चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन
एकाच दिवशी वड्डेटीवार- पुगलिया गटाचे वेगवेगळे मेळावे
चंद्रपूर/ प्रतिनिधी : (ललित लांजेवार)
काँग्रेसचा नागपूर विभागीय जनआक्रोश मेळावा आज चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याचवेळी कांग्रेसचे जेष्ट नेते माजी खासदार नरेश पुगलियांनी त्याच शहरात दुसरा समांतर मेळावा आणि रॅली आयोजित केली होती. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. जनआक्रोशाच्या मुहूर्ताला दोन चुली मांडून चंद्रपुरात काँग्रेसच्या गटबाजीचे शक्तीदर्शन करण्यात आले.
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून मागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली. महागाईने तर कळस गाठला. या परिस्थितीत जनतेला जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारला त्रासुन गेली आहे. त्यांच्या मनात कमालीचा आक्रोश दिसत आहे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जल आक्रोश मिळवला संबोधन सांगितले.
राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने चंद्रपुरात काढलेल्या जनआक्रोश मेळाव्याला जनतेने चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश मेळाव्यात दिसून आला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके उपस्थित होते.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या जनआक्रोश मेळाव्याला अशोक चव्हाण विरोधकांनी मात्र दांडी मारली.या गटाचे नेतृत्त्व नरेश पुगलिया यांनी केले होते.
विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा विभागीय शेतकरी मेळावा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने दुपारी २ वाजता दाताळा मार्गावरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या पटांगणात नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आधी काँग्रेस कार्यकर्त्याकडून शहरभर रॅली मिरवण्यात आली या रॅलीत देखील हजारोच्या संख्येने नागरिक केंद्र व राज्य शासनाविरोधात आपला संताप व्यक्त करायसाठी जमले होते. पुगलिया यांच्या मिळाव्यात नागपूरचे माजी मंत्री नितीन राऊत, आमदार सुनील केदार ,अनिस अहमद ,सतीश चतुर्वेदी, यासह काँग्रेसचे आजी माजी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
या भाजप सरकारच्या काळात कर्जबाजारीपण शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली तर दुसरीकडे पुगलिया यांनी बाहेरून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोलादेत वडेट्टीवारांना आव्हान केले.
खरतर चंद्रपुरात होणाऱ्या या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण चंद्रपूर जिल्ह्यात केंद्रातील आणि राज्यातील मुख्यमंत्रीपद असणारे मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेस पक्षाने सध्या एकजुटीने येणे गरजेचे होते. मात्र तसे न होता एकाच पक्षात दुफळी पाहायला मिळाली.
*****वडेट्टीवारांचे शक्तिप्रदर्शन******
जनआक्रोश मेळाव्यासाठी मागील काही दिवसांपासून आ. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. चांदा क्लब गाऊंडवर मोठा पेंडाल उभारण्यात आला आहे.मेळाव्यात ५० हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता असल्याने कुणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. तशा सूचनाही प्रत्येक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. चांदा क्लब गाऊंडवर ५० हजार नागरिक बसतील, अशी व्यवस्था केली आहे.
******जनतेतही दिसला आक्रोश-*******
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चंद्रपूर शहरात असतानाच जिल्ह्यातील काँग्रेसचे २ गट पडले आहे.एकेकाळी कांग्रेसचा बालेकिल्ला असलेला चंद्रपूर जिल्हा आहे .सध्या या शहरात कांग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागल्याचं चित्र आज आयोजित मेळाव्यात व रॅलीच्या माध्यमातून दिसून आले.
एकाच दिवशी 2 वेगवेगळे मेळावे रॅली आयोजित करण्यात आलेले होते यात एकाच पक्षाचे वेगवेगळे गट तयार होऊन काँग्रेस पक्षातली दुफळी पहायला मिळाली. एकूणच काँग्रेसची जन आक्रोश सभा असली तरी पक्षांतर्गत आक्रोश उफाळून आल्याचं चित्र असून कार्यकर्त्यांची मात्र गोची झाल्याचे
*****पोलिसांचा तगडा बंदोबस्त******
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसचे मेळावे होत असल्याने सोमवारी शहरात कार्यकर्ते व नागरिकांची अलोट गर्दी उसळण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शहरात तगदा बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही कार्यक्रमस्थळी सोमवारी सकाळपासूनच दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. याशिवाय शहरात चौकाचौकात देखील पोलीस तैनात करण्यात यायले होते. प्रत्येक बारिकसारिक गोष्टींवर पोलिस विभागातील गुप्त विभाग करडी नजर ठेऊन होते,