Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ०६, २०१७

विसापूर येथे ‘हिरवाई’ बांबू स्वयंरोजगार केंद्र स्थापन


बांबु संषोधन व प्रषिक्षण केंद्रचा स्तूत्य उपक्रम

विसापूरः- बांबू संषोधन व प्रषिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या सहकार्याने नुकतेच विसापूर येथे बांबु आधारीत रोजगाार व स्वयंरोजगारासाठी ‘हिरवाई’ बांबु स्वयंरोजगार केंद्र (काॅमन फॅसिलिटेषन सेंटर) स्थापन करण्यात आले.

    राज्यांचे वित, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देषानुसार सुरू झाालेल्या बांबु संषोधन व प्रषिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच सहकार्याने कार्यरत सदर केंद्राद्वारे ग्रामिण भागातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना बांबूपासून बनलेल्या विविध वास्तूंच्या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी हे केंद्र कार्य करणार आहे. यासाठी ‘हिरवाई’चे विलास भोयर आणि ग्रामिण महिला बचत गटाची स्थापना करून बांबु आधारीत स्वयंरोजगाराबाबत जनजागृती व मार्गदर्षन करीत आहेत.
    सध्या विसापूर येथील कंेद्रात 90 महिला प्रषिक्षण घेत असून लवकरच जिल्हाभरातील महिला बचत गट मोठया संस्थेने बांबू संषोधन व प्रषिक्षण कंेद्राच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाषी संलग्न होऊन बांबू आधारीत स्वयंरोजगारासाठी प्रषिक्षित होणार आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.