येवला प्रतिनिधी,विजय खैरनार
येवला: येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजिवन समाधि सोहळा शिंपी समाज बांधवांच्या वतीने सुरक्षित अंतर ठेवून मोजक्या लोकांत सर्व विधीवत पूजा करण्यात आली. पहाटे श्रीं च्या मुर्ती स अभिषेक घालण्यात आला. आरती नैवेद्य तसेच संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी कोरोना रोगाचे सावट असतांना योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
शिंपी समाज येवला चे अध्यक्ष आरवींद तुपसाखरे, उपाध्यक्ष राजु गणोरे, सचिव कैलास बकरे, सुहास भांबारे, सोमनाथ हाबडे, देविदास भांबारे, ज्ञानेश टिभे, मंगेश खंदारे, नंदलाल लचके, चंंदुकाका भांबारे संतोष टिभे,नंदलाल भांबारे,दत्तात्रय लचके शामराव गायकवाड, शामबाई लचके, सौ. सुशिला टिभे शकुबाई लचके आदींनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
दरवर्षी हा उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सात दिवस सप्ताह बसविण्यात येऊन या दरम्यान न्यानेशवरी पारायण, हरिपाठ,महिलांचे भजन,प्रवचन,कीर्तन, त्या नंतर नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा,सवाद्य मिरवणूक काढण्यात येते तसेच दही हंडीचा उत्सव आणि महा प्रसादाचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरोना मुळे मोजक्या समाज बांधव मध्ये हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संत नामदेव महाराजांचे पसायदान व भक्तिभावाने सायंकाळी ठिक ६:०० वाजता पारंपरिक पद्धतीने सेवेत खंड पडू नये म्हणून मंदिरासमोर पाच पाऊली पालखी सोहळा पार पडला.