Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २१, २०२१

नागपूर मेट्रोचा प्रवासी आकडा 13,000 च्या पार

 नागपूर मेट्रोचा प्रवासी आकडा 13,000 च्या पार

महा मेट्रोने घेतलेल्या कोविड सुरक्षेच्या उपायांमुळे प्रवाश्यांचा आकडा फेब्रुवारीच्या स्तरावर



Khabarbat | MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED




नागपूर, २१ जून: महा मेट्रोने प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोच्या आत आणि स्थानकांवर घेतलेल्या कोविड सुरक्षा उपायांमुळे नागपूरकरांच्या विश्वास पुन्हा एकदा कायम झाला आहे. नागपूर मेट्रोच्या राईडशिपमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीवरून हे स्पष्ट होते. 20 जून रोजी ऑरेंज आणि एक्वा लाईन्सचा एकत्रित प्रवासी आकडा 13,150 एवढा गेला. महा मेट्रो नागपूरने घेतलेल्या सुरक्षा उपायांबद्दल लोकांचा आत्मविश्वास वाढल्याने प्रवाश्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल असे एकंदरीत चित्र दिसू लागले आहे.



लॉकडाउन कालावधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. 5 जून रोजी केवळ 761 लोकांनी मेट्रोचा वापर केला होता. अनलॉक झाल्यावर पहिल्या दिवशी 7 जून रोजी ही आकडेवारी 4,153 वर गेली. 13 जून रोजी ती 9,500 वर पोहचली.



लॉकडाऊन कालावधी दरम्यान दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या फेऱ्या एक तास अवधीने होत्या, 7 जूनपासून ते 30 मिनिटांच्या अवधीपर्यंत वाढविण्यात आले. सध्या एक्वा लाइन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर) वर सकाळी ६.३० वा. ते सायंकाळी ८ वाजता या वेळेत आणि ऑरेंज लाइन (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी) वर सकाळी ८ वा ते सायंकाळी ८वाजता दरम्यान गाड्या धावतात.



प्रवाशांना कोविड सुरक्षा मिळावी यासाठी यापूर्वीच पावले उचलत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी सर्व गाड्या व स्थानकांची स्वच्छता करण्यात आली. दिवसभर नियमित अंतराने त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.. मेट्रो स्थानकांची स्वच्छता करताना प्रवाश्यांचा वावर असलेला परिसर विशेष काळजीपूर्वक निर्जंतुक करण्याकडे येते.. गाड्या व स्थानकांमधील अधिक स्पर्श होत भागांचे वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. कर्मचार्‍यांनी देऊ केलेल्या चलनी नोटा अल्ट्रा-व्हायोलेट किरणांचा वापर करून निर्जंतुक करण्यात येतात आणि त्या स्वतंत्रपणे ठेवण्यात येऊन प्रवाश्यांना देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.



विविध प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या सुरक्षेसंबंधी सूचना नियमितपणे प्रवाशांपर्यंत फलकांद्वारा आणि कर्मचाऱ्यांद्वारा पोचवण्यात येतात. कोविड -१९ च्या जनजागृतीविषयी, स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये दोन्ही ठिकाणी सार्वजनिक घोषणा सिस्टमवर नियमित घोषणा केल्या जातात. प्रवाशांच्या माहितीसाठी मेट्रो स्थानकांवर स्टँड आणि माहिती बोर्ड आधीपासूनच लावण्यात आलेले आहेत.



· *सारणी*

*तारीख : राइडरशिप*

5 जून : 761

7 जून : 4,153

13 जून : 9,500

19 जून : 8,647

20 जून :13,150

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.