Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १३, २०१३

नक्षलवाद्यांनी केली तीन जणांची हत्या

गडचिरोली- एटापल्ली जंगलातील खनीज उत्खनन करणा-या कंपनीचा व्यवस्थापक आणि धातु उत्पादक कंपनीच्या उपाध्यक्षांसह तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये स्थानिक पोलीस पाटलांचाही समावेश असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

येतापल्ली येथील सुळजागड जंगलात लोहखनिज उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. यासंदर्भात अनेकदा नक्षलवाद्यांनी धमक्याही दिल्या होत्या. मात्र नक्षलवाद्यांचा विरोध झुगारुन काल हैद्राबादमधील हेमलता मिनरल कंपनीचे व्यवस्थापकीय संस्थापक मल्लीकार्जून रेड्डी आणि लॉयड मेटल कंपनीचे उपाध्यक्ष जसपालसिंग ढिल्लोण यांनी या भागात प्रवेश केला. काल सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास या दोहांसह त्यांना सोबत करणा-या संजीव सडमेक या स्थानिक पोलीस पाटलालाही नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले.

अतीशय दूर्गम भागात ही घटना घडल्याने या हत्याकांडाची माहिती आज सकाळी कळली. आज सकाळी सुरजागडाजवळील नमनेर गावातील एका लग्नाच्या ठीकाणी येऊन नक्षलवाद्याने आम्ही त्यांना ठार मारले आहे. त्यांच्या मृतदेहाला हात लावू नका, अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.