Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १२, २०२०

बोकटे येथे प्रशासनास न जुमानता लॉकडाऊन काळात बाजार भरल्याने पोलिस प्रशासनाची कारवाई!




येवला प्रतिनिधी/विजय खैरनार

येवला, ता.१२ : तालुक्यातील बोकटे येथील जागृत देवस्थान श्री काल भैरवनाथ मंदिरा समोर पारंपारिक दर रविवारी सकाळी आठवडे बाजार भरत असतो. नाशिक व नगर जिल्ह्यातील सरहद्दीजवळील काही खेडे गावातील लोकं यां बाजारासाठी येत असतात.
परंतु आज सध्यस्थितीला लाॅकडाऊन असलेल्या कारणांमुळे येथे बाजार भरवु नये असे यात्रा कमेटी, बोकटे ग्रामपंचायत, बोकटे कोरोना नियंत्रण समिती यांच्या संयुक्त वतीने मंदिराच्या गेटवरच नोटीस बोर्ड लावलेला आहे. तरीही आज रविवार दि.१२ रोजी सकाळी सकाळी मंदिरा समोरील प्रांगणात आठवडे बाजार भरवल्यामुळे भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली. यावेळी सामाजिक सुरक्षितता अंतराचा नियम धाब्यावर बसवून खरेदी-विक्री व्यवहार चालू होता. काही ग्राहक तर स्पायडरमॅन, सुपरमॅन असल्यासारखे वागत होते. कित्येकांनी तोंडाला मास्क बांधलेला नव्हता, तर काही उगाचच इकडुन तिकडे फिरत गर्दी करतांना दिसत होते.वरील सर्व प्रकारच्या बेजबाबदारपणे चालु असलेल्या गोष्टींबद्दल किंबहुना कोपरगाव तालुक्यात कोरोणाचा पेशंट सापडला असतांना त्या परिसरातील गावातील लोकं यां बाजारासाठी आले असल्यामुळे जर यदाकदाचित त्यांच्यात कोणाला संसर्ग झाला असल्यास आपल्या गावातही तो येऊ शकतो म्हणजेच भाजी-पाला खरेदी-विक्री शुल्लक कारणावरून जर आपले आरोग्य तथा जनतेच्या जिवाशी खेळ मांडला जातो आहे असे दिसल्यावर गुलाबराव दाभाडे, संभाजीराव दाभाडे, किरण दाभाडे, बापुसाहेब दाभाडे, ताराचंद मोरे,भाऊसाहेब कदम, संजय दाभाडे आदी सुज्ञ ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त करुन असल्या प्रकाराबद्दल आपला संताप गावातील सामाजिक कार्यकर्ते असणारे पोलिस मित्र तथा पत्रकार हितेश दाभाडे यांच्या कडे मांडला.हितेश दाभाडे यांनी त्वरित सर्व गोष्टींची माहिती येवला तहसीलदार मा.रोहिदास वारुळे व येवला ग्रामिण पोलिस निरीक्षक मा.अनिल भवरी यांना दिली.
गेले काही दिवसांपासून जागतिक पातळीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.परंतु अद्याप त्यावर उपाय मिळत नसून राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी कोरोना या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना एकत्र न येण्यासाठी आव्हान करुन जमावबंदी व संचारबंदी लागू केलेली आहे. तरीही लोकांना ह्या गोष्टीचे गांभीर्य नसल्याचेच यांतुन स्पष्ट होते.

शासनाने सर्व लोकजमा होणारी ठिकाणे जसे शाळा, कॉलेज, लग्न समारंभ, अनेक घरघुती समारंभ, धार्मिक समारंभ, तथा धार्मिक स्थळांवर एकत्र येण्यास मज्जाव केलेला आहे.
लोक जमाव होऊन कोरोना विषाणुचा संसर्ग पसरू नये म्हणून शासनाने लाॅकडाऊनची मुदत १४ एप्रिल २०२० च्या नंतर अजुन ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

असे सर्व असतांनाही आज प्रशासनाला न जुमानता बोकटे येथे कोपरगाव तालुक्यातील सावळगाव, शिरसगाव,तिळवणी,उक्कडगाव तसेच येवला तालुक्यातील दुगलगाव, देवळाणे,खामगाव,रस्ते सुरेगाव,गवंडगाव,अंदरसुल अश्या दोन जिल्ह्यातील सरहद्दी जवळील खेड्यातुन बोकटे येथे भाजीपाला, फळे खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार भरविला. सर्वांनी कलम १४४ लागु असतांना, जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन असतांनाही बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पहायला मिळाली.

बोकटे गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या,जनतेच्या आरोग्याशी होत असलेली हेळसांड पाहुन मिळालेल्या माहितीच्या आधारे येवला तहसीलदार व येवला ग्रामिण पोलिस निरीक्षक यांनी बोकटे गावात आज सकाळी सकाळी धडक मोहीम राबविली.
बाजारात रिकामं फेरफटका मारणाऱ्या,फिरणाऱ्या जमावाला चांगलाच चोप दिला गेला. तसेच बाजारात विक्रीसाठी आलेल्या लोकांनाही शासनाने घालून दिलेली नियमावलीचे पालन करण्यास खडसावले. सुरक्षित अंतर ठेवून खरेदी-विक्री करा,अन्यथा कलम १४४ अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे बजावले.
यावेळी पोलीस हवालदार पगार दादा व सहकारी यांनीही योग्य वेळी योग्य कारवाई करुन बोकटे ग्रामस्थांना दिलासा दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.