Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०६, २०१८

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील हुक्का पार्लरवर धाड

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील रुफटॉप हॉटेलवर छापेमारीनागपूर/प्रतिनिधी : 
मुख्यमंत्र्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर काल (रविवार) रात्री धाड टाकण्यात आली आहे. या रुफ टॉप हॉटेलला कोणतीही परवानगी नसताना याठिकाणी सर्रासपणे मद्यविक्री आणि हुक्का पार्लर सुरु होतं.ज्यावेळी धाड टाकली गेली, त्यावेळी अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आले. धरमपेठ भागात असणाऱ्या या हॉटेलचं नाव ‘रुफ नाईन’ असं आहे.
हा परिसर अतिशय व्हीव्हीआयपी मानला जातो. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच अनधिकृतपणे हॉटेल कुणाच्या आशीर्वादानं उभं राहिलं? हा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.
दरम्यान, या हॉटेलमधील एक पुरुष कर्मचारी आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.