Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जून १९, २०१८

नारळ पाणी वाटून बस भाडेवाढीचा निषेध

नारळ पाणी वाटून बस भाडेवाढीचा निषेध

Bus fare prohibit sharing coconut water | नारळ पाणी वाटून बस भाडेवाढीचा निषेधचंद्रपूर/प्रतिनिधी:
 डिझेल दर वाढीमुळे एसटी महामंडळाने १८ टक्के तिकीट दर वाढविले आहे. या दर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे वाहन चालविणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर बसस्थानकावर नारळ पाणी वाटप करण्यात आले.एसटी ही लोकवाहिनी आहे. मात्र भाजप सरकार खासगी बसगाड्यांच्या मालकांशी हात मिळवणी करुन मोठी खंडणी वसूल करीत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर बसस्थानक येथे लोकवाहीनीची पूजा करुन प्रवाशांचा आक्रोश शांत करण्याकरिता नारळ पाणी वाटप करण्यात आले.
त्यानंतर विश्वासघाती भाजप व शिवसेना युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, अखिल भारतीय कामग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सुनीता लोढीया, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, प्रदेश सचिव नंदा अल्लूरवार, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, राजेश सोलापन, अनिल सुरपाम, भास्कर दिवसे, निखील धनवलकर, घनश्याम वासेकर, शालीनी भगत, दीपक कटकोजवार, प्रकाश अधिकारी, सुरेश आत्राम, विकास टिकेदार, कुमार पोतनवार, सुरेश दुर्लेवार, राजेंद्र आत्राम, अशपाक शेख, राजकुमार रेवल्लीवार, बकार काजी, वंदना बेले, रितू गजगाटे, पुष्पा शेंडे, वैभव बानकर, दीपक नायडू यांच्यासह चंद्रपूर शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवार, फेब्रुवारी ०६, २०१८

 महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

बल्लारपूर/प्रतिनिधी: 
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरात मोठी वाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. दरम्यान, तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन सादर करण्यात आले.

दिलीप टॉकीज समोरील मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या जीवावर उठले. शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनूल बावणे, डॉ. रजनी हजारे, नरेश मुंदडा, देवेंद्र आर्य, विनोद बुटले, कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, किन्ही येथील उपसरपंच वासुदेव येरगुडे, धीरज निरंजने, शांता बहुरिया, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नांदगाव (पोडे) येथील माजी सरपंच मधुकर पोडे, शिवा राव, राजू बहुरिया, निशांत आत्राम, सचिन जाधव, अमीत पाझारे आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.



शुक्रवार, जानेवारी २६, २०१८

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

गांधीचौकातील ध्वजारोहणाचा मान नायब तहसीलदारांना

चंद्रपूर/प्रतिनिधी:  
जिल्हाभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरून सुरु झालेल्या चंद्रपूर काँग्रेसच्या दोन गटातील वाद यंदा देखील कायम राहिल्याचे चित्र यंदाच्या २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात दिसून आला, चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण पुन्हा एकदा प्रशासनातील नायब तहसीलदारांनी केले आहे. 

शहरात वडेट्टीवार आणि पुगलिया असे दोन गट आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला हे दोन्ही गट चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील ध्वजारोहण "आम्ही"करणार म्हणून आपापसात समोर आले होते, यात गेली सत्तर वर्ष सातत्यानं चंद्रपूरच्या गांधी चौकात जयस्तंभाजवळ काँग्रेसची अधिकृत झेंडावंदन रंपराच मोडीली गेली होती. 

 याच संदर्भात २४ जानेवारी २०१७ ला शहर पोलीस स्टेशन येथे वडेट्टीवार आणि पुगलिया या दोन्ही गटाची बैठक संध्याकाळी ६ वाजता बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीस पुगलिया गटावतीने मनपा गटनेते डॉ. महाकुलकर ,अविनाश ठावरी,देवेंद बेले प्रवीण पडवेकर, अशोक नागपुरे,सुधाकरसिंग गौर,प्रशांत दानव उपस्थित होते.मात्र वडेट्टीवार गटाचे एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने दोन्ही गटात समन्वय होऊ शकला नाही.त्यामुळे पुगलिया गटाने आम्हाला ध्वजारोहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती , रात्री ९ वाजताच्या सुमारास वडेट्टीवार गटाकडून नंदू नागरकर,सुनिता लोढिया,मलक शाकिल, हे शहर पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. व नंदू नागरकर यांनी मी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष असल्याने आम्हालाच या गांधीचौक येथील प्रजासत्ताक दिनाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. 

या दोन्ही गटात समन्वय नसल्याने याठिकाणी कोणत्याही एका गटाला परवानगी देणे पोलीस प्रशासनाला शक्य नव्हते. व त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकत होता ,यातच चंद्रपूर उपविभागीय दंडाधिकारी मनोहर वसंत गव्हाळ यांनी आदेश देत उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे नायब तहसीलदार प्रमोद कुलटे यांना ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली.तर शहर पोलीस निरीक्षक यांना ध्वजारोहणासाठी योग्यता व्यस्था करण्याचे आदेश दिले.या आदेशांनंतर देखील कोणताही अनुचित प्रकार जर त्याठिकाणी घडला तर भारतीय दंड संहितेच्या सलाम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेशही काढण्यात आले होते. 

स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी खरंतरं सारे रागलोभ दुरावे विसरून एकत्र येण्याचा दिवस असतो. मात्र चंद्रपूर काँग्रेसच्या नेत्यांना मात्र तसं काही वाटत नाही असे या उदाहरणावरून लक्षात येत . कारण ध्वजारोहण कुणी करायचं या वादात अडकलेल्या वडेट्टीवार आणि पुगलिया गटांनी काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा मोडीत काढल्याने या नंतर देखील गांधीं चौकातील ध्वजारोहण हे प्रशासनाच्या मध्यस्तीनेच होणार हे मात्र नक्की झाले आहे. 






शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

रामू तिवारींची घरवापसी होणार?

रामू तिवारींची घरवापसी होणार?

चंद्रपूर - महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रामू उर्फ रितेश तिवारी भाजप सोडून पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असून यासाठी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉग्रेस मध्ये असतांना शहरातील काँग्रेस पक्षाच्या बळकटी देत कार्यकर्त्यांचा मोठा फोज फाटा तयार करणारे रामू तिवारी यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. मात्र मतदारसंघ नवा असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्येच काम केले. सध्याही ते भारतीय जनता पार्टीतच सक्रिय आहे. मात्र आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या संबंधाने त्यांनी नुकतीच नागपूर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचीही खात्रीजनक माहिती आहे.

बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे जनआक्रोश आज

नागपूर - ८ नोव्हे.२०१७ रोजी नोटबंदी ला १ वर्ष पूर्ण होत असून देशभरात काँग्रेस पक्षातर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे . भाजप प्रणित केंद्र व राज्यात सत्तेत असलेले शासन जनतेविरुद्ध अनेक निर्णय घेत आहे. याचा फटका समाजातील सर्व घटकांना बसला असून  या  शासन विरुद्ध बुधवार  ८ नोव्हे.२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता   टेलीफोन एक्सचेंज चौक,नागपूर  येथे जनआक्रोश  आंदोलन करण्यात येणार आहे.  आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले आहे.