Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ०१, २०२३

वरसिद्धि शॉपिंग मॉलला २००० रुपयांचा दंड Shri Varasiddhi Shopping Mall, Chandrapur |

 बांधकाम साहित्य उघड्यावर टाकल्याने ६००० दंड वसुल

वरसिद्धी शॉपिंग मॉलला २००० रुपयांचा दंड  




चंद्रपूर ३१ डिसेंबर -  चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या नागरिकांकडुन ६००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली असुन वर सिद्धी शॉपिंग मॉल यांनी झोन क्रमांक 2 अ च्या क्षेत्रात प्रसिद्धीकरिता भिंतीपत्रक चिपकविण्यात आले होते. शहर विद्रुपीकरणांतर्गत सदर मॉलस २००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 
Shri Varasiddhi Shopping Mall, Chandrapur | वरसिद्धि शॉपिंग मॉल
 
     शहरात विविध ठिकाणी बांधकाम करण्यात येते बांधकाम करतांना बांधकाम साहित्य सुरक्षीत ठिकाणी ठेवण्याऎवजी रस्त्याशेजारीच साहित्य ठेवण्यात येते. याचा वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषतः वाळू आणि खडीमुळे दुचाकी वाहने घसरून पडत असतात. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने बांधकाम साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. मात्र याचे पालन होत नसल्याने मनपातर्फे कारवाई करण्यात येत आहे.    
    यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. दंड केला असल्याची प्रसिद्धी सुद्धा करण्यात येते जेणेकरून या मानसिकतेत बदल व्हावा मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली सामाजीक जबाबदारीचे भान नसल्याचे दिसुन येते.  स्वच्छता ही मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे याची जाणीव होणे आवश्यक आहे. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे.
     स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे, भिंतीपत्रक लावुन शहर विद्रुपीकरण करणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.