जिल्हाभरातील भीमसैनिक उतरले रस्त्यावर
सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते.ज्यांनतर भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद आज राज्यभरा सह चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, बल्लारशा,नागभीड,वरोरा, चिमूर, जिवती सिंदेवाही , राजुरा सह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तसेच गावात देखील उमटले.चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर तसेच मूल गडचिरोली मार्ग, चंद्रपूर नागपूर मार्ग, चंद्रपूर बल्लारशा मार्गावर ठिकठिकाणी टायर जाळून मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी सरकार विरोधात नारेबाजी केली.
चंद्रपूर - शहरात सकाळपासूनच भीमसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करत शहरातील अनेक ठिकाणी मोर्चे काढून टायर जाळत निषेध केला तसेच जटपुरा गेट परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा पुतळा जाळण्यात आला. तसेच स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांचे जनसंपर्क कार्यालय आंदोलकांनी फोडले स्थानिक गंज वॉर्डात असलेल्या कार्यालयावर आंदोलकानी हल्लाबोल केला. शहरातील बाबुपेठ, जुनोना चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, रामनगर, बागला चौकात भीमसैनिकांनी एकत्रित येत सरकार विरोधात नारेबाजी केली.
सिंदेवाही - भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिन्देवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले होते तर सिन्देवाही बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी ऑटो, कालीपीली गाडी इत्यादी साधने बंद करुन वाहतुक ठप्प केलेली आहे. या सर्व घडामोडीवर सिन्देवाही पोलीस कडक पहारा देत अाहेत।
दुपारी १ वाजता बुद्धविहारापासुन हा निषेध मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील ३० ते ४० गावातील नागरीक मोर्च्यामध्ये सहभागी होत आहेत.
पोंभुर्णा - शौर्य दिनि मानवंदना कार्यक्रमात गेलेल्या बांधवांवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ पोंभुर्णा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळ पासूनच पोंभुरणात शुकशुकाट पसरला आहे,बस सेवा,दुकाने,शाळा ,महाविद्यालये बंद ठेवण्यात आली .
पोंभुर्णातील भारतीय बौद्ध महासभाचे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष ऍडोकेट रणजित खोब्रागडे ,भारिप बहुजन महासंघ चे अध्यक्ष थेरकर,महासचिव उराडे ,जेष्ठ नागरिक गिरिधर शिंह बैस व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रॅली चे नियोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढली व तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे शांततेत जाऊन तहशीलदारांना निवेदन देण्यात आले .
कुठेच अनुचित प्रकार ,जाळपोळ,घडले नाही.
ब्रम्हपुरी - भिमाकोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी शहरात कडकडित बंद पाळन्यात आला असून ब्रम्हपुरी शहरातील संपूर्ण शाळा महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली त्याच प्रमाणे ब्रम्हपुरी शहरातील व्यापार पेठ पूर्ण रित्या बंद होती यात वस्ती विभाग,व इतरही विभागातील व्यापाऱ्यानी बंद ला पूर्ण पाठीम्बा जाहिर केला यासोबतच बंद चा परिणाम ब्रम्हपुरी शहरातील शासकीय व निमशासकिय कार्यालयावरही जांणवला यादरम्यांन ब्रम्हपुरी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसले.महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर स्मारक परिसरात हजारों आंबेडकरी अनुयायी तसेच आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देवून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिति होती.ब्रम्हपुरी बंदच्या यशस्वी करण्यासाठी येथील अनेक सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले ब्रम्हपुरी बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ब्रम्हपुर पोलिस विभागानी उत्कृष्ट सहकार्य केले व सायंकाळी उशिरा पर्यन्त बंद पाळ न्यात आला.
बल्लारपूर - घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर बल्लारपुरात बंद पाळन्यात आला. भिमाकोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बल्लारपुर शहरात कडकडित बंद पाळन्यात आला असून बल्लारपुर शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली त्याच प्रमाणे बल्लारपुर शहरातील व्यापार पेठ पूर्ण रित्या बंद होती यात डेपो विभाग, वस्ती विभाग, व इतरही विभागातील व्यापाऱ्यानी बंद ला पूर्ण पाठीम्बा जाहिर केला यासोबतच बंद चा परिणाम बल्लारपुर शहरातील शासकीय व निमशासकिय कार्यालयावरही जांणवला यादरम्यांन बल्लारपुर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसले. महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर बल्लारपुर शहरातील नगर परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आबेडकर स्मारक परिसरात हजारों आंबेडकरी अनुयायी तसेच आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देवून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेची उपस्थिति होती. बल्लारपुर बंदच्या यशस्वी करण्यासाठी बल्लारपुर शहरातील मा. राजू झोड़े, मा पवन भगत, प्रशांत झामरे, नरेन्द्र सोनारकर, पवन मेश्राम विशाल डुम्बेरे, बाळकुणाल आमटे, प्रा. वासुदेव कांबळे, प्रा महेन्द्र बेताल, प्रा मिलिंद जाभूळकर, अड़ मिलिंद भसारकर, अड़ विशाल मून ई चे सहकार्य लाभले बल्लारपुर बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपुर पोलिस विभागानी उत्कृष्ट सहकार्य केले व सायंकाळी उशिरा पर्यन्त बंद पाळ न्यात आला.
सावली - हल्याच्या निषेदार्थ सावली सर्वत्र कळकळीत बंद ठेवण्यात आले आहे. सावली शहरातील विविध पक्ष संघटनांनी व बौद्ध समाज सावलीच्या वतीने १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगाव येथे समाज बांधवांवर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून देशभरासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीतही संपूर्ण दुकाने, मार्केटलाईन बंद ठेवण्यात आले. बंद दरम्यान कोणतेही चुक होऊ नये म्हणुन सावली पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, शेख व उपनिरीक्षक चिंचुलकर यांच्या नेतृत्वात सावली पोलीस सर्वत्र काटोकाट बंदोबस्त ठेवण्यात आला.
तसेच बी एस पी, बी आर एस पी, भा रि प बहुजन महासंघ आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी अश्या विविध पक्षाकडून स्थानिकांना पाठिंबा दर्शवुन बंद ठेवण्यात आले.
चिमूर- भिमा कोरेगाव दंगल व जाळपोळ प्रकरणी,महाराष्ट्र बंदच्या हाकेला दाद देत,चिमुर तालुक्यात सुद्धा बंदला मजबूत प्रतिसाद मिळाला.
चिमुरात विविध आंबेडकर व ईतर संघटनेच्या माध्यामातून,भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी मोर्च्या काढण्यात आला व हा मोर्च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.उपविभागीय अधिकारी चिमुर यांना दिलेल्या निवेदनात,भिमा कोरेगाव दंगल व जाळपोळ प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदने,मा.महामहिम राष्ट्रपती,मा.प्रधानमंत्री,महा राष्ट्र राज्याचे मा.महामहिम राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांना पाठवीण्यात आली आहेत.
चंद्रपूर-जुनोना-बल्लारपूर बायपास मार्गावर रसांदोलनकर्त्यांनी रस्ता धरला रोकुन त्यामुलेले जवळपास १ तास परिसरात निर्माण झाले होते |
चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी टायरची जाळपोड करून रस्ता वाहतूक केली बंद |
सावरकर चौक चंद्रपूर येथे आंदोलनकर्त्यांनी केली गर्दी |
टायर जाळून केला निषेध |
भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज सिन्देवाही तालुका बंदचे आयोजन केले होते. सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले होते |
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात देखील टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चंद्रपूर येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मढीमध बसून आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली |
वरोरा: कोरेगांव- भीमाच्या विजयादिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचाराचे आज वरोरा येथे पडसाद उमटले. काही आंदोलकांनी नागपूर - चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.