्रवाहाने आणि प्रभावाने. विचार, सौंदर्य, शब्दसामर्थ्य, गोडी हे जर भाषेच्या उत्तुंगाचे गुण असतील, तर संतवाणीने रंगलेल्या भाषेच्या सामर्थ्याला उत्तुंगाचे मानबिंदू प्राप्त झाले आहेत. हीच उत्तुंगता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल.
---------------------------------------------
✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव
-----------------
******************************

रविवार, फेब्रुवारी १४, २०२१

रक्तदान करण्याचे हे आहेत फायदे

रक्तदान करण्याचे हे आहेत फायदे

   

   रक्तदान करण्याचे हे आहेत फायदे  


दि. १४ फेब्रुवारी २०१९

फेसबुक लिंक http://bit.ly/2MUNFQl
सध्याच्या लोकसंख्येच्या २ टक्के प्रमाणात जरी इच्छेने रक्तदान केले तर रक्तपेढीत कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही किंवा रक्ताच्या एका थेंबावाचून कुणाचे प्राण जाणार नाहीत. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदान ही अमूल्य सेवा आहे.रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते.आजकाल ऐच्छिक रक्तदानाने वाढदिवस साजरा करण्याची जीवनशैली बरेचसे युवक अंगीकार करीत आहेत. मित्रमंडळीसमवेत शासकीय रक्तपेढीत जावून रक्तदानाने म्हणजेच जीवनदान देवून वाढदिवस साजरा होत आहे. रक्तपेढीत ‘बर्थ डे डोनर्स क्लब'ची संकल्पना रुजवत आहे. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? रक्तदानाचे फायदे पाहता  तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल.



💉रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :
नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील पहा.रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे, वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही. ,रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.

एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते.मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖     
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ϻÃĤĮŤĮ

शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१

🌞 जागतिक सूर्य नमस्कार दिन

🌞 जागतिक सूर्य नमस्कार दिन



🌞 जागतिक सूर्य नमस्कार दिन

फेसबुक लिंक http://bit.ly/3jHa13y
भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

जागतिक सूर्य नमस्कार दिन

सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.
सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत:
1)प्रणामासन किंवा नमस्कारासन,
2)हस्त उत्तासन,
3)पादहस्तासन,
4)अश्‍वसंचालनासन,
5)पर्वतासन,
6)अष्टांग नमस्कार,
7)भुजंगासन,
8)पर्वतासन,
9)अश्‍वसंचालनासन,
10)पादहस्तासन,
11)हस्त उत्तासन,
12) प्रणामासन
हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा
🌞सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे. 
ही बारा नावे अशी आहेत: 
1) ओम मित्राय नमः 
2) ओम सूर्याय नमः
3) ओम खगाय नमः
4) ओम हिरण्यगर्भाय नमः
5) ओम आदित्याय नमः
6) ओम अकार्य नमः
7) ओम रवये नमः
8) ओम भानवे नमः
9) ओम पूष्णय नमः
10) ओम मरिचये नमः
11) ओम सवित्रे नमः
12) ओम भास्कराय नमः

🙏साष्टांग नमस्कार श्लोक - उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा| पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते ||
अर्थ - दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करुन (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय,  (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.
हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।।

जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्ऱ्य येत नाही (काहीही कमी पडत नाही)
सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात.
⭐सूर्यनमस्कारांतील आसने मंत्र
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे, असे म्हणतात.

.
मंत्र चक्र
१ ॐ मित्राय नमः अनाहत चक्र
2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र
३ ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
४ ॐ भानवे नमः आज्ञा चक्र
५ ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र
६ ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र
७ ॐ हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
८ ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र
९ ॐ आदित्याय नमः आज्ञा चक्र
१० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र
११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र
१२ ॐ भास्कराय नमः अनाहत चक्र
१३ ॐ श्री सवित्रू सुर्यनारायणाय नमः 
सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात 
|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||

मित्र= जगन्मित्र , रवी= सर्वाना पूजनीय, सूर्य-प्रवर्तक,संचालक, भानू=तेज देणारा, खग= अकाशातून हिंडणारा, पूषा-पोषण करणारा, हिरण्यगर्भ=पोटात तेज असणारा, मरीच=रोगनाशक, आदित्य= सर्वाकर्षक, सविता= सर्व उत्पादक, अर्क= आदरणीय, भास्कर= प्रकाशमान असे याचे अर्थ आहेत.

⭐सूर्यनमस्कार व शरीरसौष्ठव
सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास
सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.
सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो. 
शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
     🙏तृचाकल्प नमस्कार
तृचाकल्प नमस्कार ही सूर्य नमस्काराची एक पद्धती आहे. एक भांडे घेऊन त्यात गंध, अक्षता आणि फुले घालतात .ते समोर ठेवून त्यावर सूर्याचे  ध्यान करतात.त्यानंतर बीजमंत्र जोडून सूर्याची  बारा नावे म्हणतात.  उदा.ॐ ह्रां सूर्याय नम: | याप्रमाणे. व नमस्कार घालतात. असे एकूण २२ नमस्कार घातले जातात . नंतर सूर्याची प्रार्थना करून भांड्यातील पाणी तीर्थ म्हणून घेतात.

मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१

आज चाॅकलेट डे ,चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!

आज चाॅकलेट डे ,चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!

        🍬 आज चाॅकलेट डे 🍬

.

     चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!   


दि. ९ फेब्रुवारी २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3q9bpP6
             🍬चॉकलेट खाणे कुणाला आवडत नाही? काही अपवाद वगळता सर्वच आबालवृद्धांना चॉकलेट बार मिटक्या मारत खाणे आवडते. लहानांना त्याची जीभेवर रेंगाळणारी गोड चव आवडते तर प्रौढांना त्यामधील अँटिऑक्सिडंटस् आरोग्यदायी ठरू शकतात. शनिवारी ‘चॉकलेट डे’ आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरा होतो!

चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!


कॉफी म्हणजे जशी विशिष्ट बियांची पूड असते, तसेच चॉकलेट हे कोकोआ फळाच्या बियांपासून बनवले जाते. ही कोकोआ झाडे प्रामुख्याने पश्‍चिम आफ्रिकेत आढळतात व आजही चॉकलेटचा मोठा स्रोत तिथेच आहे. इसवी सनापूर्वी 1900 या काळापासूनचे मानवी आहारातील चॉकलेटचे पुरावे मिळालेले आहेत.याचा अर्थ किमान तीन हजार वर्षांपासून तरी माणूस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चॉकलेटचे सेवन करीत आहे. याबाबत सुरुवातीचे पुरावे मेक्सिकोत मिळालेले आहेत. माया आणि अ‍ॅझटेक संस्कृतीमधील लोक चॉकलेटचे सेवन करीत असत. चॉकलेट ज्या कोकोआ फळाच्या बियांपासून बनवले जाते त्या बियांची मूळ चव अतिशय कडवट असते. अशा बिया वाळवून, स्वच्छ करून आणि भाजून नंतर काही प्रक्रिया करून त्यापासून चॉकलेट बनवले जाते. आपण जे चॉकलेट खातो त्यामध्ये लोणी, वनस्पतीजन्य तेल आणि साखरही असते. सध्या अनेक रूपांमध्ये चॉकलेट पाहायला मिळते. जगभरात चॉकलेटच्या व्यवसायात वर्षाला 50 अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते!
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi

मंगळवार, डिसेंबर १५, २०२०

आज जागतिक  🍵 चहा दिन

आज जागतिक 🍵 चहा दिन

⭕ आज जागतिक  🍵 चहा दिन   ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*💢
____________________________
*_दि. १५  डिसेंबर  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/3njNXwR
             🍵 आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..🍵

╔══╗ 
║██║       ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते... जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. मुंबईकरांनीही गुलाबी थंडीत पहिल्या चहाचा अस्वाद घेण्यासाठी गर्दी केली आहे. ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात... पण मर्त्य मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य मानून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली... आज जागतिक चहा दिवसाच्या निमित्तानं पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव आपण चाखायलाच हवी....
कल्हई काढलेल्या चकचकीत पितळी भांड्यात आलेली उकळी... कधी एकदा हा दूग्धशर्करा योग जुळून येतो अन् पृथ्वीवरच्या अमृताचा घोट ओठात आणि ओठातून घशात उतरतो याची प्रतिक्षा... उगीच नाही, याला अमृततुल्य म्हणत... अमृताशीच ज्याची तुलना होऊ शकते असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, शरिर ताजंतवानं करतो आणि चहाच्या कपाभोवती झालेली दोस्तीही पक्की असते म्हणतात... आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणारा हा इहलोकीचा अविष्कार म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच प्रीय... म्हणूनच हा चहा पुण्याच्या संकृतीचा एक अविभाज्य भाग झालाय... 🍵

ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ  *चहासाठी पावडर कुठली आणि दूध कुठले याला इथं महत्व नाही.. हा चहा गाळण्याचा कपडा अत्युच्च गुणवत्तेचं प्रतीक आहे... चहावाल्यांच्या कित्येक पिढ्या हा अमृतयोग जुळवून आणताहेत...🍵


चहाला अमृततुल्य मानण्याची परंपरा हा संशोधनाचा विषय असला तरी एरवी रोज बदलणा-या जगात पिढ्यान् पिढ्या टिकलेला हा चहा पुण्यनगरीचं खास वैशिट्य बनलाय...🍵*  ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ  *गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाय टी... चहाची कितीतरी रूपं... मात्र पुण्याच्या गल्लोगल्ली अस्तित्वात असलेली अमृतुल्ये आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत... या अमृततुल्य चहानंही अमृतप्राशन केलं असावं... 🍵
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi