पाटणा- नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये भीषण नक्षलवादी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी रेल्वेला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी जमुई आणि लखीसराय या स्थानकांदरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसवर बेछूट गोळीबार केला. ही गाडी धनबाद येथून पाटण्याला जात होती. दुपारी 1.20 वाजताच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ला करण्यात आला ते ठिकाण पाटण्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यामध्ये आरपीएफचा एक जवान शहिद झाला. तसेच ट्रेनचा चालक आणि दोन प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन प्रवासी पश्चिम बंगालचे रहिवासी होते. याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. गाडीतील आरपीएफच्या एस्कॉर्ट पार्टीला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. त्यांच्याकडील शस्त्रसाठा लुटण्याचा नक्षलवाद्यांचा हेतू होता. त्यात ते यशस्वीही झाले.
हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या दोन कंपन्या पाठविण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. जीआरपीचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या दोन कंपन्या पाठविण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. जीआरपीचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.