Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी



अंतिम मंजुरी करिता केंद्र सरकारडे पाठविला प्रस्ताव 


 नाशिक ,२५ मार्च : नुकतेच लोकसभेच्या पटलावर घोषित झालेल्या नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी मिळाली असूनसदर प्रस्ताव अंतिम मंजुरी करिता केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे कि, ०१ फेब्रुवारी २०२१रोजी लोकसभेत केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रु. ची घोषणा केली होती ज्याला पीआयबीची देखील मंजुरी मिळाली आहे. नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.    


३२ कि.मी. मार्गिकेवर २ कॉरिडॉर असतील व ३० मेट्रो स्थानकांचा समावेश असणार असून रु. २०९२ कोटी रुपयांची गुंतवणुक असणार आहे व सदर प्रकल्पा ४ वर्षात पूर्ण होईल. अत्याधुनिक आणि किफायतशीर मास ट्रांजिट सिस्टम ही टायर बेस्ड कोच असणार असून इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्कशन धावणार आहे. टियर २/३ शहराकरिता अतिशय उपयुक्त वाहतुकीचे साधन आहे. मेट्रो नियो ही नाशिक शहरातील नागरिकांना आरामदायक, सुविधाजन,सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल अशी सेवा सक्षम आहे.  केंद्रीय आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.   


 (नाशिक मेट्रो नियो प्रकल्प) :

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रो ला देण्यात आली असून यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश होता. महा मेट्रोने नाशिक शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाचे नियोजन केले, मेट्रो नियो प्रकल्पाची संकल्पना ही नवीन असून देशात पहिल्यांदा या प्रकारचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.  मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून नाशिक आणि तत्सम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. सर्व साधारण पणे २०- ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनकरता वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता योग्य त्या उपायावर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ रोजी टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एक वाक्यता आणन्याकरता या समितीची स्थापना केली होती.महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली त्याच अनुषंगाने ही मेट्रो नियो संकल्पनेची अंबलबजावणी करण्यात आली जे कि, संपूर्ण देशासाठी आदर्श,दिशादर्शक आणि परिवहन क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प असेल.  

 

नाशिकच्या मेट्रो नियो प्रकल्पाचे ठरक वैशिष्ट्ये:


•         पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका :

लांबी : १० कि.मी स्टेशन :  गंगापूर,जलापूर,गणपत नगर,काळे नगर,जेहाण सर्कल,थटे नगर, शिवाजी नगर,पंचवटी,सीबीएस आणि मुंबई नाका.

 

•         दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड :

लांबी : २२ कि.मी स्टेशन : ध्रुव नगर,श्रामिक नगर,महिंद्र,शनेश्वर नगर,सातपूर कॉलोनी,एमआयडीसी,एबीबी सर्कल,परिजात नगर,मिको सर्कल,सीबीएस,शारदा सर्कल,द्वारका सर्कल,गायत्री नगर,समता नगर,गांधी नगर,नेहरू नगर,दत्त मंदिर,नाशिक रोड तसेच सीबीएस हे दोन्ही मेट्रो कॉरीडोर करता इंटरचेंज स्टेशन असेल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.