Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चंद्रपूर शहर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रपूर शहर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

इरई धरणातील पाणी शहरास आरक्षित करण्याची इको-प्रो ची मागणी

इरई धरणातील पाणी शहरास आरक्षित करण्याची इको-प्रो ची मागणी

200.500 मीटर धरणाची लेवल च्या वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करू नये 

जिल्हाधिकारी यांना निवेदन - पाणी बचत करिता नागरीकांना इको-प्रो चे आवाहन

चंद्रपूरः यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विशेष करून इरई धरणात पाणी साठा फारच कमी आहे. यामुळे इरई धरणावर निर्भर असणाऱ्या चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. उन्हाळयात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई समस्या पासुन चंद्रपूर शहराला पाण्याचा समस्येपासुन वाचविण्याकरीता इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहराकरीता आरक्षीत करण्याच्या मागणीचे निवेदन इको-प्रो संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना (2 जाने रोजी) देण्यात आले आहे.

इरई धरणाच्या पाण्याच्या वापर विज निर्मीतीकरीता आणी शहरास पिण्यासाठी होत असल्याने आणी यंदा धरणात पाणी साठा अत्यल्प असल्याने ते वेळीच नियंत्रीत करण्यात न आल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे सध्या स्थितीत धरणात 203.175 मीटर पातळीपर्यत म्हणजेच 34 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्र व्यवस्थापन धरणातील पाण्याची पातळी 198.000 मीटर पर्यत विजनिर्मीती करीता पाण्याची उचल करणार असल्याचे कळते. 198.000 मीटर पातळी पर्यत धरणात जवळपास 7 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असेल.

धरणाच्या 198.000 मीटर पातळी नुसार धरणातील पाणी साठा अत्यल्प असुन इरई धरणाचा मृत साठा असेल. त्याचवेळेस इकडे भर उन्हाळयात शहरातील नागरीकांची पाण्याची समस्या अधिक तिव्र होणार आहे. कारण, यंदाचा अत्यल्प पावसामुळे भुजल पातळी सुध्दा वाढलेली नाही त्यामुळे शहरातील बोअर आणी विहरीची भुजल पातळी खालावलेली आहे. आज वर्तमान परीस्थीतीत चंद्रपूर शहराला 1 दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. तसेच विजनिर्मीती करीता 7 दशलक्ष घनमीटर पाणी असे दर महीन्याला 8 दशलक्ष घनमीटर पाणी उचल होत आहे. अशा परीस्थीतीत आजच्या धरणातील पाणी पातळीनुसार पुर्ण विज प्रकल्प येत्या 2-3 महीन्यात बंदच करावा लागेल. हीच परिस्थीती जवळपास 2010 मध्ये निर्माण झाली होती. पंरतु, चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणी मिळावे याकरीता इको-प्रो संस्थेने घागर पदयात्रा, धरणे आंदोलन आणी चंद्रपूर बंद यासारखे आंदोलन केलेली होती. 

किमान यावेळेस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन येत्या काही महीन्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची संकटकालीन परीस्थीती असल्याने याचे पुर्व नियोजन होणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी 2010 मध्ये निर्माण झालेली समस्या आणी प्रशासनाला आलेला अनुभव यावरून त्वरीत निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. आणी 198.000 मीटर पातळीवर पाणी उचल बंद करण्यासंदर्भात खालील प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनातुन स्पष्ट करण्यात आलेले आहे.

1. 198.000 मीटर पातळीवरील मृत साठा खरंच 7 दशलक्ष घनमीटर पाणी असेल काय ? आणी असेल तर त्यात गाळ किती आणी पाणी किती असेल ? 

2. कारण धरणाच्या निर्मीतीपासुन (30 वर्षा पेक्षा अधिक काळ) अदयापही हा गाळ काढण्यात आलेला नाही. या पातळीला धरणात पाण्यापेक्षा अधीक गाळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. यावेळी धरणात पिण्यायोग्य पाणी किती असेल आणी किती पाण्याची उचल करणे शक्य असेल. 2010 मधील अनुभव नुसार गाळ स्वरूपातील पाणी उचलणे मोठे जिकरीचे कार्य आहे. 

4. तसेच उन्हाळा सुरू होत असल्याने या महीन्यापासुनच पाण्याचे जमीनीत झीरपण्याचे (पाझर) आणी बाष्पीभवन होण्याचे प्रमाण सुध्दा सतत वाढत जाणार आहे.

5. यंदा पावसाळा लांबला तर अजुनच शहरात पाणी समस्या अधीक तिव्र होईल. 

6. यावर उपाय म्हणुन धरणातील पाण्याची पातळी 200.500 मीटर वर विजनिर्मीती करीता पाण्याची उचल बंद करावी.

7. विजेपेक्षाही पिण्याचे पाणी महत्वाचे असुन जवळपास 4 लाख पेक्षा अधिक चंद्रपूरकर यावर निर्भर आहेत.

8. 2010 मध्ये पाण्याची समस्या बघता चंद्रपूरकरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय व्हावी म्हणुन चारगांव धरणातुन पाणी इरई धरणात सोडण्यात आले होते परंतु यंदा चारगांव धरणात सुध्दा पाणी साठा कमी आहे. 

या सर्व बाबीचा विचार करता जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे रितसर पत्रव्यवहार करून समस्या लक्षात आणुन दयावी, तसेच विज निर्मीती करीता पाण्याची उचल ही 200.500 मीटर पातळीवरच बंद करावी अशी मागणी इको-प्रो च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे.

 

विज प्रकल्पाची महीन्याकाठी गरज आणी शहराची गरज यात प्रचंड तफावत आहे, चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्राने विज प्रकल्प बंद करण्यापुर्वी महानगरपालीकेने शहराच्या पाणीपुरवठा मध्ये कपात करू नये अशी मागणी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे. तसेच उन्हयाळयातील पाण्यासंदर्भातील संकटकालीन परिस्थीती बघता चंद्रपूर शहरातील नागरीकांनी सुध्दा पाण्याचा अत्यल्प वापर करीत पाणी बचत करण्याचे आवाहन केलेले आहे.

बुधवार, जानेवारी ०३, २०१८

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ashutosh salil साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भिमा कोरेगाव येथील सोमवारच्या घटनेनंतर जिल्हयात कुठेही अनुचित घटना घडू नये , यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे .
       जिल्हयात या घटनेनंतर पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे .जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये . आवश्यक तेथे पोलीस प्रशासनाला मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे . काही संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे .आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने शासनापर्यत पोहचवण्यास शासन तत्पर आहे . त्यामुळे बंद काळात सार्वजनिक वाहन व्यवस्था व मालमत्तेचे नुकसान होणार नाही , याबाबत काळजी घ्यावी , सहकार्य करावे , असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अफवा पसरविणाऱ्यांवर  सायबर सेलची नजर  सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून समाजजीवन बिघडवणाऱ्या समाजकंटाकांवर जिल्हयातील सायबर सेलचे लक्ष असून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .व्हाटस अॅप ग्रुपवरून चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले गेले असून जनतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे .
भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड

भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड


 चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपुरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असतांनाच काही आंदोलनकर्त्यांनी चंद्रपूरचे भाजपचे आमदार नाना शामकुळे यांच्या गंजवॉर्ड स्थित कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची ताजी बातमी हाती येत आहे .जवळपास ४० त्यांच्या कार्यालयाकडे आले यात २० महिला व २० युवकांचा समावेश होता. काल भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.या आंदोलनाने चंद्रपुरात हिंसक वळण घेत येथील आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.यात तेथे राहणाऱ्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी सारडा यांच्या गाडीच्या काचा  देखील फोडण्यात आल्या. तोडफोड सुरु असतांना मात्र आमदार नाना शामकुळे आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते , (सविस्तर वृत्त काही वेळातच )


रविवार, डिसेंबर ३१, २०१७

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर


पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव साजरा
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 31/12/2017 गावाचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर, गावातील लहान मुल उद्याचे भावी नागरिक होणार आहे. यांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावांचा सर्वांगाने विकास करता येतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते ,सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्या साठी तरुणांनी वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसना पासुन दुर राहिले पाहिजे. उल्वल जीवन घडविण्यासाठी  लहान पणा पासुनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे. पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता ,गुडमार्निंग पथक सह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे मनापासुन कौतुक करतो .असे मत व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्या करीता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे सर्व गावांनी ठरविले तेव्हाच घडुन येते. अशाप्रकारचा आदर्श पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे. गावाची ताकद सर्वात मोठी असुन, गावक-यांनी एकत्र येवुन केलेला प्रत्येक संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी एकत्र येवुन गावाला आदर्शवत करणारे सर्व ग्रामस्थ गावविकासाची प्रमुख भुमिका पार पाडत असुन, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे  माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सोयल अली, रमेश पाटिल मालेकर तथा गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमात गावात शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा-या तरुणांचा भव्य  सत्कार करण्यात आला. शादीखाना सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पिपर्डा गावचे सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी केले.

शनिवार, डिसेंबर ३०, २०१७

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

अमोल कोंडबतुनवार यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक श्री अमोल कोंडबत्तूनवार यांचे चंद्रपूर नागभीड-नागपूर मार्गावरील भुयार येथे अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले.सावली मार्गे आपल्या तीन मित्रांसोबत अमोल चारचाकी गाडीने जात होते मात्र भुयार येथे रस्त्यावर एक बर्फाची लादी पडली होती. या लादीला  कट मारून जाण्याच्या गडबडीत समोरूनयेणाऱ्या ट्रक ला जोरदार धडक बसली. यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. 

भाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .
आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.