Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०६, २०१८

महागाईविरुद्ध काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

बल्लारपूर/प्रतिनिधी: 
भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरात मोठी वाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. दरम्यान, तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन सादर करण्यात आले.

दिलीप टॉकीज समोरील मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. सरकारविरोधी घोषणाबाजी करीत नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या जीवावर उठले. शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनूल बावणे, डॉ. रजनी हजारे, नरेश मुंदडा, देवेंद्र आर्य, विनोद बुटले, कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, किन्ही येथील उपसरपंच वासुदेव येरगुडे, धीरज निरंजने, शांता बहुरिया, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नांदगाव (पोडे) येथील माजी सरपंच मधुकर पोडे, शिवा राव, राजू बहुरिया, निशांत आत्राम, सचिन जाधव, अमीत पाझारे आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.