चिमूर तालुक्यातिल *वंदनीय राष्ट्र्संत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडा गुंफा यात्रा* अनेक वर्षापासुन प्रसिद्ध आहे. परंतु यावर्षी मोठया प्रमानात भाविक उत्साहाने जमले होते. त्याचे कारण म्हणजे
या तपोभूमिचा झालेला विकास.
येथिल चिमूर विधानसभा क्षेत्त्राचे लोकप्रिय आमदार गुरुदेवभक्त श्री. कीर्तिकुमार उर्फ़ बंटीभाऊ भांगडिया याँच्या सतत पाठपुराव्याने व प्रयत्नाने साकार झालेले प्रशस्त सभामंडप, सीमेंटरोड, भक्तनिवास, ध्यानसाधना केंद्र, २६ एकर जागेतिल उद्यान, आणि सर्व सोयी सुविधा बघून सर्व गुरुदेवभक्त प्रफुल्लित झाले.
या प्रसंगी झालेल्या यात्रा महोत्सव कार्यक्रमात आयोजकांनी म्हटले की, आजपर्यंत या तपोभूमीला व सर्व गुरुदेव भक्तांना विकासाची वाट होती. अनेक राजकीय नेते येऊन फक्त आश्वासन देऊन गेले व आपलि राजकीय पोळी शेकली. परंतु बंटीभाऊंनी दिलेला शब्द पूर्ण करत सर्व गुरुदेव भक्तांचि आस पूर्ण केली. भाऊ या कार्यात तन मन धनाने सहकार्य करत असून प्रत्येक तयार होनार्या वास्तुकंडे ते व्यक्तिशा लक्ष देत आहेत.
*श्रीगुरूकुंज मोजरी चे सर्वाधिकारी वाघ महाराज* यांनी आपल्या भाषणात म्हटले की, फक्त मत मागन्यापूर्ते कार्य करणारे अनेक नेते मी माझ्या जीवनात बाघितले परंतु बंटीभाऊ सारखा गुरुदेवभक्त अजुन बाघितला नाही. हे कार्य त्यांच्या जीवनातिल सर्वात मोठे कार्य राहिल.
*ज़िल्हा परिषद चंद्रपूर अध्यक्ष,श्री देवरावदादा भोंगळे* आपल्या मार्गदर्शनात म्हनाले की, बंटीभाऊँसारखा कर्तव्यदक्ष आमदार आपल्याला लाभला आहें.
त्यांचे सर्व कार्य अतिशय उत्कृष्ट आहेत.
सर्वांनी आपली संस्कृती जपने आवश्यक आहे. भारतीय भूमी ही संतांची भूमी असून भारतीय संस्कृतिला जगात मान आहे, गुरुदेव मार्गाने जानारा व्यक्ति कधिही दिशाहीन होऊ शकत नाही.
*विधानपरिषद आमदार श्री मितेशजी भांगडिया* म्हनाले की, या तपोभूमिचा विकास करन्याचा आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. हे सर्व कार्य गुरुदेव कृपेने झाले आहे. गुरुदेवांचि कृपा झाली तर कोणतेचे कार्य अशकय नाही.
*विधानसभा आमदार श्री बंटीभाऊ भांगडिया* आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हनाले की, ग्रामगीता ही सर्वांच्या जिवनाचा आधार आहे. जो ग्रामगिता वाचेल व त्यानुसार आचरण करेल तो व्यक्ति कधिच वाईट प्रवृतिच्या मागे जानार नाही. गुरुदेवच्या मंच चा वापर करुण मोठे मोठे भाषण देनारे नेते कोंबड़े-बकरे कापुन मत मागतात. तरुण पिढ़िला आपल्या स्वार्थ साधन्यासाठी वाईट मॉर्गावर चलाला लावतात त्यांना या मंचावर बोलन्याचा काहि अधिकार नाही.
तपोभूमी चा झालेला विकासात्मक कायापालट हा मी केलेला नसून परमवंदनीय तुकडोजी महाराज यांनी केला आहे मी फक्त निमित्त असून हे कार्य माझ्या हाताने केल्याने मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरनी नतमस्तक आहो. माझ्या विधानसभा क्षेत्रातिल सर्व जनतेला सुख, समृद्धि, भरभाराट मीळावी, या करिता त्यांनी गुरुदेव चरनी प्रार्थना केली.