Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ०६, २०१७

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी शहरात

 नागपूर  : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी शहरात येणार असून, दुपारी चार वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित नवव्या अग्रोव्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय प्रदर्शन आणि कॉन्फरन्सचे उद्‌घाटन करणार आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्यासंदर्भात व्यवस्थेचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती यांचे आगमन तसेच रेशीमबाग येथील अग्रोव्हिजन प्रदर्शन उद्‌घाटन कार्यक्रमा संदर्भात आयोजन समिती, पोलिस, महसूल, विमानतळ प्राधिकरण, मिहान, आरोग्य, अन्न व औषधीद्रव्य, माहिती व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक हेमंत निंबाळकर, अग्रोव्हिजनचे रमेश मानकर, एअर इंडियाचे वसंत घोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रवींद्र खजांजी, राजभवनचे वरिष्ठ अधिकारी रमेश येवले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.