Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०३, २०१८

ताडोबा रोडच्या नामातंराविरोधात महापौरानां निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर ते ताडोबा या राज्य माहामार्गाचे चंद्रपूर महानगरपालीकेच्या वतीने नव्याने नामांतर केले जात आहे. महानगरपालीका चंद्रपूर ने तसा ठराव पारीत केला आहे. आणि  ४ जानेवारी ला सकाळी एक समारंभ घेवनू या मार्गाचे निर्मला माता असे नामकरणक केले जाणार आहे, तशा निमंत्रन पत्रिका शहरात वाटल्या गेल्या आहेत. पण चंद्रपूर ते ताडोबा हा रोड जगप्रसिध्द रोड आहे. ताडोबाला जाणारे सर्व पर्यटक याच मार्गावरून जातात. एकीकडे ताडोबा हा जागतिक दर्जाचा पर्यटन केंद्र व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर  सारख्या लोकांना ताडोबाचे ब्रॉडींग करण्यासाठी बोलावले  जात असतांना दुसरीकडे ताडोबा रोड चे नामकरण निर्मला माता रोड असे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे चंद्रपूरातील तुकूम परिसरातील नागरीक, शहरातील पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी आज चंद्रपूर च्या महापौर अंजली घोटेकर यांची भेट घेवनू त्यांना एक निवेदन देण्यात आले. चंद्रपूर ते ताडोबा रोड अत्यंत महत्वाचा आहे, हा राज्य महामार्ग असल्याने त्याचे नामकरण महापालकेला करता येते काय? ताडोबा इतका महत्वाचा असल्याने त्याचे पुन्हा नव्याने नामकरण करायची गरज आहे काय? आणि करायचे असेल तर  धार्मीक वा संप्रदायाचे नांव देणे उचीत नाही, असे निवेदनकर्त्या लोकांचे म्हणने होते.
महापौर अंजली घोटेकर यांनी याबद्दल मला काही माहिती नव्हती याशिवाय आमदार, पालकमंत्री  तसेच गृहराज्यमंत्री यांना सुध्दा याबाबत काहीच माहिती नाही असे सांगितले  तसेच महानगरपालीकेची एक विशेष बैठक घेवनू हा ठराव रद्द करू आणि सामान्य नागरीकांना जे नांव माहिती आहे ते ताडोबा रोड हे नावच या रोडला दिले जाईल. असे महापौर यांनी सांगितले.शिष्टमंडळात प्रा. सुरेश  चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, प्रमोद काकडे, मझहर अली, सूर्यभान  झाडे,अंकुश दाते, अनिल चिताडे, अशोक चिताडे, संजय चिताडे, रामकृष्ण बेलवे, संजय चांदेकर, डॉ. विद्याताई बांगडे यांचा समावेश  होता. 
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.