भिमा कोरेगाव येथील सोमवारच्या घटनेनंतर जिल्हयात कुठेही अनुचित घटना घडू नये , यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे .
जिल्हयात या घटनेनंतर पोलीसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे .जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये . आवश्यक तेथे पोलीस प्रशासनाला मदत करावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे . काही संघटनांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे .आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने शासनापर्यत पोहचवण्यास शासन तत्पर आहे . त्यामुळे बंद काळात सार्वजनिक वाहन व्यवस्था व मालमत्तेचे नुकसान होणार नाही , याबाबत काळजी घ्यावी , सहकार्य करावे , असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलची नजर सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून समाजजीवन बिघडवणाऱ्या समाजकंटाकांवर जिल्हयातील सायबर सेलचे लक्ष असून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .व्हाटस अॅप ग्रुपवरून चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले गेले असून जनतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत करण्याचे आवाहन केले आहे .