मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्याविरोधात रामकुंड नाशिक येथे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने शंखनाद आंदोलन केले. यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांच्यासह प्रमुख साधुसंत उपस्थित होते.
साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विषयी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11.00 वा रामकुंड, पंचवटी येथे साधु-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन संपन्न झाले.
यावेळी १००८ महामंडलेश्वर सोमेश्वरानंद स्वामी,अ.भा.आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास, महंत फलाहारी बाबा, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे ह.भ.प.संजय नाना धोंडगे, अनिकेत शास्त्री, ह.भ.प अर्जुन महाराज पाटील, जय बाबाजी परिवाराचे विष्णु महाराज, रमणगिरी महाराज, अश्विनीनाथ महाराज, सिताराम महाराज, अशोक गवळी, रामसिंग बावरी, सरचिटणीस सुनिल केदार, अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी,सिडको मंडल -2 अध्यक्ष अविनाश पाटील, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, जुने नाशिक मंडल अध्यक्ष भास्कर घोडेकर, नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, सोमनाथ बोडके, लक्ष्मीकांत पारनेरकर, सुनिल वाघ, उत्तमराव उगले, प्रतिक शुक्ल, विपुल मेहता, विजय बनछोडे,हर्षद वाघ, गणेश सानप, शिवम शिंपी आदींसह नाशिक महानगराच्या 10ही मंडलातून जास्त गर्दी होऊ नये म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात 40च्या आसपास पदाधिकारी कार्यकर्ते या आदोलनात उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आचार्य तुषार भोसले म्हणाले की,
आपला सहकारी मंत्री साधुंना नालायक म्हणतो अशावेळी हिंदुह्रदयसम्राटांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोप कशी लागते ? . जनाब उद्धव मिया ठाकरेंच्या मुघल विकास आघाडी सरकार चे मंत्रिमंडळ महिलांवर अत्याचार , हिंदु समाजाचा अपमान, मुलांना डांबून ठेवते, साधुंना शिव्या घालतात अशा रावणालाही लाजवेल अशा स्वैराचारी मुघल विकास आघाडी सरकारचे लवकरच रामकुंडात विसर्जन होऊन महाराष्ट्रात रामराज्य यावे याकरिता आज साधु-संतांनी शंखनाद केला आहे.
साधुंचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधुंच्या वेशातल्या २-४ भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणुन हिंदु समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधु परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधु परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे. वडेट्टीवार यांच्या साधुंबाबत केलेल्या वादगस्त वक्तव्याबद्दलच हे शंकानाद आंदोलन छेडण्यात आले आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यकत्यांनी आपल्या हातात “साधुंना नालायक म्हणतो वडेट्टीवार , उध्दवा अजब तुझे सरकार”, "याजसाठी केला होता मुख्यमंत्री पदाचा अट्टहास? हिंदुंचा आणि साधुंचा करता येईल उपहास !” अशा प्रकारचे फलक घेतले होते व निषेध आंदोलन केले.
मात्र आमचा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, की हिंदु समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? १५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, "हा महाराष्ट्र साधु-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही". मग तुमचेच मंत्री आज साधुंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का ? तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजील सारखी विकृती इथे येऊन हिंदुंना शिव्या घालून जाते, आता तर तुमचे मंत्री च साधुंना शिव्या देतात. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्री मंडळाला लाजवेल असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे असेच म्हणावे लागेल. असे आचार्य तुषार भोसले म्हणाले.